मायक्रोसॉफ्ट चा नवीन सरफेस प्रो लॅपटॉप भारतात दाखल
मायक्रोसॉफ्ट चा नवीन सरफेस प्रो लॅपटॉप भारतात दाखल
जगातील वैविध्यपूर्ण ( परिपूर्ण ) लॅपटॉप अधिकृत किरकोळ विक्रेते आणि व्यावसायिक पुनर्विक्रेत्यांसाठी उपलब्ध
मायक्रोसॉफ्टचा नवीन सरफेस प्रो लॅपटॉप आणि एक्सेसरीज भारतातील ऑनलाइन स्टोअर्स (ऍमेझॉन आणि फ्लिपकार्ट) तसेच क्रॉमा, रिलायन्स, विजय सेल्स आणि इतर अधिकृत भारतातील किरकोळ विक्रीसाठी उपलब्ध असल्याची अधिकृत घोषणा आज मायक्रोसॉफ्टने केली. व्यावसायिक ग्राहकांसाठी आणि व्यावसायिक पुनर्विक्रेत्यांसाठी हा नवीन सरफेस प्रो लॅपटॉप उपलब्ध असेल. वेगळ्या दर्जाच्या बॅटरीसह या सरफेस प्रो लॅपटॉपचे विशेष डिझाईन करण्यात आले आहे. राऊंड एज कॅमेरा हे या लॅपटॉपटचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. केवळ ८.५ एमएम जाडीच्या या लॅपटॉपचं वजन अवघं ७६७ ग्रॅम आहे.इंटेल कोअर प्रोसेसर पॉवर असणाचे रूपांतर नवीन फॅनलेस २ विस्पर क्वाईट डिझाईनमध्ये करण्यात आले आहे.
स्लिम आणि कमी वजनाच्या या नव्या लॅपटॉपची बॅटरीची कार्यक्षमता साडे १३ तासांची आहे. विंडोज अँड डिव्हाईस मायक्रोसॉफ्ट इंडियाचे संचालक श्री.विनीत दुरानी म्हणाले की, “ आमच्या ग्राहकांना अधिकाधिक उत्तम दर्जाची सेवा मिळावी यासाठी आम्ही सतत आग्रही, प्रयत्नशिल असतो. लॅपटॉप वापरण्यासाठी हलका आणि अधिक बॅटरी बॅकअप देणारा असावा यासाठी आम्ही अनेक वर्षं संशोधन करत होतोच. त्याचंच फलित मायक्पोसॉफ्टचा हा नवीन सरफेस प्रो लॅपटॉप. ”
हा केवळ एक पॉवरहाऊस लॅपटॉपच नाही तर मोबाईल क्रिएटीव्ह स्टुडिओही आपण त्याला म्हणू शकतो.१२.३ पिक्सलसेन्सचा टच डिस्प्ले आपण सरफेस पेनद्वारे हाताळू शकतो.नवीन मायक्रोस़ॉफ्ट व्हाईटबोर्ड ऍपसह विंडोज १० आणि मायक्रोसॉफ्ट ऑफिस ३६५४ यात आहे. याचा डिस्प्ले १६५ अंशांमध्ये फिरू शकतो.तुम्ही स्टुडिओ मोडवर टाकून हवं ते करा. त्यावर लिहा, चित्र काढा अगदी काहीही. सरफेस पेन चांदी आणि चारकोलच्या रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. लॅपटॉपवर टाईप करणासाठी सुंदर किबोर्ड आणि माऊस पॅड देण्यात आला आहे.
Comments
Post a Comment