चाकोरीबाह्य विचार- छोट्या मध्यम उद्योगांसाठी नवीन नियम
चाकोरीबाह्य विचार- छोट्या मध्यम उद्योगांसाठी नवीन नियम: आंतरराष्ट्रीय सुक्ष्म-छोट्या-मध्यम उद्योग दिनानिमित्त तज्ज्ञांनी मांडलेमत
आंतरराष्ट्रीय एमएसएमई दिनानिमित्त एडलवाईज एसएमई लेण्डिंग आणि मुंबई शेअर बाजाराने आयोजित केली तज्ज्ञांची चर्चा
“एमएसएमईज अर्थात सुक्ष्म-छोट्या-मध्यम उद्योगांनी वाढ लाभांश संधीचा अधिक चांगला लाभ घेण्यासाठी चाकोरीबाह्य विचारांचा अंगिकार करणे गरजेचे आहे,”असे मत एडलवाइज एसएमई लेण्डिंग-बीएसई दिनानिमित्त आयोजित एका चर्चेत तज्ज्ञांनी व्यक्त केले. २७ जून या भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय सुक्ष्म, लहान आणि मध्यम उद्योगदिनाचा यावर्षीचा विषय “लिमिटेड टू अनलिमिटेड- सेलेब्रिटिंग आँत्रप्रेन्युरशिप, अनलॉकिंग व्हॅल्यू” असा असून, भारतीय उद्योजकांमधील चैतन्य आणि भारताच्या यशोगाथेत त्यांनी दिलेले अतुलनीय योगदान यांना मानवंदना देण्याच्या उपक्रमाचा भाग आहे.
एडलवाइज समूहाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राशेश शहा आणि बीएसईचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशीषकुमार चौहान यांनी या सोहळ्याचे उद्घाटन समारंभपूर्वक घंटा वाजवून केले. माननीय वाणिज्य आणि उद्योग तसेच नागरी विमान वाहतूक मंत्री (भारत सरकार) श्री. सुरेश प्रभू आणि माननीय वित्त आणि नियोजन,वनमंत्री (महाराष्ट्र सरकार) श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी या सोहळ्याला व्हिडिओद्वारे संदेश पाठवून प्रेक्षकांना पाठिंबा दिला. प्रेक्षकांमध्ये भारतातील अग्रगण्य छोट्या, मध्यम उद्योगांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यातील अनेक कंपन्या शेअर बाजारामध्ये सूचीबद्ध आहेत.
श्री. सुरेश प्रभू म्हणाले, “सुक्ष्म-छोटे-मध्यम उद्योग हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे, भारतातील रोजगारनिर्मितीत सर्वाधिक योगदान या क्षेत्राचे आहे. हे उद्योगांतून अत्यंत चांगले निष्पन्न होत आहे आणि निर्यातीतही हातभार लागत आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे भारतीय समाजाचा सर्वसमावेशक विकास करण्याची क्षमता या क्षेत्रात आहे. मोठ्या उद्योगांना आवश्यक घटकसाहित्य तसेच अनुषंगिक सेवा पुरवण्याचे महत्त्वाचे काम छोटे उद्योग करत असतात. मी तुमचे अभिनंदन करतो आणि सर्वांना भविष्यकाळासाठी शुभेच्छा देतो.”
श्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “आपला समाज वेगाने वाढत आहे. आपल्या जीडीपीच्या वाढीत मोठे योगदान सुक्ष्म-छोट्या-मध्यम उद्योगांचे आहे. या उद्योगांच्या वाढीच्या प्रवासात आपण पाठिंबा दिला पाहिजे. आंतरराष्ट्रीय एसएमई दिनी, महाराष्ट्राचा अर्थमंत्री म्हणून, मी एसएमई कंपन्यांना खात्री देतो की, आम्ही कायम त्यांच्यासाठी उभे राहू आणि त्यांना व्यवसायासाठी आवश्यक ती सर्व मदत करू.”
राशेश शहा म्हणाले, “एडलवाइजने भारतीय उद्योजकांच्या अमर्याद चैतन्याला कायमच पाठिंबा दिला आहे, त्याचा/तिचा आत्मविश्वास, हिंमत, निश्चिय आणि दृष्टिकोन चेतवला आहे. या विशेष सोहळ्याच्या माध्यमातून, आम्हाला एमएसएमई कंपन्या अर्थव्यवस्थेला देत असलेल्या भरीव योगदानाची दखल घ्यायची आहे. अलीकडे काही वर्षात एमएसएमई क्षेत्राचा विकासाचे एक मोठे क्षेत्र म्हणून उदय झाला आहे. अशा परिस्थितीत या उद्योगांमध्ये दीर्घकालीन विकासासाठी शाश्वत वाढीचे चालक म्हणून क्षमता निर्माण होणे महत्त्वपूर्ण आहे यावर आमचा विश्वास आहे.”
आशीषकुमार चौहान म्हणाले, “गेल्या काही वर्षात भारतीय एसएमई क्षेत्र अर्थव्यवस्थेतील एक चैतन्यपूर्ण आणि गतीशील क्षेत्र म्हणून उदयाला आले आहे. बाजारातील सहभागाच्या माध्यमातून समभाग संसाधनांच्या एकत्रीकरणासाठी मुंबई शेअर बाजाराने “बीएसई एसएमई” हा प्लॅटफॉर्म मार्च २०१२ मध्ये सुरू केला. या प्लॅटफॉर्मवर आज २५०हून अधिक एसएमईज आहेत. भांडवल उभारणीसाठी तसेच गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी हा प्लॅटफॉर्म वेगाने एसएमईंची पसंती मिळवत आहे. उद्योजकांना वाढ आणि विस्तारासाठी समभाग भांडवल उभारण्याची मोठी संधी हा प्लॅटफॉर्म पुरवत आहे. त्याचप्रमाणे गुंतवणूकदारांनाही सुरुवातीच्या टप्प्यावर गुंतवणुकीसाठी एसएमईची निवड करणे व त्यात गुंतवणूक करण्यासाठी या प्लॅटफॉर्मचा उपयोग होत आहे. सूचीबद्ध एसएमईंची संख्या आणि या एसएमईंनी उभारलेले भांडवल यामुळे बीएसई एसएमई प्लॅटफॉर्म बाजारपेठेत आघाडीच्या स्थानावर आहे.”
या गटचर्चेचे सूत्रसंचालन मुरब्बी माध्यम व्यावसायिक विवेक लाव यांनी केले. चर्चेमध्ये पुढील तज्ज्ञांचा समावेश होता- शालिनी मिमानी- मुख्य जोखीम अधिकारी, एडलवाइज रिटेल फायनान्स; अजय ठाकूर- प्रमुख, बीएसई एसएमई; एल. वेंकटेश्वरन- उपाध्यक्ष, सिटीबँक; एस. स्वामीनाथन- संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, आयआरआयएस बिझनेस सर्व्हिसेस लिमिटेड आणि नितेश वघासिया, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, अल्ट्राकॅब इंडिया लिमिटेड.
“फायनान्सिंग अॅण्ड एन्हान्सिंग द व्हॅल्यू सिस्टम फॉर एसएमईज” या विषयावरील गटचर्चेत वाद झालेले तसेच चर्चा झालेले महत्त्वपूर्ण मुद्दे पुढीलप्रमाणे: एसएमएमईंना त्यांच्या आयुष्यचक्रातील विविध टप्प्यांवर येणारी आव्हाने, वित्तपुरवठ्यातील सुलभता वाढवण्यामध्ये पत पार पाडत असलेली भूमिका, उद्योगांच्या वेगवेगळ्या गरजांसाठी वेगवेगळ्या कर्जदात्यांचे महत्त्व, पतीचे मार्ग, एकंदर पतव्यवस्थेत जीएसटीचे महत्त्व आणि आणखी काही.
Comments
Post a Comment