हार्टफूलनेस इन्स्टिट्यूटच्या यशात आणखी एक मानाचा तुरा, १,००० वृक्षांचे पुनर्रोपण व विस्थापन
हार्टफूलनेस इन्स्टिट्यूटच्या यशात आणखी एक मानाचा तुरा,
१,००० वृक्षांचे पुनर्रोपण व विस्थापन
तामिळनाडू येथील करूर जिल्ह्यातील १२० नारळाच्या झाडांचे हैद्राबाद येथील कान्हा शांती वनम येथे नुकतेच यशस्वीरित्या विस्थापन व पुनर्रोपण केले गेले.
हैद्राबाद स्थित हार्टफूलनेस इन्स्टिट्यूट (www.heartfulness.org) या संस्थेने आपल्या यशोगाथेत आणखी एक विक्रम रचला असून संस्थेने केवळ एका वर्षभरात १,००० हून अधिक वृक्षांचे पुनर्रोपण व विस्थापन केले आहे. या उपक्रमांतर्गत, तामिळनाडूमधल्या करूर जिल्ह्यातल्या १५ वर्षांपूर्वीच्या १२० नारळाच्या झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले. नुकत्याच यशस्वी झालेल्या वृक्षांच्या तुकडीत ६० झाडांचा समावेश करण्यात आला असून हैद्राबाद येथील नवीन परिसरात या झाडांची नव्याने लागवड करण्यात हार्टफूलनेस या संस्थेला यश आले आहे. केवळ झाडांचे विस्थापन व पुनर्रोपणच नव्हे,तर त्यांची मशागत करणारा हा आगळावेगळा उपक्रम हाती घेणारी ही पहिलीच संस्था ठरली आहे. प्रत्येक वृक्षाच्या अस्तित्वाच्या कालावधीत विशिष्ट असे फायदे दडलेले असतात. या वृक्षांचे आयुष्य वाढवून संस्थेने दीर्घकाळासाठी पृथ्वीला हे फायदे करून देण्याची मोहीम हाती घेतली आहे.
संस्थेच्या यशाबाबत बोलताना हार्टफूलनेस संस्थेचे चौथे जागतिक मार्गदर्शक कमलेश पटेल ऊर्फ दाजी म्हणाले, “झाडे ही पृथ्वीवरची एकमेव महत्वाची संपत्ती आहे. त्यांची भूमिका आणि उपयोग हा मोजण्याच्या आपल्या समजुतीच्याही पलीकडे आहे. केवळ भौतिकदृष्ट्या आपला ग्रह वाचवण्यापलीकडे, झाडांमुळे आत्मिक समाधानही जतन होत असून यामुळे मानसिक शांती लाभते आणि विविध पातळ्यांवर आवश्यक असलेले संतुलन साधले जाते. म्हणूनच, झाडांची संख्या वाढणे अत्यावश्यक असून सध्या अस्तित्वात असलेले वृक्ष नामशेष होण्यापासून वाचवणे सर्वांत महत्वाचे आहे. एक झाड आपण वाचवू शकलो, तर अशी शेकडो नवीन झाडे लावल्यासारखेच आहे.’’
परिपक्व झाडांचे विस्थापन व पुनर्रोपण ही प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची, तांत्रिकदृष्ट्या किचकट आणि महागडी आहे. विकासाच्या कारणांसाठी बऱ्याचदा झाडांचे विस्थापन केले जात असून त्या झाडांचे आयुष्य सुरक्षित रहावे, यासाठी ती अत्यंत काळजीने हाताळणेही आवश्यक असते. झाडापासून ४ ते ५ फूट परिघातली माती खोलवर खणली जाते आणि त्यानंतर झाडांची नाजूक मूळे कापली जातात. मग, मोठ्या प्रमाणात माती साठवून त्यासकट ही झाडे विस्थापनासाठी संबंधित वाहनात भरण्यात येतात.
वृक्षांभोवती माती धरून ठेवणे अवघड आहे. त्यामुळे, झाडांभोवतीची माती सुटलेली नाही तसेच, मूळे खराब झालेली नाहीत याची खात्री करून घेण्यासाठी वाहतूकीदरम्यान अत्यंत काळजी घेतली जाते. जिथे त्या वृक्षांचे विस्थापन व पुनर्रोपण करायचे आहे, त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर, झाडांना हळुवारपणे मूळ मातीसह मोठ्या तयार खड्डावर ठेवण्यात येते. त्यानंतर सखोल निरीक्षणासह, काळजीपूर्वक रूट प्रमोटर्स आणि जलधारकांसह (हायड्रोजेल) खड्डा तयार होईपर्यंत खणले जाते व झाकलेल्या झाडाचे रोपण केले जाते. ही प्रक्रिया यशस्वी झाल्यास या नव्या जागेत झाड रुजण्यासाठी १ ते २ महिने लागतात.
हार्टफूलनेस इन्स्टिट्यूटमध्ये सुरू असलेला ग्रीन कान्हा प्रकल्प म्हणजे सतत विनाशाला तोंड देणाऱ्या झाडांचे संरक्षण करणारा आधुनिक उपक्रम आहे. या अंतर्गत, अनेक वृक्षांची मोठ्या प्रमाणावर नव्याने लागवड करण्यात आली आहे. सरकार, कॉर्पोरेट कंपन्या आणि समाजसेवकांसह एकत्रितपणे कार्य करण्याची योजना संस्थेने आखली असून याबाबत दाजी म्हणतात, “आज आपण ज्या धोकादायक परिस्थितीला तोंड देत आहोत, ती परिस्थिती क्षीण होण्यास केवळ एका सामूहिक प्रयत्नातून मदत होऊ शकते. त्या दृष्टीने, हार्टफुलनेस इन्स्टिट्यूटने एक महत्त्वपूर्ण पाऊल पुढे टाकले असून या कार्यात आपल्याला राज्य सरकार,महापालिका आणि व्यक्तीगतरित्या वृक्षांची बचत करण्यासाठी मदत मिळू शकेल, अशी आम्हाला आशा आहे.’’
प्रत्येक वर्षी, देशभरात लाखो वृक्षांची कत्तल केली जाते. यातून मोठा पर्यावरणीय असमतोल निर्माण होत असून परिणामी, आपल्या ग्रहाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे राहणार आहे. झाडांच्या अंधाधुंद कत्तलीमुळे पर्यावरणाचे, समाजाचे, संस्कृतीचे आणि पृथ्वीच्या सौंदर्याचेही अफाट नुकसान होते. आर्थिक नुकसानही होते. विविध अभ्यासांमधून असे सूचित होते की –
१. झाडे प्रदुषणास आळा घालतात – ५० वर्षांत एक झाड ३० टन प्रदुषके हवेतून नष्ट करू शकते.
२. ऊर्जेचे संवर्धन – एका तरुण आणि आरोग्यपूर्ण झाडाचा एकूण कुलिंग इफेक्ट हा २० तास चालणाऱ्या एका खोलीच्या आकारासाठीच्या वातानुकुलित यंत्राइतका असतो.
३. वन्यजीव, फुलपाखरे, माश्या यांना अनुकूलित जंगले पुरवून जीवसृष्टी वाचवण्याचे काम झाडे करीत असून परागणासही मदत होते.
४. इतकेच नव्हे, तर वादळे, पूर, पाणी साचून राहण्यापासून आपला बचाव झाडांमुळेच होऊ शकतो.
गेल्या तीन वर्षांत, संपूर्ण परिसर स्वयंपूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित केल्यामुळे, हार्टफूलनेस इन्स्टिट्यूटने कान्हा शांती वनमच्या खडकाळ, कोरड्या व शुष्क जमिनीचे रुपांतर हिरव्या जमिनीत केले आहे. संस्थेच्या अथक प्रयत्नांमुळे, या प्रदेशातील वृक्षांची संख्या वाढली आहे. तसेच, वनस्पतींच्या विविध जातींनाही प्रोत्साहन देण्यात आले असून पावसाच्या पाण्याची साठवण करण्यासाठी संस्थेतर्फे कृत्रिम तलावांची निर्मितीही करण्यात आली आहे. परागणाचा वेग वाढण्याच्या दृष्टीने मधमाश्यांना आकर्षित करण्यासाठीच्या यंत्रणा बसवण्यात आल्या असून फुलपाखरांसाठी विविधरंगी फुलझाडेही लावण्यात आली आहेत. या उपक्रमांमुळे, दुष्काळग्रस्त भागात गेल्या १२० वर्षांत प्रथमच चांगला पाऊस झाला व त्याचा लाभ आजुबाजूच्या गावांना मिळाला. आता या परिसराचे सौंदर्य डोळ्यांना अधिक सुखावह वाटत असून विविध प्रकारचे पक्षी येथील तलावांमध्ये विहार करतात. कान्हा शांती वनम येथील उपक्रमांमुळे येथील गावांमध्ये अनेक आर्थिक घडामोडीही घडत असून हा परिसर हिरवाईने नटला आहे.
हार्टफूलनेसबद्दल...
हार्टफूलनेस ही २० व्या शतकात शोधण्यात आलेली राजयोग ध्यानधारणेची यंत्रणा आहे. शतकभरानंतर, हार्टफूलनेस या यंत्रणेला जगभरातल्या विविध क्षेत्रातील व्यक्तींनी मान्यता दिली. यात समाजसंस्था, सरकारी विभाग, शाळा, महाविद्यालये आणि कॉर्पोरेट जगताचाही समावेश होता. अधिक माहिती www.heartfulness.org या संकेतस्थळावर मिळू शकते. १३० हून अधिक देशांतल्या हजारो कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिल्यावर लक्षावधी लोक हार्टफूलनेसचा सराव करतात. जगभरातल्या शेकडो हार्टफूलनेस केंद्रांच्या माध्यमातून हा आकडा आणखी वाढत चालला आहे.
Comments
Post a Comment