स्नॅपडील प्रजासत्ताक दिन २०१८ प्राइड ऑफ इंडिया
स्नॅपडील प्रजासत्ताक दिन २०१८ प्राइड ऑफ इंडिया
स्नॅपडील प्राइड ऑफ इंडिया" ई-स्टोअर ६९ वा भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करत आहेत. या ई-स्टोअर मध्ये देशाच्या सर्व भागांतील अनोख्या हातमाग व हस्तकला वस्तू आणि विशेष उत्पादने मिळतील. या स्टोअरमध्ये लोकप्रिय भारतीय ब्रॅण्ड्सची उत्पादने, देशभक्ती संकल्पनेवर आधारित आणि भारताशी संबंधित वस्तूही मिळतील. सर्वात महत्वाचे म्हणजे संस्कृतींमधील विविधता दर्शविणा-या हस्तकलेच्या वस्तू या ई-स्टोअर मध्ये उपलब्ध केल्या जाणार आहेत. वस्त्र दालनामध्ये तांथ, जामदानी, भागलपूर, कंथा, कांचीपुरम साड्यांव्यतिरिक्त बंगाल, तामिळनाडू, ओरिसा आणि मध्यप्रदेश यांसारख्या वस्त्रोद्योगासाठी प्रसिद्ध असलेल्या राज्यांतील फुलकारी, इक्कट आणि भांदेज दुपट्टा यांचा समावेश आहे. तर दागिन्यांच्या वर्गामध्ये कुंदन, पोलकी, मीनाकारी, मोती आणि मंदिरामधील दागिने यांचा संग्रह आहे. देशभक्तीच्या संकल्पनेवर आधारित असलेल्या उत्पादनांमध्ये वंदे मातरम स्लोगन असलेले टी शर्ट्स, प्रजासत्ताक दीना संकल्पनेवर आधारित उशीची कव्हर्स, सुभाष चंद्र बोस, भगत सिंग आणि राणी लक्ष्मी बाई या व्यक्तिरेखा साकारणारे पोशाख यांचा समावेश आहे. संग्रहणीय श्रेणीमध्ये प्रवास आणि तंत्रज्ञान ऍक्सेसरीज, दागिने आणि कपडे, फ्रिज मॅग्नेटस, कि-चेन्स, टी शर्ट्स, कॉफी मग्ज आणि फोन केसेस आहेत जे बॉलिवूड, चाय आणि तिरंगा या संकल्पना दर्शवितात.
Comments
Post a Comment