बंधन बँकेच्या निव्वळ नफ्यात वाढ


बंधन बँकेच्या निव्वळ नफ्यात चौथ्या तिमाहीत 
20.3% म्हणजे 387.9 कोटी रुपयांपर्यंत वाढ;

* 3700 एकूण बँकिंग आउटलेट असलेले भारतातील खासगी बँकांमधील सर्वात मोठे तिसरे वितरण जाळे व 2485 बँकिंग आउटलेट असलेले पूर्व व ईशान्य भारतातील सर्वात मोठे जाळे

बंधन बँक लि.च्या संचालक मंडळाने मुंबईमध्ये आज झालेल्या बैठकीत मार्च 31 2018 पर्यंतच्या आर्थिक वर्षातील ऑडिटेड आर्थिक निकालांना मंजुरी दिली. अकाउंट्स बँकेच्या वैधानिक ऑडिटर्सच्या ऑडिटच्या आधीन आहेत.  
ठळक वैशिष्ट्ये :
Ø  ठेवींमध्ये वार्षिक वाढ 45.8% 
Ø  कर्जांमध्ये (ऑन बुक + ऑफ बुक) वार्षिक 37.4% वाढ
Ø  कासामध्ये वार्षिक 70.1% वाढ
Ø  कासा रेश्यो 34.3%
Ø  नव्या 2.6 दशलक्ष ग्राहकांचा समावेश; एकूण ग्राहक वर्ग 13.01 दशलक्ष
Ø  एमटीएम नुकसानाबाबत 21.3 कोटी रुपयांचे आरबीआय डिस्पेन्शन घेतलेले नाही
Ø  जीएनपीएमध्ये (ऑन बुक + ऑफ बुक) आर्थिक वर्ष 18 मधील तिसऱ्या तिमाहीतील 1.59% वरून आर्थिक वर्ष 18 मधील चौथ्या तिमाहीत 1.15% पर्यंत घट
Ø  भांडवल पर्याप्तता गुणोत्तर (सीआरएआर) 31.5%; टिअर 1 30.3%
मार्च 31, 2018 पर्यंतच्या तिमाहीतील ठळक वैशिष्ट्ये:
· तिमाहीत नेट इंटरेस्ट इन्कम 25.2% वाढून 863 कोटी रुपये झाले, तर अगोदरच्या वर्षातील याच कालावधीत ते 689 कोटी रुपये होते
· तिमाहीत नॉन-इंटरेस्ट इन्कम 57.4% वाढून 203 कोटी रुपये झाले, तर अगोदरच्या वर्षातील याच कालावधीत ते 129 कोटी रुपये होते
· तिमाहीत ऑपरेटिंग प्रॉफिट 32.8% वाढून 704 कोटी रुपये झाला, तर अगोदरच्या वर्षातील याच कालावधीत 530 कोटी रुपये होता
· तिमाहीत निव्वळ प्रॉफिट 20.3% वाढून 388 कोटी रुपये झाला, तर अगोदरच्या वर्षातील याच कालावधीत 322 कोटी रुपये होता 
· तिमाहीत नेट इंटरेस्ट मार्जिन 9.3% होते, तर अगोदरच्या वर्षातील याच कालावधीत ते 10.7% होते
· एकूण ठेवींच्या तुलनेत कासा रेश्यो 34.3% होता, तर अगोदरच्या वर्षातील याच कालावधीत 29.4% होता
· कासामध्ये वार्षिक 70.1% म्हणजे 6,837 कोटी रुपयांवरून 11,628 कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली
· मार्च 31, 2018 पर्यंत एकूण अॅडव्हान्सेसमध्ये (ऑन बुक + ऑफ बुक) 37.4% म्हणजे 32,339 कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली, तर मार्च 31, 2017 पर्यंत हे प्रमाण 23,543 कोटी रुपये होते
· मार्च 31, 2018 पर्यंत एकूण ठेवींमध्ये 45.8% म्हणजे 33,869 कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली, तर मार्च 31, 2017 पर्यंत हे प्रमाण 23,229 कोटी रुपये होते
· मार्च 31, 2018 पर्यंत ग्रॉस एनपीएचे प्रमाण 1.15% (ऑन बुक + ऑफ बुक), 1.25% (ऑन बुक) होते
· मार्च 31, 2018 पर्यंत नेट एनपीएचे प्रमाण 0.54% (ऑन बुक + ऑफ बुक), 0.58% (ऑन बुक) होते
· तिमाहीदरम्यान बँकेने आयपीओद्वारे 3,662 कोटी रुपये इक्विटी भांडवल उभारले
* स्रोत 10.04.2018 पर्यंतची आरबीआय एमओएफ आकडेवारी
मार्च 31, 2018 पर्यंतच्या वर्षातील ठळक वैशिष्ट्ये:
· आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये नव्या 2.6 दशलक्ष ग्राहकांचा समावेश, एकूण ग्राहकसंख्या झाली 13.01 दशलक्ष (मायक्रो बँकिंग – 10.6 दशलक्ष; नॉन-मायक्रो बँकिंग 2.4 दशलक्ष)
· मार्च 31, 2018 पर्यंतच्या आर्थिक वर्षात नेट इंटरेस्ट इन्कम 26.1% वाढून 3,032 कोटी रुपये झाले, तर अगोदरच्या वर्षातील याच कालावधीत ते 2,404 कोटी रुपये होते
 · मार्च 31, 2018 पर्यंतच्या आर्थिक वर्षात नॉन-इंटरेस्ट इन्कम 71.8% वाढून 706 कोटी रुपये झाले, तर अगोदरच्या वर्षातील याच कालावधीत ते 411 कोटी रुपये होते
· मार्च 31, 2018 पर्यंतच्या आर्थिक वर्षात ऑपरेटिंग प्रॉफिट 35.5% वाढून 2,430 कोटी रुपये झाला, तर अगोदरच्या वर्षातील याच कालावधीत 1,793 कोटी रुपये होता
· मार्च 31, 2018 पर्यंतच्या आर्थिक वर्षात नेट प्रॉफिट 21% वाढून 1,346 कोटी रुपये झाला, तर अगोदरच्या वर्षातील याच कालावधीत 1,112 कोटी रुपये होता
वर्षभरात, बँकेचा एकूण अॅडव्हान्सेसमध्ये नॉन-मायक्रो अॅडव्हान्सेसचा हिस्सा 9% टक्क्यांवरून 14% पर्यंत वाढला.
मार्च 31, 2018 पर्यंत, एकूण बँकिंग आउटलेटची संख्या 3700 होती. नेटवर्कमध्ये 936 शाखा व 2764 डोअरस्टेप सर्व्हिस सेंटरचा समावेश आहे, तर मार्च 31, 2017 पर्यंत हे प्रमाण 840 शाखा व 2443 डोअरस्टेप सर्व्हिस सेंटर होते. एटीएमची एकूण संख्या मार्च 2018 पर्यंत 460 होती, तर मार्च 17 पर्यंत 282 होती. वर्षभरात बँकेच्या कर्मचाऱ्यांची संख्या 24220 वरून 28159 झाली आहे.
कामगिरीविषयी बोलताना, बंधन बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्र शेखर घोष यांनी सांगितले: "बँकेसाठी 2017-18 हे वर्ष अतिशय चांगले होते. आम्ही यशस्वीपणे प्रारंभी समभाग विक्री केली व ती 14.6 पटीने सबस्क्राइब झाली. आम्ही मालमत्तेची गुणवत्ता, मालमत्तेतील वाढ व नफा यामध्ये सातत्य राखणार आहोत”.
बंधन बँकेविषयी
मायक्रोफायनान्स एंटीटीचे रूपांतर वैश्विक बँकेमध्ये होण्याचे बंधन बँक हे भारतातील पहिले उदाहरण आहे. बँकेला एप्रिल 2014 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेकडून तत्त्वतः मंजुरी मिळाली आणि बँकिंग नियामकाने जून 17, 2015 रोजी अंतिम मंजुरी दिली. बंधन बँकेने ऑगस्ट 23, 2015 रोजी, 24 भारतीय राज्यांत 501 शाखा, 2,022 डोअर स्टेप सर्व्हिस सेंटर्स (डीएससी) व 50 एटीएम यांच्या मदतीने कार्य सुरू केले. केंद्रीय अर्थ, कंपनी कामकाज आणि माहिती व प्रसारण मंत्री अरुण जेटली यांनी कोलकाता येथे झालेल्या भव्य समारंभात, वित्तीय व कॉर्पोरेट विश्वातील मान्यवर, नियामक व धोरणकर्ते यांच्या उपस्थितीत बँकेचे उद्घाटन केले. स्वातंत्र्यानंतर भारताच्या पूर्व भागात सुरू करण्यात आलेली बंधन ही पहिली बँक आहे.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE