स्कायट्रेक्स वर्ल्ड एअरलाईन अवॉर्डस 2018मध्ये एमिरेट्सचा सलग 14व्या वर्षी वर्ल्ड्स बेस्ट इनफ्लाईट एंटरटेनमेंट अवॉर्डवर शिक्कामोर्तब
स्कायट्रेक्स वर्ल्ड एअरलाईन अवॉर्डस 2018मध्ये एमिरेट्सचा सलग 14व्या वर्षी वर्ल्ड्स बेस्ट इनफ्लाईट एंटरटेनमेंट अवॉर्डवर शिक्कामोर्तब
यंदा मध्यपूर्वेतील सर्वोत्तम हवाई कर्मचारी सेवा म्हणून मतं
एमिरेट्सने सलग 14व्या वर्षी वर्ल्ड्स बेस्ट इनफ्लाईट एंटरटेनमेंट अवॉर्ड पटकावला. प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या स्कायट्रेक्स वर्ल्ड एअरलाईन अवॉर्ड्स 2018मध्ये हा सन्मान या हवाईसेवेला मिळाला आहे. यावर्षी सर्वोत्तम हवाई कर्मचारी सेवा देणारी हवाईसेवा म्हणूनही गौरविण्यात आले.
स्कायट्रेक्स वर्ल्ड एअरलाईन अवॉर्ड्स उत्कृष्ट हवाई सेवा पुरवणारा जागतिक मापदंड समजला जातो. यावर्षी 100 देशांमधील 20 दशलक्षहून अधिक ग्राहकांचा निकाल निश्चित करण्यात सहभाग होता. ऑगस्ट 2017 ते मे 2018 दरम्यान 335 हून अधिक हवाईसेवांचे निरीक्षण करण्यात आले होते.
“कल्पकता आणि उत्कृष्ट सेवा क्षेत्रात आमच्या बांधिलकीचा सन्मान होणे ही मानाची बाब आहे. आम्ही कायमच आमच्या बहु-राष्ट्रीय व बहु-सांस्कृतिक प्रवाशांकरिता सर्जनशील, समर्पक आणि सातत्याने समाधान पुरविण्याचा ध्यास घेतला. वास्तविक हे पुरस्कार थेट प्रवाशांनी दिलेल्या प्रतिसादावरून निश्चित करण्यात येतात. हे एमिरेट्स अनुभव निर्माण करण्यासाठी घेतलेल्या कठोर मेहनतीची सुंदर पावती आहे,” असे एमिरेट्स डिविजनल वाईस प्रेसिडेंट आणि कस्टमर एक्सपिरियन्स (आयएफईसी) पॅट्रिक ब्रॅन्नेली यांनी सांगितले.
भारतीय बाजार प्राधान्यांना सेवा देताना एमिरेट्स भारतीय प्रवाशांना दहा वेगवेगळ्या अशा प्रादेशिक भारतीय भाषा; हिंदी, पंजाबी, बंगाली, कन्नड, तेलुगु, तामिळ, मराठी, मल्याळम, गुजराती आणि भोजपुरीमध्ये मनोरंजन निवडण्याचे पर्याय देते.
संपूर्ण हवाई सेवा क्षेत्रात एमिरेट्स कायमच एका कल्पक भूमिकेत होती. याच हवाईसेवेने पहिल्यांदा 1992मध्ये ताफ्यातील प्रत्येक विमानात पहिली टीव्ही स्क्रीन बसवली. आज आकाशात एमिरेट्सच्या माध्यमातून एक सर्वांकष आणि अत्याधुनिक स्वरुपाची मनोरंजन आणि संचार सेवा पुरवली जाते. आईस, ही पुरस्कार विजेती इन-फ्लाईट एंटरटेनमेंट यंत्रणा असून आज जगभरातील 3,500हून अधिक एंटरटेनमेंट चॅनल्स, ज्यामध्ये 100 किड्स चॅनल्स आणि 850 मूव्ही चॅनल्सचा समावेश आहे.
त्याशिवाय अनोखा विविधांगी कंटेंट देण्याकरिता एमिरेट्सने आपल्या ग्राहकांकरिता कनेक्टीव्हिटी आणि लाईव्ह टीव्ही दिला आहे. एमिरेट्सच्या 70%हून अधिक एअरक्राफ्ट्समध्ये लाईव्ह टीव्ही,ज्यामध्ये सर्व बोईंग 777-200LR आणि 777-300ER ताफ्यांचा समावेश आहे. लाईव्ह टीव्ही प्रवासी आणि क्रीडा चाहत्यांना स्पोर्ट्स 24 आणि स्पोर्ट्स 24 एक्स्ट्रावर पसंतीनुरूप क्रीडा सामने आणि मालिका पाहण्याची संधी देतात. प्रवाशांना सीएनएन, बीबीसी वर्ल्ड न्यूज, स्काय न्यूज, युरो न्यूज, सीएनबीसी आणि एनएचके वर्ल्ड अशा आंतरराष्ट्रीय वृत्त वाहिन्यांची मजा घेता येते. लाईव्ह टीव्ही बोईंग 777 ताफा आणि निवडक एमिरेट्स A380s सह 170 हून अधिक एअरक्राफ्ट्समध्ये उपलब्ध आहे.
A380s, 777-300ERs आणि 777-200LRs 200 अशा सर्व 99% हून ताफ्यात वाय-फाय कनेक्टीव्हिटी उपलब्ध आहे. सर्व केबिन क्लासमधील ग्राहकांना 20 एमबीचे मोफत व्हाय-फाय मिळेल. तसेच दर महिन्याला जवळपास एक दशलक्ष प्रवासी हवाई प्रवासात या सेवेशी जोडले जातात. एमिरेट्सच्या स्कायवॉर्ड्स सदस्यांना त्यांच्या मेंबरशीप टियर आणि प्रवासी क्लास आधारे विशेष लाभ मिळवतो आहे. सोबतच फर्स्ट क्लास आणि बिझनेस क्लासमध्ये प्रवास करताना मोफत व्हाय-फायचा लाभ मिळतो.
एमिरेट्सच्या ऑनबोर्ड प्रॉडक्ट एक्सपिरिअन्सला एअरलाईनच्या 135पेक्षा जास्त देशांतील 2100हून अधिक आंतरराष्ट्रीय केबिन क्रूचे पाठबळ आहे. सर्व क्रू मेंबर 60पेक्षा अधिक भाषा बोलतात, त्यांना दुबईत जागतिक दर्जाचे प्रशिक्षण दिले जाते. ज्यामुळे ते सर्वोत्तम हवाई सेवा आणि एमिरेट्स ऑन-बोर्ड एकस्पिरीअन्स देण्याकरिता सज्ज होतात.
Comments
Post a Comment