उबरने भारत व दक्षिण आशियामध्ये गाठला १ अब्जाहून अधिक राइड्सचा टप्पा
उबरने भारत व दक्षिण आशियामध्ये गाठला १ अब्जाहून अधिक राइड्सचा टप्पा
१ अब्जाचा टप्पा गाठणारी पहिली ट्रिप बेंगळुरुमध्ये
त्याचवेळी मुंबई, हैद्राबाद व दिल्लीमध्ये इतर ६ ट्रिप्सचे देखील बुकिंग
जगातील सर्वात मोठी राइड शेअरिंग कंपनी उबरने भारत व दक्षिण आशिया प्रांतामधील १ अब्जाहून अधिक राइड्ससह आणखी एक सुवर्ण टप्पा गाठला. पाच वर्षांपूर्वी उबरने बेंगळुरूमधून भारतात आपल्या सेवेचा शुभारंभ केला होता आणि याच शहरामध्ये ही अब्जोचा टप्पा गाठणारी ट्रिप घेण्यात आली. त्याचवेळी मुंबईमध्ये एक, हैद्राबादमध्ये दोन आणि दिल्लीमध्ये तीन अशा सहा इतर ट्रिप्सचे देखील बुकिंग करण्यात आले.
या सुवर्ण टप्प्याबाबत बोलताना उबर भारत व दक्षिण आशियाच्या राइड्स विभागाचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रदीप परमेश्वरन म्हणाले, ''हा भारत व दक्षिण प्रांतासोबतच संपूर्ण उबर परिवारासाठी अत्यंत उत्साही व लक्षणीय टप्पा आहे. हा १ अब्जाचा टप्पा म्हणजे उबरसारखे तंत्रज्ञान शहरी प्रवासाच्या भवितव्याला परिभाषित करू शकते याचा पुरावा आहे. आम्ही या प्रांतामध्ये आणखी १० बिलियन राइड्सची सेवा देण्यासाठी सज्ज आहोत. या सुवर्ण टप्प्यामधून आम्हाला लाखो राइडर्सना आरामदायी व परवडणा-या राइड्स देण्याची आणि विविध वाहतुकीच्या साधनांमधील लाखो ड्रायव्हर भागीदारांना कमावण्याची संधी देण्याची प्रेरणा मिळेल.''
उबरने नुकताच १० जून रोजी जागतिक पातळीवर १० अब्ज ट्रिप्सचा आणखी एक सुवर्ण टप्पा गाठला. या सुवर्ण टप्प्यामध्ये सामील असलेल्या १७३ ट्रिप्समध्ये अहमदाबादमधील एक व दिल्ली एनसीआरमधील एक अशा दोन ट्रिप्सचा समावेश होता.
उबरला प्रांतामध्ये जलद प्रतिसाद मिळत आहे आणि कंपनीने भारत व दक्षिण आशियामध्ये ५०० दशलक्ष ट्रिप्सचा टप्पा पूर्ण केल्यानंतर एक वर्ष पूर्ण होण्याच्या आतच हा १ अब्जाचा टप्पा गाठला आहे.
आमच्या १ अब्ज टप्प्याबाबत काही रोचक तथ्ये :
- बेंगळुरू शहरामधून आमच्या सेवेचा शुभारंभ झाला आणि याच शहरात आमची अब्जावन्नावी ट्रिप घेण्यात आली. रात्री १:१६ वाजता उबर प्रिमिअर बुक करण्यात आली.
- त्याचवेळी 'गो'वर सहा इतर ट्रिप्सचे देखील बुकिंग करण्यात आले (मुंबईमध्ये १ व हैद्राबादमध्ये २ दिल्लीमध्ये ३).
- ६७० दशलक्ष प्रमाणित ट्रिप्सपैकी ४८० दशलक्ष ट्रिप्स पंचतारांकित ट्रिप्स राहिल्या आहेत.
- या अब्जावधी ट्रिप्समधून ११.१ अब्ज किमी अंतर कापण्यात आले आहे, जे सुर्याला सुर्योदय व सुर्यास्तादरम्यान पार कराव्या लागणा-या अंतरापेक्षा ३७ पट आहे.
- आतापर्यंत प्रांतातील उबरपूल ट्रिप्सने २०० दशलक्ष किमीहून अधिक प्रवास (२१९,७९७,७६६ किमी.) टाळण्यात मदत केली आहे. ज्यामुळे ३६,५३७ टन किग्रॅहून अधिक(३६,५३७,००० किलो.) कार्बन डायऑक्साईड वायूचे उत्सर्जन कमी झाले आहे.
- अब्जावधी ट्रिप्सपैकी ७५ टक्के ट्रिप्सच्या बुकिंग्ज अँड्रॉईड डिवाईसवर करण्यात आल्या आहेत, तर २४ टक्के आयफोनवर आणि १ टक्के विंडोज डिवाईसवर बुकिंग्ज करण्यात आल्या आहेत.
- आतापर्यंत १९,९२३ हून अधिक ट्रिप्स घेतलेला (प्रांतामध्ये सर्वाधिक) चंदिगडचा जसविंदर सिंग मार्च २०१५ पासून उबरसह काम करत आहे आणि त्याचे एकूण रेटिंग ४.८१ आहे.
एकाच वेळी घेण्यात आलेल्या सात १ अब्जावन्नव्या ट्रिप्सबाबत रोचक तथ्ये :
- एकाच वेळी घेण्यात आलेल्या ७ ट्रिप्समध्ये सर्वात लांबच्या ट्रिपने १७.४ किमी अंतर पार केले आणि सर्वात लहान ट्रिपने १.४ किमी अंतर पार केले.
- एकाच वेळी घेण्यात आलेल्या या ट्रिप्सच्या ७ ड्रायव्हर भागीदारांमध्ये हैद्राबादचा बाला राजू के फेब्रुवारी २०१६ पासून उबरसह काम करत आहे आणि त्याचे एकूण रेटिंग ४.७८ आहे.
- हैद्राबादचा पवनकुमार एस ३० जून २०१८ पासून उबरसह काम करत आहे. या अल्पकाळातच तो १ अब्जावन्नवा ड्रायव्हर भागीदार ठरला. त्याचे एकूण रेटिंग ४.७३ आहे.
- एकाच वेळी घेण्यात आलेल्या या ७ ट्रिप्सवरील ड्रायव्हर भागीदारांना सरासरी ४.० रेटिंग मिळाले आणि ७५ टक्के रेटिंग्ज पंचतारांकित होत्या.
- एकाच वेळी घेण्यात आलेल्या या ७ ट्रिप्सवरील राइडर्सना सरासरी ४.४८ रेटिंग मिळाले आणि ७१ टक्के रेटिंग्ज पंचतारांकित होत्या.
हा सुवर्ण टप्पा आणि पुढील १० अब्ज ट्रिप्ससाठी योजना यामधून उबरची भारत व दक्षिण आशियाप्रती सातत्यपूर्ण कटिबद्धता दिसून येते. गेल्या महिन्यांमध्ये आपल्या भेटींदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी दारा खोसरोषी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बेर्नी हॅरफोर्ड या दोघांनी उल्लेख केला की भारत हे उबरच्या विकासगाथेसाठी मुख्य स्थान आहे आणि उबरचे राइडशेअरिंग कंपनी म्हणून यश भारतातील त्यांच्या यशस्वी प्रवासामध्ये सामावलेले आहे.
Comments
Post a Comment