उद्योजक जसपाल सिधु यांनी भारतात आणला सिंगापूर अभ्यासक्रम
उद्योजक जसपाल सिधु यांनी भारतात आणला सिंगापूर अभ्यासक्रम
सिंगापूर येथील लोकप्रिय शैक्षणिक उद्योजक जसपाल सिधु यांनी सिंगापूर ग्रुप ऑफ स्कूल्सचे प्रारूप बेंगळुरूच्या आयएफआयएमइन्स्टिट्युशन्सच्या सहयोगाने भारतात आणून, विजयभूमी आंतरराष्ट्रीय शाळेची घोषणा केली आहे. ही शाळा म्हणजे जसपाल यांचा भारतातील पहिला उपक्रम आहे.
आयएफआयएम इन्स्टिट्यूशन्स हे दक्षिण भारतातील उच्चशिक्षणाच्या क्षेत्रातील अग्रगण्य नाव असून, त्यांच्याकडे दोनदशकांचा अनुभव आहे. या उपक्रमातून संस्थेने आपले कार्यक्षेत्र विस्तारत दर्जेदार व कौशल्याधारित प्रशिक्षणावर आधारितप्राथमिक शिक्षणाच्या क्षेत्रातही प्रवेश केला आहे. जसपाल सिधु हे नाव दक्षिण आशियामध्ये शिक्षणक्षेत्रात सर्वपरिचितअसून, विजयभूमी आंतरराष्ट्रीय शाळा स्थापन करून सिधु भारतातील शिक्षणक्षेत्रात प्रवेश करत आहेत. ही शाळामुंबईजवळ कर्जत येथे स्थापन करण्यात येणार आहे.
“भारतामध्ये प्रतिभेचा मोठा खजिना असला तरी उद्योगाशी सुसंगत प्रशिक्षणाच्या अभावाचा फटका या क्षेत्राला बसतआहे. यावर उपाय म्हणजे प्राथमिक शिक्षणाच्या स्तरावरच प्रशिक्षणाच्या प्रणालीत बदल करून विद्यार्थ्यांनी सर्वप्रथमसंकल्पना शिकणे हा आहे. याच वैशिष्ट्यामुळे सिंगापूर अभ्यासक्रम अन्य अभ्यासक्रमांच्या तुलनेत वेगळा आहे. कारण, तोविद्यार्थ्यांना कौशल्य बांधणीवर लक्ष केंद्रित करून त्यांना रस वाटेल असे विषय शिकण्याची मुभा देतो. अध्ययन हीसवय व्हायला हवी, त्याची सक्ती नको,” असे विजयभूमी आंतरराष्ट्रीय शाळेच्या स्थापना सोहळ्यात जसपाल सिधुम्हणाले.
“भविष्यकाळातील पिढी ही समस्या सोडवणाऱ्यांची असून ४.० औद्योगिक युगात ही पिढी योगदान देणार आहे. म्हणूनच,विद्यार्थ्यांना संकल्पनाधारित अध्ययन करता येईल अशी प्रशिक्षण प्रणाली आता आवश्यक आहे. जगभरातील अन्यप्रणालींशी तुलना करता भारतातील शिक्षण प्रणाली खूपच मागे आहे. अधिक चांगल्या अध्ययन पद्धती स्वीकारणे ही आताकाळाची गरज झाली आहे,” असे सेंटर फॉर डेव्हलपमेंट एज्युकेशनचे (सीडीई) सचिव संजय पदोडे म्हणाले.
आर्थिक सहकार्य आणि विकास संस्थेचा आंतरराष्ट्रीय विद्यार्थी मूल्यमापन कार्यक्रम (पीआयएसए) तसेच ट्रेण्ड्स इन इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स अॅण्ड सायन्स स्टडी(टीआयएमएसएस) यांच्या चाचण्यांनुसार सिंगापूर अभ्यासक्रमाला जगातील सर्वोत्तम शैक्षणिक पद्धत म्हणून मान्यता देण्यात आली आहे. हा अभ्यासक्रमाच्याकेंद्रस्थानी जीवनव्यवहार असून विद्यार्थ्यांना पुढे जबाबदार आणि सक्रिय नागरिक म्हणून जगताना आवश्यक ती मूल्ये व कौशल्ये शिकता येतील याची खात्रीकरणारी ही प्रणाली आहे.
विजयभूमी आंतरराष्ट्रीय शाळा ही एक सप्ताह तसेच सत्रावर आधारित निवासी शाळा असून, क्रीडा व सृजनशील कलांवर तसेच अनुभवातून शिक्षण घेण्यावर याशाळेचा भर आहे. सिंगापूर अभ्यासक्रमानुसार योग्य दर्जाचे शिक्षण देण्याच्या दृष्टीने येथील शिक्षकांनाही प्रशिक्षण दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांना संकल्पनात्मकअध्ययन पद्धतींच्या आधारे ज्यात रस वाटेल त्या विषयांचे शिक्षण घेता येईल, असे वर्गातील वातावरण असेल.
या शाळेसाठी प्रवेश प्रक्रिया जुलै २०१८पासून सुरू होणार आहे.
Comments
Post a Comment