मुंबईतून नाशिवंत वस्तू आणि आंब्यांच्या वाहतुकीत एमिरेट्स स्कायकार्गोचा विक्रम
मुंबईतून नाशिवंत वस्तू आणि आंब्यांच्या वाहतुकीत एमिरेट्स स्कायकार्गोचा विक्रम
एमिरेट्स स्कायकार्गो हा एमिरेट्सचा मालवाहतूक विभाग असून त्यांनी यंदा मे आणि जून महिन्यात आंब्यांची विक्रमी वाहतूक नोंदवली आहे.
हवाई मालवाहतूक सेवेने मागील वर्षातील मे महिन्यातील कालावधीच्या तुलनेत यंदा 50% ची वाढ झाल्याचा अनुभव घेतला. जवळपास 1130 टन आंबे मुंबईतून जगभरातील विविध ठिकाणांवर एमिरेट्स स्कायकार्गो विस्तृत नेटवर्कच्या माध्यमातून मे 2018 दरम्यान पोहोचवले गेले. हे आंबे दोन्ही कार्गो, म्हणजे पॅसेंजर एअरक्राफ्ट व फ्रेटर एअरक्राफ्टमधून पाठवण्यात आले.
एप्रिल 2018 पासून भारतातून एमिरेट्स स्कायकार्गोकडून 2650 टनहून अधिक आंब्यांची निर्यात करण्यात आली, त्यापैकी 2142 टन आंबे मुंबईतून पाठविण्यात आले. मध्य पूर्व, युके युएसए, कॅनडा आणि युरोपातील इतर भागांमधील महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये भारतीय आंब्यांची वाहतूक एमिरेट्स स्कायकार्गोमधून करण्यात आली.
भारत हा जगातील एक महत्त्वाचा आंबा निर्यातदार असून दरवर्षी एप्रिल आणि जून या महिन्यांत निर्यात हंगाम शिखरावर असतो. देशातील महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक आंबे पिकत असून वर्षाला 30,000 हून अधिक टन आंब्यांची निर्यात होते.
“यंदाचा निर्यात मोसम महाराष्ट्रातील आंबा बागायतदारांसाठी चांगला गेला. आंबे तसेच नाशिवंत वस्तूंच्या निर्यातीकरिता एमिरेट्स स्कायकार्गोने सुविधा देऊ केली. प्रदेशातील आर्थिक हालचालीसाठी तो एक महत्त्वपूर्ण योगदानकर्ता ठरला,” असे एसडी प्रभू, कार्गो मॅनेजर – महाराष्ट्र, एमिरेट्स स्कायकार्गो यांनी सांगितले.
एमिरेट्स फ्रेश हा एअर कार्गोचा खास सूट वाहतूक पर्याय उपलब्ध करून देतो. ज्यामुळे हवाई प्रवासातही आंब्यासारखे नाशिवंत उत्पादन ताजे राहते, महाराष्ट्र आणि आजूबाजूच्या भागांमधील ग्राहकांसाठी ते उपलब्ध होते.
एप्रिल आणि जून 2018 दरम्यान एमिरेट्स स्कायकार्गोने मुंबईतून 2290 हून अधिक इतर नाशिवंत वस्तूंची निर्यात केली. रमझान दरम्यान मोठ्या प्रमाणावर भाज्या व फळे युके आणि मध्य पूर्वेला निर्यात करण्यात आली. नाशिवंत वस्तूंच्या निर्यातीसाठी हा काळ फारच व्यस्त स्वरूपाचा राहिला.
एमिरेट्स स्कायकार्गोकडून 265 हून अधिक आधुनिक, ऑल-वाईड बॉडी एअरक्राफ्टचे कार्यवहन सुरू असते, ज्यामध्ये 14 समर्पित फ्रेटर्सचा समावेश आहे. एअर कार्गो कॅरियरची दुबईत सर्वसमावेशक, अत्याधुनिक अशी खास कुल चेन सुविधा कार्गो टर्मिनल उपलब्ध करून देण्यात येते. ज्यामधून तापमानाला संवेदनशील असणाऱ्या वस्तू म्हणजे औषधे आणि इतर नाशिवंत सामानांची वाहतूक करण्यात येते. त्याशिवाय एमिरेट्स स्कायकार्गो व्हाईट कव्हर थर्मल ब्लँकेट, व्हाईट कंटेनर्स आणि जगातील पहिलीच कुल डॉली अशा स्वरूपाच्या कल्पक साहित्याचा वापर करून कार्गोला पूरक संरक्षण पुरवते.
Comments
Post a Comment