के रहेजा कॉर्प बिझनेस पार्क – ‘माइंडस्पेस, ऐरोली इस्ट’ तर्फे सर्वोत्तम कचरा व्यवस्थापन यंत्रणेचे संचालन

के रहेजा कॉर्प बिझनेस पार्क – ‘माइंडस्पेस, ऐरोली इस्ट’ तर्फे सर्वोत्तम कचरा व्यवस्थापन यंत्रणेचे संचालन

अलीकडच्या जगात‘शाश्वत विकास’ हा शब्द लोकप्रिय झाला आहे. के,रहेजा कॉर्पच्या लँडमार्क कमर्शियलने ऐरोली इस्ट येथील माइंडस्पेसमध्ये कचरा व्यवस्थापन यंत्रणेचा एक नवीन मार्ग तयार केला. भारतात पंतप्रधान कार्यालयातर्फे सर्वात मोठ्या स्वच्छता अभियानाची‘स्वच्छ भारत अभियानाची’ घोषणा झाल्यावर त्या तत्वाचा अंगीकार करत आपल्या बिझनेस पार्कमध्ये शाश्वत विकासाच्या दिशेने यंत्रणा उभारली गेली. त्याठिकाणी जमा होणाऱ्या कचऱ्याच्या प्रत्येक तुकड्यावर पार्क अंतर्गत पुनर्प्रक्रिया आणि पुनर्वापर करण्यात येतो. त्यामुळे स्वच्छतेच्या दृष्टीने या बिझनेस पार्कचा शहराच्या पालिकेवर ताण पडत नाही. आपल्या ताज्या बिझनेस दौऱ्यादरम्यान स्वच्छ भारत मिशनचे सह-सचिव श्री. विनोद जिंदाल यांनी नवी मुंबईचे आयुक्त डॉ. एन रामस्वामी यांच्यासह याठिकाणची पाहणी केली आणि टीमला त्यांचा उपक्रम आणि मेहनतीबद्दल अभिनंदन केले. 
इतर उपक्रमांमध्ये ऐरोली इस्ट माइंडस्पेस एसईझेडने ओडब्ल्यूसी युनिट्स बसवले आहे, यामध्ये बिझनेस पार्कमधील ओल्या कचऱ्याचे विघटन करण्यात येते. या युनिट्सची एकूण क्षमता प्रती दिवशी सुमारे 4 टन कचऱ्याचे विघटन करण्याची आहे. त्यात कचऱ्याचे प्रभावीपणे विघटन होते. याशिवाय माइंडस्पेस बिझनेस पार्क येथे बागकामातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरिता हॉर्टीकल्चर श्रेडर मशीन्स बसविण्यात आली आहेत. तसेच हाताळण्यास सोपी अशी पानांचे विघटन होणाऱ्या युनिट्ससोबत अनेक कार्यशील गांडूळखत वाफे तयार करण्यात आले आहेत. या सर्व यंत्रणेतून तयार होणारे खत परिसरातील हरित पट्ट्यांसाठी तसेच जैविक भाज्यांच्या लागवडीकरिता वापरले जाते.
शहरी भागांमध्ये स्वच्छतेला प्रोत्साहन मिळावे याकरिता गृहनिर्माण आणि शहरी कामकाज मंत्रालयाने ‘स्वच्छ सर्वेक्षण 2018’ सर्वेचा शुभारंभ केला. या सर्वेचे उद्दिष्ट्य म्हणजे मोठ्या जनसमुदायाला प्रेरित करून लोकसहभाग वाढविणे तसेच समाजातील सर्व घटकांमध्ये शहर-नगर ही जगण्याची समृद्ध जागा असावी यादिशेने जनजागृती करण्याचे आहे.
के रहेजा कॉर्प उपक्रमाची प्रशंसा करताना स्वच्छ भारत अभियानाचे सहसचिव श्री. विनोद जिंदालम्हणाले की, “माइंडस्पेस येथे वापरण्यात येणाऱ्या शाश्वत संकल्पना कौतुकास्पद आहेत. एका व्यावसायिक बिझनेस पार्कमध्ये होत असलेल्या अमलबजावणीचा मला आनंद वाटतो. अधिकाधिक कंपन्यांनी असा अंगीकार करून उपक्रम राबवावेत आणि समाजाच्या कल्याणासाठी मोठ्या प्रमाणावर काम करावे असे मी आवाहन करतो.”

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE