जीटीडीसीचे ‘गोवामाइल्स’ हे टॅक्सी अप पुढील महिन्यात लाँचसाठी सज्ज

जीटीडीसीचे गोवामाइल्स हे टॅक्सी अप पुढील महिन्यात लाँचसाठी सज्ज
डिजिटल यंत्रणेत सहभागी होण्यासाठी २८०० परवानाधारक टॅक्सीचालक इच्छुक

गोवा पर्यटन विकास महामंडळाचे (जीटीडीसी) टॅक्सी अप गोवामाइल्स पुढील महिन्यात लाँच होण्यासाठी सज्ज झाले आहे. सध्या हे अप प्रत्यक्ष परिस्थितीत चाचणी घेण्याच्या अंतिम टप्प्यावर आहे. गोव्यातील २८०० टॅक्सी चालकांनी हे अप वापरण्यात रस दाखवला असून प्रवाशांकडून येणआरी मागणी वाढल्यानंतर चालकांच्या संख्येतही वाढ होम्याची दाट शक्यता आहे. हा प्रकल्प प्रवासाचे सोयीस्कर साधन मिळवू इच्छिणाऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा आहे.

माननीय पर्यटन मंत्री श्री. मनोहर आजगांवकर म्हणाले, गोव्यातील टॅक्सी सेवेवर आधारित अपचे लाँच टॅक्सी चालक, पर्यचक आणि स्थानिक अशा सर्व भागधारकांसाठी वाहतूक व्यवस्थेमध्ये क्रांतीकारी बदल आणणार आहे. मला खात्री आहे, की गोव्यातील सर्व पर्यटक टॅक्सी चालक या डिजिटल यंत्रणेमध्ये सहभागी होतील म्हणजे गोवा राज्य अशाप्रकारची सेवा यशस्वीपणे कार्यरत    असलेल्या इतर राज्यांच्या मागे पडणार नाही.

गोवा पर्यटन विकास महामंडळाचे (जीटीडीसी) माननीय अध्यक्ष श्री. निलेश काब्राल म्हणाले, गोव्यातील एक दशलक्ष लोकांपर्यंत पोहोचून त्यांना गोवामाइल्स या टॅक्सी अपची माहिती देण्यासाठी  आम्ही सार्वजनिक माहिती अभियान राबवणार आहोत. सर्वसामान्य लोकांकडून आम्हाला उदंड प्रतिसादाची अपेक्षा असून ते हे अप पर्यटन कारणांसाठी डाउनलोड करतील तसेच दैनंदिन प्रवासासाठी वापरतील अशी खात्री आहे.

श्री. काब्राल म्हणाले, अपवर आधारित ही टॅक्सी सेवा डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देईल, पर्यटकांसाठी प्रवास सोपा करेल, तर टॅक्सीचालकांना चांगले उत्पन्न देईल. या उपक्रमामुळे ग्राहकांना पूर्णपणे नवा अनुभव मिळेलच, शिवाय टॅक्सीचे भाडे भरणे सोपे व सुरक्षित होईल,’  असे ते पुढे म्हणाले. त्यांनी पुढे असेही सांगितले की हे पहिले असे अप आहे, जे स्थानिक गोवन टॅक्सी चालकांच्या खिशावर कोणताही परिणाम करत नाही व ते अतिशय वेगवान आणि सोयीस्कर पद्धतीने राबवले जाते. यातून त्यांनाही या डिजिटल यंत्रणेमध्ये भागीधारक बनून पर्यटकांना चांगला ग्राहकानुभव देता येतो.

उत्कर्ष दाभाडे, व्यवस्थापकीय संचालक, गोवामाइल्स म्हणाले, गोवामाइल्स प्रवाशांना परवानाधारक, व्यावसायिक टॅक्सी चालक मिळवून देण्यासाठी मदत करते. त्यांना आपण कशाचे पैसे भरत आहोत याची कल्पना येते आणि मोबाइल अपद्वारे कॅब कुठे जात आहे हे पाहाता येते. गोवामाइल्स सध्याच्या टॅक्सी कंपन्यांशी भागिदारी करून आणि त्यांच्यासोबत काम करून चालकांना जास्त ग्राहक मिळवून देण्यासाठी मदत करेल.

गोवामाइल्स हे प्रवाशांना अँड्रॉइड आणि आयओएस प्लॅटफॉर्मद्वारे मोफत डाउनलोड करता येणार आहे. प्रवाशाने टॅक्सीची विनंती केल्यानंतर सर्वात जवळची टॅक्सी ठिकाण पाहिल आणि पिकअप तसेच येण्याची वेळ निश्चित करेल. त्याचबरोबर यामध्ये लास्ट ड्रायव्हर नावाचे वैशिष्ट्य आहे, ज्याच्या मदतीने प्रवाशांना तातडीने चालकांशी कनेक्ट करता येते आणि टॅक्सीमध्ये राहिलेल्या वस्तू लगेचच मिळवता येतात.

गोवामाइल्स प्रवाशांना अशी सोय देणार आहे, जी त्यांना यापूर्वी कधीच गोव्यात मिळालेली नाही – ती म्हणजे त्यांच्या राइडला श्रेणी देण्याची सोय. जर चालकाला सातत्याने चांगली श्रेणी मिळत असेल, तर त्याला चांगला व्यवसाय मिळेल. गोवामाइल्सच्या प्रवाशांना सर्वोत्तम परवानाधारक आणि नियंत्रित चालकांद्वारे सेवा मिळवून देण्याची खात्री आम्हाला करायची आहे, असे काब्राल म्हणाले. ग्राहकांना श्रेणी देण्याची सुविधा मिळआल्याने चालकही त्यांची सेवा उंचावतील. ग्राहकांना त्यांचा आवाज मिळेल आणि यामुळे एकंदरीतच टॅक्सी व्यवसाय सुधारेल.

गोवामाइल्स राज्यभरातील टॅक्सीचा जास्तीत जास्त वापर करून ज्या ठिकाणी सेवा मिळत नाही तेथेही सेवा प्रचलित करणार आहे आणि अधिक भाडे मिळवण्यासाठी चालकांना अंदाज लावत बसावे लागते, ते होणार नाही. गोवामाइल्स प्रवाशांना चालकांशी ते कुठेही म्हणजे समुद्रकिनाऱ्यावर, शहराच्या मध्यभागी किंवा अपरिचित ठिकाणी असले, तरी त्यांच्याशी कनेक्ट करण्याची सुविधा पुरवेल.

चालकांकडून गोवामाइल्स मॉडेलचा अवलंब
शेकडो टॅक्सी चालकांनी गोवामाइल्स ड्रायव्हर उपक्रमात रस दाखवला आहे. गोवामाइल्स टीम चालकांना हे गोवामाइल्स ड्रायव्हर अप सर्वोत्तम पद्धतीने कसे वापरावे हे शिकवण्यासाठी सत्रांचे आयोजन करणार असून त्यात जनतेला चांगली सेवा कशी द्यावी आणि जास्त व्यवसाय कसा मिळवावा याचे प्रशिक्षण देणार आहे. व्यावसायिक चालक नेहमीच्या केवायसी फॉरमॅलिटीजसह गोवामाइल्स आजमावून पाहू शकतील आणि काही मिनिटांतच सेवा सुरू करू शकतील. त्यानंतर चालकांना अमर्यादित गोवामाइल्स पिकअप्स मिळतील व ते थांबेपर्यंत ही सेवा सुरूच राहील.

चालकांना शिष्टाचार, पर्यटन स्थळांची माहिती, प्राथमोपचार किट, गोव्याची संस्कृती आणि परंपरेची माहिती इत्यादींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे, ज्यामुळे त्यांना गोवा टुरिझमचे ब्रँड अम्बेसिडर म्हणून वावरता येईल. जीटीडीसी टॅक्सी चालकांच्या कुटुंबांसाठी आरोग्य विमा आणि शिष्यवृत्ती योजनाही सुरू करणार असून सर्वोत्तम श्रेणी मिळालेल्या चालकांना दर महिन्याला रोख बक्षिस दिले जाणार आहे.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE