जीप® कंपासतर्फे बेडरॉक लिमिटेड एडिशन सादर कंपनीने भारतात २५००० विक्रीचा टप्पा ओलांडला
जीप® कंपासतर्फे बेडरॉक लिमिटेड एडिशन सादर
कंपनीने भारतात २५००० विक्रीचा टप्पा ओलांडला
- जीप कंपास बेडरॉक ही लिमिटेड एडिशन एसयूव्ही असून कंपनीने एक वर्षांच्या आत साधलेल्या २५,००० गाड्यांच्या
विक्रीचे यश साजरे करण्यासाठी ती सादर करण्यात आली आहे
- बेडरॉक लिमिटेड एडिशन ही ४x२ प्रकारातील मॅन्यूअल ट्रान्समिशन, टर्बोडिझेल प्रकारातील स्पोर्ट्स गाडी व्होकल व्हाईट,
मिनिमल ग्रे आणि एक्झोटिका रेड अशा तीन रंगांत उपलब्ध
- गेल्या १० वर्षात जीप कंपासने एफसीए इंडियासाठी १२ महिन्यात साध्य केलेली ही सर्वोत्तम विक्री
पुण्याजवळील आपल्या रांजणगाव प्रकल्पात जीप® कंपास या भारतातील सर्वाधिक वाखाणल्या गेलेल्या एसयुव्ही )२०१७( चे उत्पादन करणाऱ्या एफसीए इंडियाने एक वर्षाहून कमी कालावधीमध्ये भारतात जीप® कंपास गाडीचा २५,००० विक्रीचा टप्पा ओलांडला. हे यश साजरे करण्यासाठी जीप® कंपासतर्फे बेडरॉक ही लिमिटेड एडिशन एसयुव्ही आज बाजारात सादर करण्यात आली. सपोर्ट ट्रीम प्रकाराची बेडरॉक २.० लीटर १७३पीएस टर्बो डिझेल इंजिन, सिक्स स्पीड मॅन्यूअल ट्रान्समिशन, ४x२ प्रकारातीलड्रायव्हिंग कॉन्फीगरेशन मध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.
३१ जुलै २०१७ रोजी भारतात सादर झालेली जीप® कंपास ही आज भारतीय रस्त्यांवरील सर्वात सुरक्षित एसयुव्ही म्हणून वाखाणली जात आहे. या गाडीने निश्चितपणे भारतीय एसयूव्ही बाजारपेठेला अधिक आव्हानात्मक बनवले असून स्पर्धकांना कडवी टक्कर दिलेली आहे. तसेच येथील ग्राहकांच्या फोर व्हीलर खरेदी करण्याच्या शैलीमध्ये लक्षणीय परिवर्तन घडवून आणतानाच त्यांच्या आकांक्षांना एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले आहे.
जीप® कंपास बेडरॉकबाबत बोलताना एफसीए इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. केविन फ्लीन म्हणाले, “येथील बाजारपेठेत प्रवेश केल्यापासून एक वर्षांच्या आतच आम्ही जे यश संपादन केले, ते अत्यंत अभिमानास्पद आहे. जीप कंपासच्या साह्याने एफसीए इंडियाने गेल्या १० वर्षातील आपली सर्वोत्तम वार्षिक विक्री साध्य करून दाखवली आहे.२५,००० गाड्यांच्या विक्रीचा जो टप्पा आम्ही साध्य केला, त्याचा आनंद भारतीय ग्राहकांना जीप कंपास बेडरॉक लिमिटेड एडीशन देऊन आम्ही साजरा करत आहोत.”
जीप कंपास बेडरॉक लिमिटेड एडीशनमध्ये रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, १६ इंची ग्लॉस अलॉय ब्लॅक व्हील्स, गाडीत सुलभतेने चढता यावे यासाठी साईड स्टेप, बेडरॉक ब्रँडचे सीट कव्हर्स, ब्लॅकरूफ रेल्स, प्रीमियम दर्जाच्या फ्लोअर मॅटस, बेडरॉक डिकॅल्स आणि बेडरॉक मोनोग्राम अशा खास घटक वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
सिक्स स्पीड मॅन्यूअल ट्रान्समिशनसह ४x२, २.० लीटर टर्बो डिझेल इंजिन असलेल्या बेडरॉक लिमिटेड एडीशनची किंमत १७.५३ लाख (एक्स-दिल्ली) ठेवण्यात आली असून ती व्होकल व्हाईट, मिनिमल ग्रे आणि एक्झोटिका रेड अशा तीन रंगांत उपलब्ध असेल.
एफसीएच्या चार जागतिक उत्पादन आणि निर्यात हबपैकी एक असलेल्या रांजणगाव प्रकल्पात जीप कंपासच्या निर्मितीचा पहिला वर्धापनदिन सोहळा १ जून रोजी एफसीए इंडियाने साजरा केला. कंपनीने याआधीच जपान, ऑस्ट्रेलिया, युके आणि आयर्लंडसह सात ऑटोमोबाईल बाजारपेठांत ८००० हून अधिक जीप कंपास एसयुव्ही निर्यात केल्या आहेत.
फ्लीन पुढे म्हणाले, “जीप ब्रँडला भारतीय बाजारपेठेत लक्षणीय दाद मिळाली असून आमचा ब्रँड आणि उत्पादन यांच्यावर एवढा विश्वास ठेवल्याबद्दल आम्ही येथील ग्राहकांचे आभारी आहोत. आमच्या मोपार आश्वासनाला अनुसरून ग्राहकांना सर्वोत्तम दर्जाची विक्रीपश्चात सेवा उपलब्ध करून देऊन हा विश्वास आणखी दृढ व्हावा यासाठी एफसीए टीम अविश्रांत झटत आहे.”
सध्या भारतात एफसीए इंडियाची ६५ विक्री आणि सेवा केंद्रे असून यंदाच्या वर्षी ती वाढून ७५ वर जाणार आहेत. नाविन्यपूर्ण विक्री आणि सेवा अनुभूती पुरवून, कार्यक्षम सेवा आणि गाडीची किफायतशीर मालकी यांच्या आधारे एफसीए इंडियाने ग्राहकांचे उच्च पातळीचे समाधान साध्य केलेले आहे.
Comments
Post a Comment