Wonder Cement Saath 7 Cricket Festival
श्री श्याम
क्रिकेट क्लब ऑफ जयपूर ठरले वंडर सिमेंट साथः7 चे विजेते
महिलांच्या
विभागात उदयपूरचा पेस मेकर संघ विजयी
वंडर सिमेंट साथः7 च्या वतीने उदयपूर येथील दिल्ली पब्लिक स्कूलवर
आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट महोत्सवात जयपूरच्या श्री श्याम क्लब ऑफ जयपूरचा
संघ अंतिम विजेता ठरला. अटीतटीच्या सामन्यात त्यांनी अहमदाबादच्या पीसीए क्लबचा
पराभव केला. महिला गटात उदयपूरच्या पेस मेकर संघाने एसएस जैन सुबोध गर्ल्सपीजी
कॉलेज संघाचा 5 गडी राखून पराभव करून बाजी मारली.
या क्रिकेट महोत्सवात राजस्थान, गुजरात आदी
राज्यांतून 60 हून अधिक महिलांचे संघ सहभागी झाले होते. सुमारे 48 हजार जणांनी या
महोत्सवात हजेरी लावली व खेळाडूंना प्रोत्साहित केले. सुमारे 1 हजारांहून अधिक
महिला खेळाडूंनी यात भाग घेतला तर जवळपास 5 हजार सामने या महोत्सवात झाले.
या प्रसंगी खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी भारतीय संघाचा
कर्णधार कपिल देव, कॅबिनेट मंत्री श्रीचंद कृपलानी, खासदार अरुणलाल मीना, महापौर चंद्रसिंह कोठारी,
वंडर सिमेंट उपाध्यक्ष विमल पाटणी, वंडर
सिमेंटचे संचालक विवेक, पाटणी, विकास पाटणी, लक्ष्यराजसिंह मेवाड, पोलिस अधीक्षक राजेन्द्रप्रसाद गोयल यांचीही यावेळी
उपस्थिती होती. कार्यक्रमाचे नियोजन महाव्यवस्थापक तरुण सिंह चौहान यांनी केले.
1983 मध्ये भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार कपिल देव यांनी भारताच्या पहिल्या
विश्वचषकाची बाजी मारली होती. त्यांच्या उपस्थितीने एकच जोश आला. पुरुष वर्गात मॅन
ऑफ दी मॅच लखन यांना, उत्कृष्ट फलंदाज सुशील मीना, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक संजय भदानिया, सर्वोत्कृष्ट
गोलंदाज कौशल कौशिक यांना सन्मानित करण्यात आले. महिला गटात उदयपूरच्या दिव्या
हिला प्लेयर ऑफ दी मॅचचा पुरस्कार मिळाला.
यावेळी बोलताना वंडर सिमेंटचे संचालक विवेक पाटनी यांनी सांगितले
की,
वंडर सिमेंटचा हा महोत्सव यापुढील काळात अधिक व्यापक होईल तसेच आपले
नवे आयाम प्रस्थापित करेल. त्यातून अधिकाधिक लोकांना खेळाचा आनंद वृद्धींगत करेल,
याची आम्हाला खात्री आहे. खेळण्यातील आनंद हा द्विगुणित करण्याबरोबरच त्याच्या माध्यमातून क्रिकेट जगताला
चांगले खेळाडू मिळवून देण्यासाठी हा महोत्सव निश्चितपणे उपयुक्त ठरणार आहे, असा विश्वासही
त्यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केला.
हा महोत्सव
म्हणजे क्रिकेटप्रेमींसाठी एक पर्वणीच होती. वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेले स्पर्धक व
त्यांचा उत्साह पाहण्याजोगा होता. दिल्ली पब्लिक स्कूलचे स्टेडिअम हे प्रेक्षकांनी
गच्च भरून गेले होते. प्रत्येक सामन्यांसाठी 7 षटकांची मर्यादा होती. त्यामुळे अत्यंत
कमी वेळेत अधिकाधिक धावसंख्या करणे, हे फलंदाजी करणा-या तसेच गोलंदाजी व क्षेत्ररक्षक
करणा-यांना त्यांना चीत करणे, ही एक कसोटी दिसून येत होती. चौकार, षटकारांनी स्टेडिअम
दुमदुमून जात होते. प्रेक्षकांचा मोठा उत्साह त्याला मिळत होता. जयपूर व उदयपूर संघाच्या
वेळी तर प्रेक्षकांना अटीतटीचा सामना बघायला मिळाला. दोन्ही संघांनी मोठी धावसंख्या
केली होती. त्यामुळे लक्ष्य गाठताना उदयपूर संघाला खूप कसरत करावी लागली. त्यांनी
कडवी झुंज दिली पण शेवटी जयपूर संघाचा विजय झाला. विजयानंतरही खेळाडूंनी दाखविलेली
खिलाडूवृत्ती वाखाणण्याजोगी होती. महिला संघाचा लक्षणीय सहभाग तसेच त्यांच्यातील व्यावसायिक
क्रिकेटपटूंसारखे असलेले गुण पाहता या संघांमधून उद्या भारतीय महिला संघाला चांगले
खेळाडू मिळतील, याबद्दल सर्वांनाच विश्वास वाटत होता. एक लक्षणीय अशा स्वरुपाचा हा
क्रिकेट महोत्सव ठरला हे निश्चित.
Comments
Post a Comment