अंडी खा आणि वजन कमी करा !!

अंडी खा आणि वजन कमी करा !!
(सर्वाधिक लठ्ठपणा आढळणाऱ्या जगातील देशांमध्ये अमेरिका आणि चीननंतर भारत तिसऱ्या क्रमांकावर)

मोठ्या गोष्टी या लहान स्वरुपात दडलेल्या असतात, असे सर्रास म्हटले जाते, जर प्रामाणिक अंड्याचा विचार केला तर या वाक्याची प्रचीती तुम्हाला आल्यावाचून राहणार नाही. अंड्यामध्येखूप जास्त प्रथिने, चांगल्या स्वरूपातील मेद आणि जीवनावश्यक जीवनसत्त्वे उपलब्ध असतात. हे घटक आरोग्याच्या दृष्टीने फारच हिताचे असतात. जर तुम्ही अंड्यांचा वापर सकाळच्या नाश्त्यात करत असाल, तर मग वजन कमी करण्यासाठी वेगळा आहार घेण्याची आवश्यकता नाही.


जगभरात 2 मिलीयनहून अधिक प्रौढ व्यक्ती आणि बालकांचे वजन गरजेहून अधिक आहे किंवा ते लठ्ठ आहेत. तसेच त्यांच्या वजनामुळे त्यांना आरोग्याच्या समस्यांचाही सामना करावा लागतो, अशी माहिती नवीन अहवालातून मिळते. जगातील जवळपास एक-तृतीयांश लोकसंख्येला वाढते शहरीकरण, वाईट आहार आणि शारीरिक हालचालींच्या अभावामुळे लठ्ठपणा छळतो आहे.

आणि भारत एकटाच दिवसेंदिवस फुगत चाललेला नाही!! 2025 पर्यंत भारतात राहणारे जवळपास आणखी 5 टक्के लोक लठ्ठपणाकडे जाण्याची संभावना आहे. 2016 मध्ये देशात 30 मिलीयन लोक लठ्ठ होते, तर 2025 पर्यंत हा आकडा 70 मिलीयनपर्यंत जाईल!!

एकविसाव्या शतकात भारतात लठ्ठपणाने उग्र रूप धारण केले आहे, देशातील अतिरिक्त 5% लोकांना लठ्ठपणाने ग्रासले आहे. लठ्ठपणाच्या बाबतीत भारतही इतर विकसनशील देशांचा ट्रेंड अंगीकारत असून अधिकाधिक लठ्ठ होत चालला आहे. अनारोग्याला आमंत्रण देणारे, प्रक्रिया केलेले अन्न भारताच्या बाजारपेठांमध्ये शिरले आहे. जागतिक अन्न बाजाराचा हा अद्ययावत प्रकार भारताने उचलला आहे. मध्यम तसेच त्यावरील उत्पन्न गटाच्या मिळकतीत वाढ झाल्याने व्यक्तीचा सरासरी उष्मांक आहार वाढला. हृदयासंबंधी आजार बळावण्यासाठी लठ्ठपणा हा महत्त्वाचा घटक ठरतो.

भारतात लठ्ठपणाची समस्या फार आधीपासून सुरू झाली. लहान मुलांच्या लठ्ठपणात आपला देश - 14.4 मिलीयन – चीननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. शारीरिकदृष्ट्या हालचाल नसणे आणि जंक फूड ही त्यामागची कारणे आहेत. भारतातील आहार हा भारी कर्बोदकांचा आणि तेलकट असतो. एक देश म्हणून भारत व भारतीय वैद्यकीयदृष्ट्या मोठी किंमत चुकवत असतात. लठ्ठपणामुळे अतिताण, मधुमेह (भारतात 80 मिलीयन मधुमेही आढळतात), कुर्च्यांचे आजार, हृदयरोग आणि श्वसनासंबंधीच्या समस्या बळावतात. हृदय रोग, रिनल ट्रान्सप्लांट, गुडघे प्रत्यारोपण आणि मधुमेही उपचार या सर्वांवर मोठा खर्च होताना दिसतो.

अशा परिस्थितीत आणि अशा वेळी आपण अंड्याचे आभार मानले पाहिजेत. ज्यामध्ये ड जीवनसत्व असते, ते आपल तंदुरुस्त हाड आणि दातांसाठी आवश्यक असते. तसेच यातील पोषक तत्वे रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करतात, हृदयरोगापासून संरक्षण करतातचेतासंस्थेच्या, मेंदूच्या आरोग्यासाठी जीवनदायी ठरते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अंडी हा वजन कमी करण्याचा उपयुक्त आहार आहे.

अंड्यांमध्ये प्रथिने जास्त आढळतात. ती वजन कमी करण्यासाठी पोषक ठरतात. शरीराचा भार कमी करण्यासाठी बनवला जाणारा अंड्यांचा पदार्थ म्हणजे एग व्हाईट सलाड किंवा काही भाज्या घालून केलेले झटपट ऑम्लेट अथवा एग व्हाईट वापरून तयार केलेले सँडविच.”

आहारात अंड्यांचा समावेश करून दिवसाची सुरुवात करणे हा वजन कमी करण्याचा सर्वात चांगला पर्याय आहे. कारण अंड्यांमुळे पोट चांगले भरते, दुपारच्या जेवणापर्यंत काही खाण्याची इच्छा होत नाही, ज्यामुळे भूक दूर पळते.

शरीराच्या चयापचय क्रियेस पोषक – अंडी शरीराच्या चयापचय क्रियेसाठी फार उपयुक्त आहेत. त्यामुळे पचन सुधारल्याचे पुरावे आहेत. अंड्यांमधील प्रथिने पेप्टाइडमध्ये रूपांतरित होऊन अगदी पारंपरिकऔषधाप्रमाणे काम करतातज्यामुळे रक्तदाबाचे प्रमाण संतुलित रहण्यास मदत होते

कमी कॅलरीज: अंड्यांमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते. एका सर्वसाधारण अंडीयुक्त आहारात 2 ते 4 अंड्यांचा समावेश असू शकतो. साधारणपणे तीन मोठ्या उकडलेल्या अंड्यांत 240 हून कमी कॅलरीज असतात. यामध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असल्याने तसेच हंगामी भाज्यांचा समावेश केल्याने आहार परिपूर्ण होतो, त्यातून साधारण 300 कॅलरीज मिळतात.

अंडी आहेत पोटभरीची: हा एक परिपूर्ण घटक असल्याने तुम्हाला त्याचे सेवन केल्यानंतर बराच काळ भूक लागत नाही. त्यात भरपूर प्रथिने आहेत. हे अशा स्वरूपाचे अन्न आहे, जे तुमची भूक मिटवून समाधानी उदरभरणाचा अनुभव देते.

अंडी आहेत स्वस्त आणि बनवण्यासाठी सोपी: तुमच्या आहारात अंड्यांचा समावेश करणे अतिशय सुलभ आहे. अंडी फारच स्वस्त असतात, मुबलक स्वरुपात उपलब्ध असतात आणि काही मिनिटांत तयार होतात. तुम्ही ती कशीही शिजवलीत, तरीही रुचकरच लागतात. मग कधी ती उकडून घ्या, कधी फेटा आणि ऑम्लेट बनवा किंवा भाजा.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE