महिला क्रीडापटूंच्या यादीत एडलवाईज ग्रुपकडून धावपटू हिमा दासचा समावेश
महिला क्रीडापटूंच्या यादीत एडलवाईज ग्रुपकडून धावपटू हिमा दासचा समावेश
भारताच्या सहा आदर्श महिला क्रीडापटूंची आर्थिक काळजी घेण्यासाठी वचनबद्ध
क्रीडाशक्ती ओळखून, महिला सबलीकरणाला पाठींबा देत एडलवाईज क्रीडापटूना त्यांच्या स्वप्नाच्या दिशेने न घाबरता पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन पुरवते आहे. जेणेकरून या दिगज्जांना नवीन मापदंड प्राप्त करण्यासाठी, निर्माण करण्यासाठी, वाढविण्यासाठी बळ मिळून त्यांच्या संपत्तीचे संरक्षण होईल. त्यांच्या प्रयत्नांचा भाग म्हणून एडलवाईजने सहा क्रीडापटूना रु. 1 कोटींचे जीवन विमा संरक्षण आणि रु. 10 लाखांचे आरोग्य विमा कवच देण्यात येईल. या क्रीडानिपुण व्यक्तींची आशियाई खेळ 2018 आणि सीडब्ल्यूजी 2018 मध्ये दिमाखदार कामगिरी पाहता, एडलवाईज ग्रुपच्या वतीने रु. 5 लाखांच्या इनामासोबत दीर्घकालीन वित्तीय सुरक्षा देऊ करण्यात येते आहे.
त्यांच्या सहापैकी तीन क्रीडा दिगज्जांना भारत सरकारतर्फे सर्वात मोठ्या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने अलीकडेच सन्मानित करण्यात आले असल्याची गौरवास्पद घोषणा एडलवाईजच्या वतीने करण्यात आली. पद्म श्री व राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार वेटलिफ्टर मीराबाई चानू यांना तर धावपटू हिमा दास आणि टेबल टेनिसपटू मनिका बत्रा यांना अर्जुन पुरस्कार मिळाला आहे.
एडलवाईजची खेळाप्रती दीर्घकालीन वचनबद्धता असून ती त्यातून उत्कृष्टता संस्कृती प्रतिध्वनित होते. त्यांची सेवाभावी संस्था – एडलगीव्ह फाउंडेशन हा समूह एमसी मेरी कॉम, पीव्ही सिंधू आणि आयोनिका पॉल सारख्या काही महिला क्रीडापटूंना पाठबळ देत त्यांच्या प्रशिक्षण, पोषण, फिजियोथेरपी इ. काळजी घेतो आहे.
Comments
Post a Comment