गॅलक्सी सर्फेक्टंट्स लिमिटेड सोमवार, 29 जानेवारी 2018 पासून समभाग विक्रीला सुरुवात
गॅलक्सी सर्फेक्टंट्स लिमिटेड
सोमवार,
29 जानेवारी 2018 पासून समभाग विक्रीला सुरुवात,
बुधवार, 31 जानेवारी 2018
रोजी विक्री बंद होणार
किंमतपट्टा: प्रति इक्विटी शेअर किंमतपट्टा
1,470 रुपये ते 1,480 रुपये
गॅलक्सी सर्फेक्टंट्स लिमिटेडने (“कंपनी”) प्रत्येकी 10 रुपये दर्शनी मूल्य
असलेल्या 6,331,674 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सची
(“इक्विटी शेअर्स”) सोमवार, 29 जानेवारी 2018 पासून रोख पद्धतीने प्रारंभी समभाग
विक्री करायचे ठरवले (“ऑफर”). ऑफरमध्ये प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डरकडून 39,250 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचा; प्रमोटर ग्रुप सेलिंग शेअरहोल्डर्सकडून 2,107,804 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचा व अन्य सेलिंग शेअरहोल्डर्सकडून 4,184,620 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचा समावेश आहे.
ऑफर कालावधी बुधवार, 31 जानेवारी 2018
रोजी बंद होणार आहे. अँकर
इन्व्हेस्टरसाठी बिड/इश्यू कालावधी बिड/इश्यू सुरू होण्याच्या तारखेपूर्वी एक कामाचा दिवस अगोदर, म्हणजे मंगळवार, 25 जानेवारी 2018 रोजी असेल.
ऑफरसाठी प्रति इक्विटी शेअर किंमतपट्टा 1,470 रुपये ते 1,480 रुपये निश्चित केला आहे.
किमान
बोलीचे प्रमाण 10 इक्विटी
शेअर्स आहे आणि त्यानंतर 10 इक्विटी
शेअर्सच्या पटीत असेल.
इक्विटी
शेअर्सची विक्री 16 जानेवारी 2018 रोजीच्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसनुसार (“आरएचपी”) केली
जाणार आहे व इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (“बीएसई”) व नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“एनएसई”)
आणि येथे सूचिबद्ध केले जाणार
आहेत. ऑफरसाठी डेझिग्नेटेड स्टॉक एक्स्चेंज बीएसई असेल.
आयसीआसीआय
सिक्युरिटीज लिमिटेड, एडलविस फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड, जेएम फायनान्शिअल
लिमिटेड हे बुक रनिंग लीड मॅनेजर (“बीआरएलएम”) आहेत.
बदल केल्यानुसार सिक्युरिटीज काँट्रॅक्ट्स (रेग्युलेशन)
रुल्स, 1957चा नियम 19(2)(बी) आणि सेबी आयसीडीआर
रेग्युलेशन्स असा बदल केलेल्या सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (इश्यू
ऑफ कॅपिटल अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट) रेग्युलेशन्स, 2009 च्या नियम
26(1) नुसार, ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेनुसार दिली जाणार असून,
त्यामध्ये ऑफरपैकी 50% शेअर्स विशिष्ट प्रमाणात पात्र संस्थात्मक ग्राहकांसाठी (“क्यूआयबी”) राखून ठेवले जातील, तसेच कंपनी व सेलिंग शेअरहोल्डर्स बीआरएलएमच्या सल्ल्याने
क्यूआयबीपैकी 60% पर्यंत भाग कदाचित अँकर इन्व्हेस्टर अलोकेशन प्राइसनुसार
अँकर इन्व्हेस्टरसाठी राखून ठेवतील (“अँकर इन्व्हेस्टर पोर्शन”). त्यापैकी एक-तृतियांश देशांतर्गत म्युच्युअल फंडांकडून
अँकर अलोकेशन प्रइसने वा त्याहून अधिक वैध बोलीनुसार केवळ देशांतर्गत म्युच्युअल
फंडांसाठी सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सनुसार राखले जातील. नेट क्यूआयबीच्या (अँकर इन्व्हेस्टर वगळता) 5% चे प्रतिनिधित्व करणारे इक्विटी शेअर्स विशिष्ट प्रमाणात केवळ म्युच्युअल फंडांसाठी उपलब्ध होतील,
व उर्वरित नेट क्यूआयबी भाग विशिष्ट प्रमाणात
क्यूआयबींना (अँकर इन्व्हेस्टर वगळता) त्यांच्याकडून आलेल्या ऑफर प्राइस वा
त्याहून अधिक वैध बोलींवर उपलब्ध केला जाईल. ऑफरपैकी
किमान 15% भाग
विशिष्ट प्रमाणात बिगर-संस्थात्मक बिडर्ससाठी राखून ठेवला जाईल आणि विक्रीच्या किमतीइतक्या वा त्याहून अधिक रकमेच्या वैध बोली
व रिटेल इंडिव्हिज्युअल बिडरसाठी किमान 35%
शेअर्स राखून ठेवता येतील. अँकर इन्व्हेस्टर व्यतिरिक्त सर्व गुंतवणूकदारांना अॅप्लिकेशन सपोर्टेड बाय
ब्लॉक्ड अमाउंट (“एएसबीए”) प्रक्रियेमार्फत या विक्रीमध्ये सहभागी होता येईल व यासाठी
त्यांना त्यांचा संबंधित बँक खाते क्रमांक द्यावा लागेल. या खात्यात एससीएसबीकडून
बोलीची रक्कम सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँकेमार्फत (एससीएसबी) ब्लॉक केली जाईल. अँकर
इन्व्हेस्टरना एएसबीए प्रक्रियेद्वारे अँकर इन्व्हेस्टर पोर्शनमध्ये सहभागी होता
येणार नाही.
Comments
Post a Comment