बजाज कॉर्पने आणले बजाज कोको जस्मिन हेअर ऑईल
बजाज
कॉर्पने आणले बजाज कोको जस्मिन हेअर ऑईल
नवे
नॉन-स्टिकी नारळ आणि जस्मिन हेअर ऑईल केस तुटण्याचे
प्रमाण तिपटीने कमी करते
हेअर ऑईल श्रेणीतील अग्रगण्य बजाज कॉर्प
लि. ने नवे बजाज कोको जस्मिन
हेअर ऑईल आणले आहे. पर्सनल केअर उत्पादनाच्या रेंजमध्ये
वाढ करत बजाज कॉर्पने भारतीय बाजारात हे नवे उत्पादन आणले आहे. तिपटीने केसांची गळती थांबविण्यासाठी नारळाचे तेल आणि ई जीवनसत्व यांचे मिश्रण
बजाज कोको जस्मिन हेअर ऑईलमध्ये करण्यात आले आहे. चांगला सुगंध
येण्यासाठी यामध्ये मोगऱ्याचा सुगंध उतरवण्यात आला आहे.
आपल्या केसांना अगदी
हलकी आणि परिणामकारक पोषण देण्याची इच्छा असणाऱ्या तरूणींसाठी बजाज कोको जस्मिन हेअर
ऑईल बनविण्यात आले आहे. केसांची गळती थांबविण्यापासून हे तेल मदत करेल आणि केसांना अधिक
आरोग्यदायी आणि मजबूत बनवेल.
या नव्या उत्पादनाबद्दल बजाज कॉर्प
विक्री आणि विपणन विभागाचे अध्यक्ष श्री. संदीप वर्मा, म्हणाले “आज
भारतीय महिलांमध्ये केसांची गळती ही दुसरी सर्वात मोठी समस्या आहे. नव्या बजाज कोको जस्मिन हेअर
ऑईलसह या समस्येसाठी परिणामकारक उपाय ग्राहकांना देण्याची आमची इच्छा आहे. आमच्या नव्या स्थापलेल्या केंद्रातून बाहेर आणलेले हे पहिले उत्पादन आहे आणि
आणण्यापूर्वी ग्राहकांकडून याचे परीक्षण करून घेण्यात आले आहे. सतत या प्रकारची नवीन उत्पादने आणण्यावर आमचा भर असेल आणि भविष्यात असेच अधिकाधिक
चांगले उत्पादन आम्ही घेऊन येऊ.”
नव्या हेअर ऑईलमध्ये
तीन घटकांवर भर देण्यात आला आहे – नारळ, मोगरा आणि जीवनसत्त्व ई.
नारळाचे तेल तुमच्या केसांना पोषण देते, प्रथिनांचा
नाश होणे कमी होते आणि तुमच्या केसांना नैसर्गिक कंडिशनिंग मिळून चांगली चमक येते.
त्यातील मोगऱ्याचा अंश तुम्हाला शांत करण्यासाठी परिणामकारक ठरतो.
तेलातील ई जीवनसत्त्व केसांना निरोगी आणि मजबूत राहण्यासाठी आणि केस
तुटण्यापासून वाचण्यासाठी मदत करते.
बजाज कॉर्प लि. संदर्भात :
बजाज कॉर्प लि. हा शिषिर बजाज ग्रुप ऑफ कंपनीचा
भाग असून भारतातील एफएमसीजी कंपन्यांच्या अग्रगण्य कंपनीपैकी एक आहे. ज्यांचे बजाज आमंड्स ड्रॉप्स हेअर ऑईल, बजाज ब्राम्ही
आमला हेअर ऑईल, बजाज हेअर ऑईल आणि नोमार्क्स अॅण्टी-मार्क्स क्रीम्स हे ब्रॅन्ड्स प्रसिद्ध आहेत. देशातील
३८ लाखांपेक्षा अधिक दुकानांमध्ये त्यांची उत्पादने उपलब्ध आहेत.
Comments
Post a Comment