एमजी मोटरची २०१९ पर्यंत देशभरात १३० दालने उघडण्याची योजना

एमजी मोटरची २०१९ पर्यंत देशभरात १३० दालने उघडण्याची योजना
 एमजी मोटर इंडियाने (मॉरिस गॅरेजेस) आज भारतीय बाजारपेठेकरिता आक्रमक व्यवसाय योजनांची घोषणा केली. देशात विस्तार करण्याच्या योजनेच्या आपल्या पहिल्या टप्प्यात एमजी मोटर इंडियाची २०१९ पर्यंत १३० दालने उघडण्याची योजना असून २०२२ पर्यंत ३०० हून अधिक केंद्रे उभारण्याचा त्यांचा मानस आहे. ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाचा एक भाग म्हणून भारतातील संचालनासाठी एमजी मोटर इंडिया येत्या ५ ते ६ वर्षात भारतीय बाजारपेठेत ५००० कोटींची गुंतवणूक करणार आहे. सध्या ते आपला हालोल येथील प्लान अपग्रेड करत आहेत ज्यामध्ये एक प्रेस शॉपचे बांधकाम, असेम्ब्ली लाईन्स व इतर सुविधांचे रीटूलिंग सामील आहे. येत्या पाच वर्षात ४ ते ५ मॉडेल्स लॉन्च करण्यासह २०२३ पर्यंत २००,००० गाड्या विकण्याचे ध्येय आहे.


देशात पहिला डीलरशिप सोहळा आयोजित करून एमजी मोटर इंडियाने भारतीय बाजारपेठेशी असलेली आपली वचनबद्धता आणखी दृढ केली. या कार्यक्रमाचा उद्देश भारतातील आपल्या संचालनासाठी योग्य भागीदारांची निवड करणे हा होता. ११ मार्च २०१८ रोजी प्रवेशिका सुरू झाल्यापासून त्यांच्या संकेतस्थळावर २००० पेक्षा अधिक संभाव्य डीलर्सची नाव नोंदणी झाली होती. एमजी मोटरच्या भारतातील विकास धोरणात मुंबईच्या फायदेशीर ऑटोमोबाइल बाजारपेठेस महत्त्वाचे स्थान आहे. जून २०१९ मध्ये विक्री सुरू होईल, तोपर्यंत मुंबईत कमीत कमी २ ते ३ दालने असावीत अशी त्यांची योजना आहे. या दालनांच्या मार्फत एमजी मोटर भारतातील आपले पहिले उत्पादन प्रीमियम एसयूव्हीची विक्री करेल. कंपनी आपल्या वाहनांमध्ये ८०% स्थान-अनुकूल वैशिष्ट्ये असावीत यासाठी प्रयत्न करत आहे, जेणेकरून एमजी गाड्यांच्या मालकांना त्यांच्या पैशाचे पुरते मूल्य मिळेल,या उत्पादनांना एक चांगली प्रतिमा मिळेल आणि बाजारपेठेत या उत्पादनाचा आगळा ठसा उमटेल.
एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव चाबा म्हणाले,‘आमचे उद्दीष्ट प्रिमियम इमेज आणि उत्कृष्ट मूल्य घेऊन आधुनिक आणि अगदी चालू काळातील वाहने प्रदान करणे आहे. कर्मचारी आणि वैविध्यपूर्णता यावर आमचा मुख्य फोकस असतोच पण त्याचबरोबर आमचे डीलर्स हे ग्राहकांसाठी एमजी मोटरचा चेहरा असतात म्हणून त्यांच्यासाठी देखील आम्ही एक सिद्धान्त मांडला आहे. ‘एकत्रित विकास (टुगेदर वुई ग्रो) या थीम भोवती फिरून आमचे डीलर धोरण व्यवसायात व्यावहारिक दृष्टिकोन आणण्यावर लक्ष केन्द्रित ठेऊन संपूर्ण पारदर्शकता आणि परस्पर आदर यांचा समावेश करते.”
याव्यतिरिक्त एमजी मोटरने विद्युत वाहने भारतात आणण्यासाठी एका योजनेची रूपरेषा तयार केली आहे. हा प्रतिष्ठित ब्रॅंड सध्या भारतात विद्युत वाहनांकरिता वातावरणाची अनुकूलता आणि मॉडेलच्या व्यावहारिकतेचा अभ्यास करत आहे.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE