२०२० पर्यंत २.६ दशलक्ष भारतीयांचा मृत्यू कोरोनरी हार्ट डिसिजमुळे - डब्लूएचओ

२०२० पर्यंत २.६ दशलक्ष भारतीयांचा मृत्यू 
कोरोनरी हार्ट डिसिजमुळे - डब्लूएचओ
विकसित देशांत कार्डिओव्हस्क्युलर मृत्यूंचे प्रमाण १३७ टक्के पर्यंत वाढण्याची शक्यता आहे
           
कार्डिओव्हस्क्युलर आजार हे विकसनशील व विकसित देशांमध्ये होणाऱ्या मृत्यूंचे एक कारण आहे. सन २०३० पर्यंत, कार्डिओव्हस्क्युलर मृत्यूंचे प्रमाण १३७ टक्के वाढण्याची शक्यता आहे. जगभर होणाऱ्या मृत्यूंसाठी हृदयाचे विकार कारणीभूत असून, त्यामुळे दरवर्षी जगभरात लाखो जण मरण पावतात. २०२० पर्यंत २.६ दशलक्ष भारतीयांचा मृत्यू कोरोनरी हार्ट डिसिजमुळे (सीएचडी) होईल, असा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात वर्तवला आहे. सर्व सीव्हीडी मृत्यूंमध्ये हे प्रमाण ५४.१ असेल. तसेच यापैकी निम्मे मृत्यू ३० ते ६९ वर्षे वयोगटातील तरुण व मध्यमवयीन व्यक्ती यांचे असण्याची शक्यता आहे. तर पाश्चिमात्त्य देशांत होणाऱ्या सीएचडीशी संबंधित मृत्यूंपैकी केवळ २३ टक्के मृत्यू या वयोगटामध्ये होणारे आहेत. दुर्दैवाने, कोणीही इतके “तरुण” नसते की त्याने दृदयविकाराच्या झटक्याने मरावे. पारंपरिक कोरोनरी आर्टरी डिसिज तरुण प्रौढांमध्येही दिसून येत असून, दृदयविकाराच्या झटक्यामध्ये त्याचे योगदान अंदाजे ८० टक्के  आहे. यामुळे ‘का?  हा प्रश्न निर्माण होतो’

डॉ. पूरबी कोच, स्पेशालिस्ट – नॉन इन्व्हेजिव्ह कार्डिऑलॉजी, कोकिलाबेन धीरूभाई अम्बानी हॉस्पिटल यांचे कोरोनरी आर्टरी डिसिजला प्रतिबंध करण्यासाठी सगळ्यांना सांगणे आहे, एक रुग्ण म्हणून नाही तर, एक पाहुणा म्हणून रुग्णालयात जा. आजाराचे लवकर निदान होण्यासाठी व दीर्घकालीन धोका टाळण्यासाठी प्रिव्हेंटिव्ह स्क्रीनिंग हेल्थ चेक-अप गरजेचे आहे, आभार माना. प्रत्येक दिवसाची सुरुवात समाधानी मनाने करा.

डॉ. पूरबी कोच मतानुसार कोरोनरी आर्टरी डिसिजला प्रतिबंध करता येऊ शकतो – हा एक जीवनशैलीविषयक आजार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार, तीन चतुर्थांश कार्डिओव्हस्क्युलर आजार केवळ जीवनशैलीमुळे रोखता येऊ शकतात. आपले हृदय तरुण राहण्यासाठी विशिष्ट हेतू ठेवून जगा. तुम्ही काय खाता आहात, त्याचा विचार करा. जेवणातले पदार्थ एकत्र ठेवा व तसे करण्याच्या प्रक्रियेचा आनंद घ्या. निरोगी पदार्थ खा, खेळ खेळा, योग करा, चाला किंवा नाचा.. नवे काहीतरी शिका, कोणतीही वाईट सवय कायमची सोडून देण्याचा कानमंत्र म्हणजे, त्या सवयीपेक्षा चांगल्या गोष्टीकडे लक्ष वेधून घ्या, प्रत्येक तणावपूर्व दिवशी क्षणभर श्वसन करा. अल्पकालीन उद्दिष्टे ठरवा व ती पूर्ण केल्यावर स्वतःला बक्षीस द्या. वेग कमी करा. करायच्या नाहीत, अशा काही गोष्टी ठरवा. आराम करा.

२९ सप्टेंबर – जागतिक हृदय दिन हा वर्ल्ड हार्ट फेडरेशनने कार्डिआक आरोग्याविषयी जागृती करण्यासाठी सुरू केलेला जागतिक उपक्रम आहे. जागतिक हृदय दिन -२०१८ यासाठी मध्यवर्ती संकल्पना “माय हार्ट, युवर हार्ट” ही आहे. आपल्या हृदयाची व आपल्या प्रियजनांच्या हृदयाची काळजी घेण्याचा निश्चय करूया. आयुष्य ही एक दैवी देणगी आहे, अतिशय सुंदर प्रवास आहे. प्रत्येकाने छान जगावे. कारण, प्रत्येक आयुष्य महत्त्वाचे आहे.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE