ओकिनावाचा महाराष्ट्रात विस्तार

ओकिनावाचा महाराष्ट्रात विस्तार
~ संगमनेर येथे दाखल केले दुसरे डीलरशिप स्टोअर ~
 ओकिनावा ऑटोटेक या भारताच्या वेगाने विकसित होणा-या इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादन कंपनीने मात्रोश्री मोटर्सच्या डीलरशिपखाली महाराष्ट्रात संगमनेर येथे आपले शोरूम सुरु केले आहे. या शोरूमच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी कृषि आणि शिक्षण मंत्री श्री. बाळासाहेब थोरात उपस्थित होते. या शोरूममध्ये ओकिनावाच्या ई-वाहनांची संपूर्ण श्रेणी उपलब्ध आहे आणि ई-वाहनांच्या विविध फायद्यांबाबत जागरूकता पसरविणे हा त्यांचा उद्देश आहे. या शोरूममध्ये ओकिनावाने अलीकडे सादर केलेल्या रिज आणि प्रेज गाड्या विविध आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहेत. या शोरूमद्वारे ओकिनावाच्या राज्यातील एकूण शोरूम्सची संख्या २० झाली आहे.
हे शोरूम शहरातील महत्वाच्या भागात असून त्यात उत्तमरित्या प्रशिक्षित आणि जाणकार कर्मचारी नेमले आहेत. ओकिनावाच्या उत्पादनांबद्दल किंवा एकूणच विद्युत वाहनांबद्दल खरेदी करणा-यांना ज्या काही शंका असतील, त्यांचे निरसन करण्यास पर्याप्त ज्ञान या कर्मचा-यांकडे आहे.
ओकिनावा ऑटोटेकचे व्यवस्थापकीय संचालक श्री. जीतेंदर शर्मा म्हणाले, “ई-वाहनांबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या आणि ई-स्कूटर खरेदी करू इच्छिणा-यांना ही वाहने सहज उपलब्ध करून देण्याच्या ओकिनावाच्या व्हिजनला अनुसरूनच हे शोरूम उघडण्यात आले आहे. आमच्या वाहनांना मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतरशोरूम्सचे आणि फ्रँचाइजचे नेटवर्क विकसित करणे आणि अधिकाधिक ग्राहकांना ओकिनावाची वाहने सहज उपलब्ध करून देणे हे अधिकच महत्त्वपूर्ण झाले आहे.”
भारतात विद्युत वाहन क्रांती सुरू करण्याच्या बाबतीत ओकिनावा आघाडीवर आहे. ही कंपनी अशा स्कूटर सादर करते, ज्या एकाच वेळी परफॉर्मन्स, आराम, सुरक्षा, बचत आणि त्याच बरोबर पर्यावरणीय सुरक्षा प्रदान करते. या कंपनीचा उद्देश भारतातील विविध शहरांमध्ये आणखीन शोरूम्स आणि डीलरशिप सुरू करून स्थानिक डीलर्सशी चांगले संबंध प्रस्थापित करून आपल्या उत्पादनाचा प्रसार करणे हा आहे.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE