‘आयकिया’ महाराष्ट्रात करणार ३००० कोटी रुपयांची गुंतणूक
‘आयकिया’ महाराष्ट्रात करणार ३००० कोटी रुपयांची गुंतणूक
महाराष्ट्र बाजारपेठेसाठी पर हॉर्नेल यांची व्यवस्थापकीय संचालक म्हणून नेमणूक
आयकिया या आघाडीच्या स्वीडिश होम फर्निशिंग रिटेलरने आज एका पत्रकार परिषदेत ते भविष्यात महाराष्ट्रात करणार असलेल्या गुंतवणूक योजनांचीमाहिती दिली. त्याचबरोबर मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी उभारल्या जाणाऱ्या त्यांच्या स्टोअर्सचीही माहिती यावेळी दिली.
सुंदर आणि परवडण्याजोगी होम फर्निशिंग उत्पादने आणि तोडग्यांच्या माध्यमातून अनेकांच्या आयुष्यातला प्रत्येक दिवस अधिक चांगला आणि उत्साहवर्धक बनवणे हे आयकियाचेउद्दिष्ट्य आहे. आपली उत्पादने अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावीत आणि ग्राहकांना त्यांच्या सोयीनुसार त्यांचा अनुभव घेता यावा आणि ती विकतही घेता यावीत यासाठी कंपनीबहुविध माध्यमांचा वापर करणार आहे. भविष्यात उभारल्या जाणाऱ्या या बहुविध टच-पॉइण्टसमध्ये संकल्पनाधिष्ठित मोठ्या आकाराची आयकिया स्टोअर्स, अनुभव केंद्रे आणि छोट्याआकाराची सिटी सेण्टर स्टोअर्स आदींचा समावेश असेल. २०१९ पासून ग्राहकांना आयकियाची उत्पादने ऑनलाइनही खरेदी करता येतील.
दीर्घकालीन टप्प्यात मुंबईत अनुभव केंद्रे तसेच मल्टिफॉर्मेट स्टोअर्स उभारण्यासाठी आयकिया महाराष्ट्रात ३००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. अगदी अलिकडे आयकियानेअशी घोषणा केली की पुण्यात आयकियाच्या मालकीचे वितरण केंद्र उभारण्यासाठी येत्या दोन-तीन वर्षांत अतिरिक्त ७५० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. चाकण आणिमुंबईत आयकियाची गोदामे सध्या कार्यरत असून भारतातल्या सर्व आयकिया स्टोअर्सच्या मागण्या तात्पुरत्या पुरवतील.
पत्रकार परिषदेत आयकियाने पर हॉर्नेल यांची आयकियाच्या महाराष्ट्र बाजारपेठेचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून ओळख करून दिली. राज्यातल्या कंपनीच्या सर्व कारभाराचीजबाबदारी त्यांच्यावर असेल.
आपल्या भूमिकेबद्दल बोलताना ते म्हणाले, ‘माझ्या महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्यांचा एक भाग म्हणून आयकिया हा ब्रॅण्ड महाराष्ट्रातला सर्वात पसंत केला जाणारा आणि अर्थपूर्ण ब्रॅण्ड म्हणूननावारूपाला येण्यासाठी सर्व कामांना मी दिशादर्शन करणार आहे. विविधता आणि समावेशन या दोन बाबींमध्ये तडजोड करणे शक्य नाही आणि आम्ही सर्व पातळ्यांवर ५० टक्केमहिला कर्मचाऱ्यांचा समावेश करणार असून सर्वांना समान संधी उपलब्ध करून देणार आहोत. आयकिया रिटेल क्षमतांचा विस्तारात योगदान देईल आणि राज्यात कौशल्यविकासकार्यक्रमांना चालना देईल. आम्ही खात्रीपूर्वक सांगतो की आमचे आधुनिक रिटेलिंग ज्ञान आणि सर्वोत्तम कार्यपद्धती इथे राबवू ज्यामुळे इथल्या स्थानिक बाजारपेठेचाही विकास होईल.मुंबई ही स्वप्ननगरी आहे आणि आम्हाला या स्वप्नांचा एक भाग बनायचे आहे.’
आयकिया इंडियाचे डेप्युटी कंट्री मॅनेजर आणि सस्टेनेबिलिटी विभागाचे प्रमुख पॅट्रिक अॅण्टोनी म्हणाले, ‘भारत ही आयकियासाठी मोठी दीर्घकालीन टप्प्याची बाजारपेठ आहे. सध्याआम्ही खूप रोमांचित आहोत कारण २०१८ मध्ये आम्ही आमचे पहिलेवहिले भारतीय स्टोअर हैद्राबादमध्ये चालू करत आहोत. वेगवेगळ्या आशा-आकांक्षा आणि होम फर्निशिंग गरजाअसणाऱ्या अधिकाधिक लोकांपर्यंत आम्हाला पोहोचायचे आहे. आयकिया स्टोअर्स ही त्या पुरवत असलेल्या अनुभवासाठी सर्वत्र परिचित असल्यामुळे आम्ही मल्टिचॅनल माध्यमेस्वीकारणार आहोत जेणेकरून आयकिया भारतात सर्वांपर्यंत पोहोचेल. प्रत्येक आयकिया स्टोअरमध्ये ७०० ते ८०० थेट सह-कर्मचारी असतील ज्यातल्या ५० टक्के या महिलाअसतील. मुंबई, बंगळुरू आणि गुडगावमध्ये आम्ही अतिरिक्त तीन जागा विकत घेतल्या आहेत. पुढचे स्टोअर मुंबई, महाराष्ट्रात चालू होईल. नवी मुंबईतले हे स्टोअर २०१९ च्यामध्यावर चालू होईल.’
आयकिया आणि आयकिया इंडियाबद्दल
अनेकांचे दैनंदिन आयुष्य अधिक चांगले बनवणे हे आयकियाचे उद्दिष्ट्य आहे आणि आम्ही उत्तम डिझाइनचे, व्यावहारिक वापराचे, परवडण्याजोगे, उच्च दर्जाचे होम फर्निशिंग देतोजे लोक आणि पर्यावरणासाठी अत्यंत काळजीपूर्वक पद्धतीने बनवले जाते. सध्या ४९ देशांमध्ये ४०३ आयकिया स्टोअर्स आहेत ज्यांच्यामार्फत ३८३० कोटी युरोज इतकी विक्री होते.
Comments
Post a Comment