हिताची “इंटरनॅशन एलिव्हेटर अॅण्ड एस्केलेटर एक्स्पो २०१८”मध्ये प्रदर्शित करणार आपले अत्याधुनिक तंत्रज्ञान
हिताची “इंटरनॅशन एलिव्हेटर अॅण्ड एस्केलेटर एक्स्पो २०१८”मध्ये प्रदर्शित करणार आपले अत्याधुनिक तंत्रज्ञान
पीपल फ्लो अॅनालिसिस तंत्रज्ञानावर चर्चासत्र होणार आणि थ्रीलिव्हेटर या जगातील सर्वाधिक वेगवान तंत्रज्ञानावर सादरीकरण केले जाणार
हिताची लिमिटेड (टीएसई:६५०१ “हिताची”), हिताची बिल्डिंग सिस्टम्स को. लिमिटेड (“हिताची बिल्डिंग सिस्टम्स”) या जपान, आशिया आणि आखाती देशांत इलिव्हेटर आणि एक्सलेटर व्यवसाय करणाऱ्या कंपन्या आणि हिताची लिफ्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (“हिताची लिफ्ट इंडिया”) ही भारतातील एलिव्हेटर आणि एक्सलेटर विक्री व सेवा कंपनी भारतात मुंबई येथे बॉम्बे कन्व्हेन्शन अॅण्ड एग्झिबिशन सेंटरमध्ये २७ फेब्रुवारी ते एक मार्च दरम्यान होणाऱ्या “इंटरनॅशनल एलिव्हेटर अॅण्ड एक्सलेटर एक्स्पो २०१८”मध्ये (आयईई एक्स्पो २०१८) हिताचीच्या एलिव्हेटर्स आणि एक्सलेटर्समधील सुरक्षितता व आरामदायीपणाच्या नवीन तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करणार आहेत तसेच या नवीन तंत्रज्ञानावर एक चर्चासत्र तसेच सादरीकरणही घेणार आहेत. हिताचीने आज ही घोषणा केली.
या काळात कन्व्हेन्शन सेंटरमधील चर्चासत्रांच्या विभागात हिताचीचे जपानमधील इंजिनीअर हिताचीच्या पीपल फ्लो अॅनालिसिस तंत्रज्ञानावर एक चर्चासत्र घेतील. या तंत्रज्ञानामध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या आणि नियोजित इमारतीमध्ये एलिव्हेटर वापरणाऱ्या लोकांचा ओघ (फ्लो) किती असेल हे लक्षात घेऊन एक तदनुरूप प्रतिकृती (सिम्युलेशन) स्थापत्य आराखड्यात तयार करते. इमारतीतील वाहतुकीची रूपरेखा निश्चित करण्यात याचा उपयोग होतो.
जगातील सर्वांत वेगवान(1) एलिव्हेटर तंत्रज्ञान आणि वापरकर्त्यांना वापर सुलभ करून देणारे “फिबी®” ही एलिव्हेटर डेस्टिनेशन फ्लोअर रिझर्व्हेशन प्रणाली यांबाबत हिताची बूथवर सादरीकरण दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे “सीरिज यूएजी-एसएन१” या मशिन रूम लेस एलिव्हेटरचे तसेच ऑगस्ट २०१७ मध्ये लाँच झालेल्या टीएक्स सीरिज या नवीन एस्कलेटर मॉडेलचे मॉक-अपही येथे देण्यात येईल.
हिताचीचा भारतातील एलिव्हेटर आणि एस्कलेटर व्यवसाय
हिताचीने जानेवारी २००८ मध्ये हिताची लिफ्ट इंडिया या कंपनीची स्थापना केली आणि तेव्हापासून कंपनी लक्झ्युरी निवास, हॉटेल्स आणि कार्यालयांमध्ये वेगवान एलिव्हेटर्सची सुविधा पुरवत आहे. मुंबईत हिताची लिफ्ट इंडियाने २००८ मध्ये कार्यालय सुरू केले. कंपनीने विक्री, स्थापन (इन्स्टॉलेशन) आणि देखभाल सेवांचा विस्तार केला. हिताची लिफ्ट इंडियाचे कार्यक्षेत्र आता नवी दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, चेन्नई, पुणे, अहमदाबाद आणि हैदराबाद या सात मोठ्या शहरांमध्ये विस्तारले आहे. १,२६० मीटर प्रति मिनिट या जगातील सर्वाधिक वेगाने प्रवास करणाऱ्या आपल्या एलिव्हेटर्सचे तंत्रज्ञान भारतीय बाजारपेठेत आणून उच्च कार्यात्मकता व सुरक्षितता असलेली उत्पादने पुरवण्यात हिताची योगदान देणार आहे.
Comments
Post a Comment