दिमाखात रंगला ‘लग्न मुबारक’ चा ट्रेलर आणि म्युझिक लौंच सोहळा
दिमाखात रंगला ‘लग्न मुबारक’ चा ट्रेलर आणि म्युझिक लौंच सोहळा
चेतन चावडा आणि सागर पाठक लिखित आणि दिग्दर्शित ‘लग्न मुबारक’ आज समाजामध्ये धर्माचं, जातीपातीचं जे काय राजकारण खेळलं जातं त्यामुळे अनेकांचे नुकसान झालं आहे, काही लोक धर्माचा-जातीचा वैयक्तिक फायद्यासाठी कसा वापर करून घेतात या गोष्टीवर भाष्य करतो. तेरे होठों पे मेरा नाम, जैसे हर मस्जिद में श्रीराम’ आणि ‘जहाँ भी देखू तेरा चेहरा नजर आता है, जैसे हर मंदिर में अल्लाह बसता है’ अशा हटके शायराना अंदाजातील टीजरमुळे ‘लग्न मुबारक’ची वाढलेली उत्सुकता या ट्रेलर मुळे अधिकच वाढली आहे.
या सिनेमामध्ये सिनेमॅटोग्राफर, दिग्दर्शक संजय जाधव यांच्यासह अभिनेत्री प्रार्थना बेहरे, संस्कृती बालगुडे, आस्ताद काळे, प्रवीण तरडे, मिलिंद दास्ताने, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, वंदना वाकनीस, अमरनाथ खराडे, पार्थ घाटगे, चेतन चावडा, गौरव रोकडे अशी स्टारकास्ट आहे, तर सिद्धांत मुळे, हा फ्रेश चेहरा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. याशिवाय अभिनेते महेश मांजरेकर विशेष भूमिकेत दिसणार आहेत.
‘लग्न मुबारक’ ची गाणी संगीतकार साई – पियुष, ट्रॉय अरिफ यांनी स्वरबद्ध केली असून अक्षय कर्डक गीतकार आहेत. गायक आदर्श शिंदेच्या आवाजातील ‘वन्स मोर लाव’ या गीताला तरूणाईने आधीच डोक्यावर घेतले आहे. तसेच विविध जॉनरचे संगीत यामध्ये आहे.
‘लग्न मुबारक’ या सिनेमाची निर्मिती गौरी पाठक यांची असून अभय पाठक आणि अजिंक्य जाधव प्रस्तुतकर्ते, तर सुमित अगरवाल, राहुल सोनटक्के, मछिंद्र धुमाळ,सुरज चव्हाण आणि जयेश दळवी चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. हा चित्रपट येत्या ११ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
Comments
Post a Comment