एचडीएफसी लाईफतर्फे ‘एचडीएफसी लाईफ क्लासिक वन’ सेवा सादर

एचडीएफसी लाईफतर्फे एचडीएफसी लाईफ क्लासिक वन’ सेवा सादर
  • दीर्घकाळापर्यंत हप्ते भरण्याचे वचन न देता संभाव्य उच्च परतावे हवे असलेल्या व्यक्तींसाठी सिंगल प्रिमियम युएलआयपी योजना
  • नऊ फंडांमध्ये व्यवहार करण्याची ऑफर असलेली अनलिमिटेड फ्री स्विचेस् सेवा
 एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स कंपनी या भारताच्या सर्वात मोठ्या आयुर्विमा कंपनीने आज एचडीएफसी लाईफ क्लासिक वन’ ही सिंगल प्रिमियम यूएलआयपी योजना सादर केल्याची घोषणा केली. ही योजना संभाव्य उच्च परताव्यांच्या माध्यमातून मालमत्ता निर्माण करणे आणि विमा कव्हरच्या स्वरुपात आर्थिक संरक्षण देणे असे दुहेरी लाभ देते.
पगारदारतसेच स्वयं-रोजगार असलेल्या व्यक्तींना काहीवेळा अतिरिक्त आर्थिक लाभ होतो. हा लाभ बोनसआर्थिक योजनेच्या पूर्तीच्या माध्यमातून किंवा अचानक मालमत्तेमध्ये वाढ होण्याच्या माध्यमातून होऊ शकतो. हा अतिरिक्त लाभ गुंतवणूक करण्यासाठी योग्य आर्थिक साधन निवडणे अवघड ठरू शकते. आज यासाठी बाजारपेठेमधील हालचालींमधून अधिक लाभ देण्याची लवचिकता असलेलीतसचे भरलेल्या सिंगल प्रिमियमच्या १० पट आयुर्विमा देणारी फारच कमी साधने उपलब्ध आहेत.
एचडीएफसी लाईफ क्लासिक वन ही योजना याच गरजेची पूर्तता करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. हे उत्पादन व्यक्तींना सिंगल-प्रिमियम पेमेंटच्या माध्यमातून बाजारपेठेशी संलग्न योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासोबतच दीर्घकाळापर्यंत गुंतवणूक ठेवण्याची संधी देते. हे उत्पादन पॉलिसीधारकांना डेटइक्विटी व संतुलित फंड व्यासपीठांमध्ये नऊ फंड पर्यायांची सुविधा देते.
हे अद्वितीय उत्पादन फंडांमध्ये अनलिमिटेड फ्री स्विचेस्‌ची सेवा देखील देते. ज्यामुळे ग्राहक अधिकाधिक प्रमाणात गुंतवणुका करतात.
एचडीएफसी लाईफच्या उत्पादन रेंजमध्ये पारंपरिकयूएलआयपीपेंशन व आरोग्य विभागांशी संबंधित उत्पादनांचा समावेश आहे. ही रेंज भारतीय ग्राहकांच्या जलदगतीने बदलत असलेल्या गरजांची पूर्तता करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. ग्राहकांच्या गरजाउपलब्ध पर्याय आणि दीर्घकाळापर्यंत उत्पादनाचा लाभ अशा सविस्तर संशोधनानंतर प्रत्येक उत्पादन तयार करण्यात येते.
एचडीएफसी लाईफचे वरिष्ठ उपाध्यक्षप्रमुख ऍक्चुअरी व नियुक्त ऍक्चुअरी श्रीनिवासन पार्थसारथी म्हणाले, ‘‘आमच्या ग्राहक अंतरंगांमधून बाजारपेठेशी संलग्न असलेली स्थिरतसेच सिंगल-प्रिमियम पर्याय देणार्‍या योजनेसाठी गरज दिसून आली. ही योजना अनपेक्षित लाभ आणि एक-वेळच्या गुंतवणुकीमधून चांगले उत्पन्न देणार्‍या महसुलाची आशा करणार्‍या ग्राहकांसाठी चांगली आहे. ही गरज लक्षात घेत आम्ही असे उत्पादन तयार केले आहेजे कमी खर्च आणि उच्च मूल्यामध्ये बाजारपेठ संबंधी परतावेसोबतच प्रस्तावाला चालना देणारे १० पट विमा कव्हर देते. हे उत्पादन
सिंगल लाईफ व जॉइण्ट लाईफ कव्हर व्हेरिएण्ट्समधून निवडण्याची सुविधा देते आणि पद्धतशीर हस्तांतरण योजनेसह सरासरी खर्च केलेल्या पैशांचा लाभ देखील देते.’’

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

Satin Creditcare Network Limited Q1FY21: Resilient Performance Backed by Strong Collections and Lower NPAs