नोव्हो ६५ एचपी आणि ७५ एचपी ट्रॅक्टर्स बाजारात दाखल
नोव्हो ६५ एचपी आणि ७५ एचपी ट्रॅक्टर्स बाजारात दाखल
महिंद्रा अॅंड महिंद्रा कंपनीच्या शेतीपूरक यंत्रसामग्री ('फार्म एक्विप्ड सेक्टर' -एफईएस) निर्मिती कंपनीतर्फे 'नोव्हो ६५ एच.पी.' आणि 'नोव्हो ७५ एच.पी.' क्षमतेच्या नवीन ट्रॅक्टर्सची घोषणा करण्यात आली. महिंद्राचे हे नवीन नोव्हो ट्रॅक्टर्स अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असून त्याची रचना स्लायलिश आहे. या ट्रॅक्टर्सची किंमत ६५ एछपी, २ डब्ल्यूडीसाठी ९ लाख ९९ हजार रुपये एवढी असून ७५ एच.पी. ४ डब्ल्यू डी क्षमतेच्या ट्रॅक्टर्ससाठी ग्राहकांना १२ लाख ५० हजार रुपये मोजावे लागणार आहेत. या किंमती 'एक्स महाराष्ट्र' आहेत.
भारतामधील शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन 'महिंद्रा'ने या 'नोव्हो' ट्रॅक्टर्सची निर्मिती केली आहे. 'ओपन स्टेशन इंजिन' गटामध्ये हा ट्रॅक्टर २ डब्ल्यू डी आणि ४ डब्ल्यू डी श्रेणीमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे.
'महिंद्रा रीसर्च व्हॅली'च्या चेन्नई येथील जागतिक संशोधन आणि विकास केंद्रामध्ये या नव्या युगाच्या ट्रॅक्टरची रचना आणि निर्मिती करण्यात आली आहे. देशभरामधील शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करणे हे 'महिंद्रा नोव्हो'चे ध्येय आहे. तंत्रज्ञान, आरामदायी सेवा आणि एरगोनॉमिक्समधील नवीन मापदंडामुळे 'महिंद्रा नोव्हो' भारतामधील शेती उद्योगाचे चित्रच पालटणार आहे. या ट्रॅक्टरमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न तसेच त्यांची कार्यक्षमता वाढणार आहे. त्यामुळे त्यांची समृद्धी होणार आहे.
'महिंद्रा अॅंड महिंद्रा'च्या शेती उपकरणे विभागाचे अध्यक्ष श्री. राजेश जेजुरीकर म्हणाले, "शेतकऱ्यांपर्यंत पोचेल असे तंत्रज्ञान निर्मिणे हा आमचा उद्देश आहे. त्याद्वारे जगभरातील शेकऱ्यांचे आयुष्य बदलून जाईल. 'फार्मिंग ३.०' या उपक्रमाचा फोकस तंत्रज्ञानावर असून उत्तम दर्जाचे शेती सेवासुविधा पुरविणे हा उद्देश आहे. भारतीय शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन आम्ही ६५ ते ७५ एच.पी. गटामधील नोव्हो ट्रॅक्टर मालिका सादर केल्याचा आम्हाला अभिमान आहे. शेती उद्योगात हे ट्रॅक्टर नवीन मापदंड निर्माण करतील याची आम्हांला खात्री आहे. लवकरच आम्ही भारतामधील इंटिग्रेटेड केबिनची सुविधा असलेले जागतिक पातळीवरचे प्रॉडक्ट सादर करू."
देशभरातल्या १२ राज्यांमधील शेतकऱ्यांची मते घेऊन 'महिंद्रा नोव्हो'चे हे ट्रॅक्टर निर्मिण्यात आले आहेत. 'महिंद्रा नोव्हो'च्या या जन्मप्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे येथील ट्रॅक्टर्सना ८ राज्यांमधील ३७ केंद्रांवर २५ हजार तासांची चाचणी द्यावी लागते. ट्रॅक्टर निर्मिती क्षेत्रामधील सध्याच्या निकषांनुसार हा सर्वात मोठा चाचणी कार्यक्रम आहे. या चाचणीमधून आलेल्या निकालानुसार 'महिंद्रा नोव्हो'ची रचना तयार झाली आहे. या ट्रॅक्टर मालिकेमध्ये 'महिंद्रा नोव्हा'ने अनेक नवीन आधुनिक तंत्रज्ञान आणि सेवासुविधा असलेले ट्रॅक्टर बाजारात आणले आहेत. त्याचा लाभ कृषी क्षेत्रामधील शेकऱ्यांना पीकवृद्धी आणि चांगल्या नियोजनासाठी होणार आहे.
'द महिंद्र ग्रुप' हा १९ अब्ज डॉलर्सचा असून तो विविध कंपन्यांनी समृद्ध झाला आहे. या ग्रुपमुळे देशातील ग्रामीण भागाचा कायापालट झाला असून लोकांचे जीवनमान उंचावले आहे. वाहननिर्मिती, माहिती आणि तंत्रज्ञान, वित्तीय सेवा, पर्यटन या क्षेत्रांबरोबरच ही कंपनी जगभरात ट्रॅक्टर निर्मितीमध्येही अग्रेसर आहे. कृषी, अंतरीक्ष, खासगी वाहने, काम्पोनंट्स, संरक्षण, लॉजिस्टिक्स, रियल इस्टेट, पुर्नऊर्जा, स्पीडबोट्स आणि लोखंड निर्मिती क्षेत्रामध्येही ही कंपनी काम करते. शंभराहून अधिक देशांमध्ये कार्यरत असलेल्या या कंपनीचे मुख्यालय भारतात असून २ लाख ४० हजार कर्मचारी कार्यरत आहेत.
Comments
Post a Comment