तब्बल ७५ देशांतुन सहाव्या माय मुंबई आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाला प्रतिसाद
तब्बल ७५ देशांतुन सहाव्या माय मुंबई आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाला प्रतिसाद
•दिड महिन्यातच जगभरातील ७५ देशांतुन ८५० हुन अधिक लघुपट सहभागी 
 'युनिव्हर्सल मराठी' आणि 'रितंभरा विश्व विद्यापीठाचे मालिनी किशोर संघवी कॉलेज' यांच्या संयुक्त विद्यमानाने होणा-या ‘६ वा माय मुंबई आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव’  या महोत्सवात जगभरातील लघुपटकारांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला आहे.  मुंबईच्या जुहू किनाऱ्याजवळील मालिनी किशोर संघवी शांतीप्रभा प्रेक्षागृहात येत्या १९ ते २१ ऑक्टोबर रोजी साजरा होणार आहे.  ह्या महोत्सवाच्या स्पर्धक प्रवेशिकेसाठी दिड महिन्यातच जगभरातील  ६ उपखंडांतुन, ७५ देशांतुन ८५० हुन अधिक लघुपट सहभागी झाले आहेत. महोत्सवाचे हे सहावे वर्ष असून यामध्ये लघुपटकारांसाठी पॅनल डिस्कशन, ऍडोब वर्कशॉप, लघुपटांचे स्क्रीनिंग, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, चित्रपटसृष्टीतले तज्ञ, प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्मात्यांशी चर्चा आणि प्रश्नोतरे यासारख्या कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे. 
आंतरराष्ट्रीय स्तरांवर होणा-या या महोत्सवासाठी लघुपटकारांकडून विनामूल्य प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. ऑनलाईन प्रवेशिका पाठविण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर २०१८ आहे.  ह्या फेस्टिवलच्या आयोजनात युनिव्हर्सल मराठी टीमसोबत मालिनी किशोर संघवी कॉलेजातील बीएमएम विभागाचा फिल्म क्लब सक्रिय भूमिका बजावत आहे. प्रत्येक लघुपट वर्गवारीतून प्रत्येकी एक ‘बेस्ट शॉर्टफिल्म’ विजेता आणि सर्वोत्तम कामगिरी करणा-याना वैयक्तिक तांत्रिक अॅवॉर्ड (टेक्निकल अॅवॉर्ड) देऊन गौरविण्यात येईल. लघुपट वर्गवारीतील विजेत्यांना रोख रकमेसहित आणि सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात येईल. महोत्सवाच्या www.mmisff.com  ह्या वेबसाईटवर नाव नोंदवून महोत्सवात विनामूल्य प्रवेश घेता येईल. फेस्टिवलच्या अधिक माहितीसाठी ९७६८९३०८५३ / ९९६९४१२४२६  / ९८१९५३०५६९ या क्रमांकावर तसेच  ‘युनिव्हर्सल मराठी’च्या फेसबुक पेजवर संपर्क साधता येईल.

खूप छान बातमी !
ReplyDelete