मोल चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा प्रचंड उत्साहात संपन्न

मोल चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा प्रचंड उत्साहात संपन्न


निर्माता-दिग्दर्शक योगेश कुलकर्णी  आणि प्रस्तुतकर्ते पारस बाविस्कर यांनी मराठी आणि अहिराणी अशा दोन भाषांमध्ये ‘मोल’ या दर्जेदार संगीतमय  चित्रपटाची  निर्मिती केली आहे. अहिराणी ही खान्देशची बोली भाषा.  खान्देशात अहिराणीला आईचा दर्जा आहे .खान्देशी भाषा आणि संस्कृतीचे दर्शन संपूर्ण महाराष्ट्राला घडावे या ध्यासातून या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे .
 नुकताच या चित्रपटाचा संगीत प्रदर्शन सोहळा  राज्याचे सहकार राज्यमंत्री श्री. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडला. मुंबईतील  नरीमन पॉईंट येथील  यशवंतराव  चव्हाण केंद्रात पार पडलेल्या या सोहळ्याप्रसंगी चित्रपटाचे  प्रस्तुतकर्ते पारस बाविस्कर आणि समाजसेविका अंजलीताई बाविस्कर यांच्यासह  अभिनेते मिलिंद शिंदे, गायक नंदेश उमप आणि संगीतकार श्याम क्षीरसागर हे देखील उपस्थित होते.

या सिनेमाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात मराठीतील प्रथितयश अभिनेते आहेतच, पण  खान्देशातील धुळे ,जळगाव ,नाशिक ,नंदुरबार या चारही जिल्ह्यातल्या  ५० हून अधिक अभिनेत्यांनाही संधी देण्यात आली आहे .  चित्रपटात योगेश कुलकर्णी ,शीतल अहिरराव, किशोर कदम, नीला पाटील-गोखले, मिलिंद शिंदे, नलिनी कुलकर्णी, रमाकांत देसले, संजय भदाणे, अनिल मोरे आणि राजन पवार यांच्या प्रमुख भूमिका पाहायला मिळतील.

या सिनेमाचे संगीत अतिशय सुरेल आणि वैविध्यपूर्ण असून संगीतकार अविनाश-विश्वजीत आणि श्याम क्षीरसागर यांनी यातली गाणी संगीतबद्ध केली आहेत .   बहिणाबाई चौधरी, विठ्ठल वाघ, अनिल अवचट, कमलाकर देसले, अश्विनी शेंडे, योगेश कुलकर्णी आणि राजन पवार  यांनी लिहिलेल्या गाण्यांचा समावेश या चित्रपटात आहे .
      हरिहरन ,सुरेश वाडकर ,रवींद्र साठ्ये ,साधना सरगम , वैशाली सामंत या दिग्गज गायकांसोबतच सुवर्णा माटेगावकर , मंदार आपटे , नंदेश उमप , ऋषीकेश रानडे , मैथिली पानसे , जयदीप बगवाडकर आणि श्याम क्षीरसागर या दमदार गायकांची गाणी असलेल्या या  संगीतमय चित्रपटाचे संगीत झी म्युझिक कम्पनीतर्फे प्रकाशित झाले असून झी म्युझिकच्या यु ट्युब चॅनेलवर jukebox वर चित्रपटाची सर्व गाणी ऐकता येतील तसेच निवडक गाण्यांचे व्हीडिओ देखील पाहता येतील .

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE