बँक ऑफ बडोदाने आपल्या ग्राहकांसाठी आणली 5X रिवॉर्ड्स क्रेडिट कार्ड्स
बँक ऑफ बडोदाने आपल्या ग्राहकांसाठी आणली 5X रिवॉर्ड्स क्रेडिट कार्ड्स
बँक ऑफ बडोदाने आपल्या संपूर्ण अधिपत्याखालील बॉब फायनान्शियल सोल्युशन्स लिमिटेड (पूर्वी बॉबकार्ड्स लिमिटेड या नावाने ओळखल्या जाणाऱ्या) या कंपनीद्वारे आज आपल्या ग्राहकांना खरेदीवर सर्वाधिक लाभ मिळवून देणाऱ्या 5X रिवॉर्ड्स क्रेडिट कार्डांच्या मालिकेची घोषणा केली. 5X क्रेडिट कार्डांची नवी मालिका ग्राहकांसाठी बँक ऑफ बडोदाच्या ५,५०० हून अधिक शाखांच्या विस्तृत नेटवर्कपैकी कुठल्याही शाखेमध्ये उपलब्ध असणार आहे.
5X रिवॉर्ड्स क्रेडिट कार्डांना वेगवेगळ्या ग्राहकवर्गांच्या काटेकोर विभागणीनुसार तयार करण्यात आले असून प्रत्येक विभागासाठी साजेसे रिवॉर्ड्स व फायदे ही कार्ड्स देऊ करतात. प्रत्येक कार्डांना लागू असणारे ५पटींचे गुणक ग्राहकांना खर्चाच्या रकमेनुसार काळजीपूर्वक निवडलेल्या उत्पादनश्रेणीसाठी लागू फायदे मिळण्याची हमी देते.
5X रिवॉर्ड्स मालिकेतील क्रेडिट कार्डांची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे :
· इझी हे कार्ड रोजच्या वापरासाठी सोयीचे असून किराणा सामान, डिपार्टमेंटल स्टोअर्स आणि चित्रपटांसारख्या खर्चाच्या गटांतील वस्तू व सेवांवर हे कार्ड 5X रिवॉर्ड्स देऊ करते. या कार्डच्या निमित्ताने या क्षेत्रामध्ये प्रथमच करण्यात आलेला एक प्रयोग म्हणजे प्रत्येक कार्डधारकाला आपल्या कार्डवरची बाकी रक्कम चुकती केल्यावर 0.5 % कॅशबॅक मिळणार आहे. क्रेडिट कार्डचा नव्याने वापर करू लागलेल्यांमध्ये आर्थिक जबाबदारी वाढीस लागावी या हेतूने हे वैशिष्ट्य या कार्डमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.
· सिलेक्ट हे कार्ड सधन वर्गातील ग्राहकांसाठी असून यात ऑनलाइन व्यवहार, युटिलिटीज आणि डायनिंग अशासारख्या आयुष्य अधिक सोयीचे बनविणाऱ्या खर्चाच्या गटांवर पाच पट रिवॉर्ड्स या कार्डद्वारे मिळणार आहेत. याखेरीज महिनाभरात सिलेक्ट क्रेडिट कार्ड १००० रुपयांपेक्षा अधिकच्या रकमेसाठी ५ पेक्षा अधिक वेळा वापरल्यास ग्राहकांनाअतिरिक्त १००० बोनस रिवॉर्ड पॉइंट्सही मिळणार आहेत.
· प्रिमियर हे कार्ड उच्चभ्रू गटातील ग्राहकांसाठी आहे ज्यांना खास आपल्याच कार्डला लागू असतील असे फायदे हवे असतात. अशा ग्राहकांची जगण्याची पद्धत लक्षात घेत हे कार्ड वापरून प्रवास, आंतरराष्ट्रीय प्रवास तसेच डायनिंग अशा प्रकारच्या मोठ्या खर्चांवर 5X रिवॉर्ड्स देऊ करण्यात आले आहेत. या कार्डबरोबर मिळणारे आधारभूत रिवॉर्ड पॉइंट्सही इझी आणि सिलेक्ट कार्डच्या दुप्पट असल्याने 5X पॉइंट्सची किंमत १० पट पॉइंट्स इतकी बनते. प्रिमिअर कार्डधारकांना भारतभरातील ३८ देशांतर्गत विमानतळांच्या एअरपोर्ट लाउंजेसवर खुला प्रवेश असेल.
नव्या उत्पादनांच्या या मालिकेमध्ये बिनव्याजी हफ्ते, शून्य इंधन अधिभार आणि वर्षभरात केलेल्या खर्चानुसार सदस्यत्व शुल्क भरण्यातून मोकळिक अशा इतरही ग्राहककेंद्री वैशिष्ट्यांचा अंतर्भाव करण्यात आला आहे.
या प्रसंगी बोलताना बँक ऑफ बडोदाचे ईडी श्री. अशोक कुमार गर्ग म्हणाले, ''किरकोळ गटातील ग्राहकांना बँकेकडून धोरणात्मक दृष्टीने प्राधान्य दिले जाते आणि या वर्गाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही आमची किरकोळ उत्पादनांची श्रेणी वेगाने अधिकाधिक समृद्ध करत चाललो आहोत. आमच्या क्रेडिट कार्डांची नवी 5X रिवॉर्ड मालिका क्रेडिट कार्ड अगदी नव्याने वापरणाऱ्यांनाही आपली पत तयार करण्याची संधी देते आणि त्याद्वारे बँकेकडून या क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट दरांमध्ये उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सर्वोत्कृष्ट स्तरावरील क्रेडिट उत्पादनांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवून देते.''
बॉब फायनान्शियल सोल्युशन्स लिमिटेडचे एमडी आणि सीईओ श्री. मनोज पिपलानी म्हणाले, ''आमच्या ग्राहकांना सर्वोत्कृष्ट दर्जाची उत्पादने आणि सेवा देण्याप्रती आम्ही कटिबद्ध आहोत. नव्याने बाजारात आणलेली बॅंक ऑफ बरोडा 5X रिवॉर्ड्स क्रेडिड कार्ड्स म्हणजे याच दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल आहे. अशाप्रकारची नाविन्यपूर्ण आणि वैयक्तिकृत उत्पादने आम्ही यापुढेही आणत राहू आणि ग्राहकांचा समग्र अनुभव अधिकाधिक समृद्ध करत जाऊ. ''
Comments
Post a Comment