अंधांसाठीच्या भारतीय क्रिकेट टीमच्या १७ खेळाडूंच्या संघाची घोषणा
क्रिकेट असोसिएशन फॉर दि ब्लाइंड इन इंडिया (CABI) ने भारत आणि इंग्लंड दरम्यान होणाऱ्या अंधांसाठीच्या द्विपक्षीय क्रिकेट मालिकेसाठी सज्ज झालेल्या भारतीय क्रिकेट टीमच्या १७ खेळाडूंच्या संघाची घोषणा केली
भारतीय अंध क्रिकेट संघ लवकरच भारत, इंग्लंड आणि श्रीलंका यांच्या दरम्यान सुरु होणाऱ्या द्विपक्षीय आणि त्रिकोणीय अंध क्रिकेट मालिका २०१८ साठी जोरदार सराव करत आहे. हि शृंखला २ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर २०१८ दरम्यान भारतामध्ये होणार आहे. समर्थनम आणि क्रिकेट असोसिएशन फॉर दि ब्लाइंड इन इंडिया (CABI) यांनी हि मालिका आयोजित केली असून भारत तसेच इंग्लंड संघांमध्ये होणाऱ्या तीन T२० सामन्यांच्या पहिल्या द्विपक्षीय मालिकेसाठी प्रतिनिधित्व करणाऱ्या भारतीय खेळाडूंचा संघ आज घोषित करण्यात आला.
हे सामने २ ऑक्टोबर, ३ ऑक्टोबर आणि ४ ऑक्टोबर २०१८ रोजी बेंगळुरूमधील हजभवन जवळ असणाऱ्या तनिसांद्रा येथील SSE क्रीडा मैदानावर होणार आहेत. हे सामने इंडस इंड बँकने प्रायोजित केले आहेत. बेंगळुरू आणि गोवामध्ये होणाऱ्या त्रिकोणीय सामने खेळण्यासाठी श्रीलंकेचा संघ सामील होईल. महिन्याच्या दुसऱ्या भागात भारताच्या विविध शहरांमध्ये श्रीलंका आणि भारतामध्ये द्विपक्षीय सामने होणार आहेत. त्रिकोणीय सामन्यांची आणि भारत - श्रीलंका द्विपक्षीय सामान्यांची यादी लवकरच घोषित केली जाईल.
याविषयी अधिक माहिती देताना क्रिकेट असोसिएशन फॉर दि ब्लाइंड इन इंडिया (CABI), जागतिक अंध क्रिकेटचे अध्यक्ष तसेच समर्थनमचे संस्थापक प्रबंधकीय विश्वस्त श्री महांतेश जि.के. म्हणाले कि, "अंध क्रिकेटपटूंमध्ये प्रचंड क्षमता आहे आणि हि द्विपक्षीय तसेच त्रिकोणीय सामान्यांची मालिका त्यांचा दृढनिश्चय दाखविण्यासाठी एक परिपूर्ण असे व्यासपीठ आहे. भारतीय अंध क्रिकेट संघाने या मालिकेसाठी जोरदार सराव केला आहे आणि आम्ही त्यांना या मालिकेसाठी हार्दिक शुभेच्छा देत आहोत. आम्ही समर्थनम आणि CABI आगामी मालिकेसाठी खूपच रोमांचित आहोत तसेच या असामान्य अंध क्रिकेट सामन्यांचा थरार अनुभवण्यासाठी उत्साहित आहोत. इंग्लंड आणि श्रीलंका संघांचे या सामन्यांसाठी स्वागत करत आहोत."

Comments
Post a Comment