काळा घोडा आर्ट असोसिएशन फेस्टिवलचा 3 फेब्रुवारीपासून `हरा घोडा महोत्सव सुरू होणार!
काळा घोडा आर्ट असोसिएशन फेस्टिवलचा
3 फेब्रुवारीपासून `हरा घोडा महोत्सव सुरू होणार!
काळा
घोडा आर्ट असोसिएशन फेस्टिवलतर्फे (केजीएएएफ) मुंबई
शहरात बहुसांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले जाते. अशाच स्वरुपाचा आणखी एक महोत्सव
म्हणजे `हरा घोडा' या नावाने आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव 3 फेब्रवारीपासून
सुरू होऊन 11 फेब्रुवारीपर्यंत असेल. यात नृत्य, साहित्य, संगीत, स्टॅण्ड अप कॉमेडी,
खाद्य संस्कृती, शहरी वास्तुरचना, विविध कार्यशाळा यांची रेलचेल असून मुंबईकरांबरोबर
देश-विदेशातील कलाकार व हौशी मंडळींसाठी एक पर्वणी ठरणार आहे.
महोत्सवाच्याविषयी बोलताना समन्वयक निकोल मोदी म्हणाले, "अनेक वर्षांपासून केजीएएएफचा एक भाग होण्यासाठी भाग्यवान झालो असून मी या महोत्सवाच्या उत्क्रांतीचा अनुभव
घेतला आहे आणि मुंबई शहरातील एक प्रतिष्ठित कार्यक्रमात सहभागी आहे. हा
महोत्सव माझ्यासाठी
नवीन आणि नाविन्यपूर्ण उंचीवर जाण्याचे एक आव्हान आहे. कला आणि संस्कृतीच्या परंपरेला आदरांजली म्हणून आम्ही आलेले आहोत."
निकेल
पुढे म्हणतात, या वर्षी आम्ही तरुण कलाकार आणि अभिनव
कलाकारांना आकर्षित करू इच्छितो जे अभिव्यक्तीचे पारंपरिक विचारांचे पालन करीत
नाहीत. हरा घोडा ही एक चळवळ आहे आणि मी उत्साहित आहे की शहर कसे सहभागी होते. भारतातील सर्वाधिक प्रिय कला आणि
संस्कृती उत्सवांपैकी हा एक उत्सव आहे."
प्रत्येक
वर्षी, काळा घोडा आर्ट महोत्सवाच्या माध्यमातून प्रत्येकाने
विविध
कार्यक्रमांमध्ये नवीन आणि नवीन बदल घडवून आणण्याचा उत्तम प्रयत्न केला आहे.
Comments
Post a Comment