इंडिया किड्स फॅशन विक 2018मध्ये बीबा गर्ल्सचा दिमाख
इंडिया किड्स फॅशन विक 2018मध्ये बीबा गर्ल्सचा दिमाख
· मुंबईमध्ये इंडिया किड्स फॅशन वीकच्या सहाव्या अवृत्तीमध्ये एथनिक ब्रॅंडने आपले लेस्टेस्ट ऑटम विंटर 2018 कलेक्शन सादर केले.
· लिटिल बीबा दिव्हा- लहान मुलींनी सहभाग घेण्यासाठी आणि रँप वॉकची संधी देण्यासाठीची एक ऑनलाइन आणि ऑफलाइन स्पर्धा
बीबा गर्ल्स, या बीबाच्या 2-12 वयोगटातील लहान मुलींसाठी असलेल्या एथनीक वेयरसाठी समर्पित असलेल्या रेंजने इंडिया किड्स फॅशन वीक 2018च्या सहाव्या अवृत्तीमध्ये आपले नवीनतम फेस्टिव्ह कलेक्शन सादर केले, हा सोहळा ललित मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. प्रतिभावान आणि सुंदर बॉलिवुड अभिनेत्री श्रृती सेठ यांनी लहान सुंदऱ्यांसोबत बीबाच्या लेटेस्ट फेस्टिव्ह कलेक्शनमध्ये शोस्टॉपर बनून रँपची शोभा द्विगुणित केली.
एक पाऊल पुढे जात, या वर्षी इंडिया किड्स फॅशन वीक दिल्ली, बंगलोर, अहमदाबाद, कोलकता, चंदिगढ, हैद्राबाद आणि मुंबई या 7 शहरांमध्ये आयोजित करण्यात येत असून भारतभरातील फॅशन शोमध्ये बीबा गर्वाने सहभाग घेत आहे.
आपल्या चाहत्यांसाठी 7 शहरांमध्ये ऑनलाइन आणि ऑफलाइन स्पर्धा घेऊन या सोहळ्यासाठी बीबा लीटिल बीबा दिव्हा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी लहान मुलींना विशेष संधी देत आहे. या लहानग्या सहभाग्यांना बीबा आउटफीटमध्ये आपले फोटो द्यायचे आहेत, ज्यामधून प्रत्येक शहरातील 2 भाग्यवान मुलींना रँप वॉक करण्याची संधी मिळणार आहे.
या प्रसंगी बोलताना श्री सिध्दार्थ बिंद्रा, एमडी, बीबा म्हणाले, “आम्ही सलग चार वर्षांपासून इंडिया किड्स फॅशन वीकमध्ये सहभाग घेत आहोत आणि आमचा हा प्रवास अतिशय सुखद ठरला आहे. बीबा गर्ल्सना आमच्या ग्राहकांकडून तसेच फॅशन जगताकडून उदंड प्रेम आणि प्रतिसाद मिळाला आहे. आमच्या नवीन सादरकरणाच्या मार्फत आम्ही किड्स वेअर क्लोदिंग श्रेणीमध्ये नवीन टप्पा गाठण्याचे धेय्य बाळगत आहोत.”
लेटेस्ट बीबा गर्ल्स ऑटम विंटर कलेक्शन 2018मध्ये ब्लश पिंक्स, व्हायब्रंट ह्यूज, ग्लिटर सेक्विन्ससोबतचे ब्ल्यूज, गोल्ड फॉइल प्रिंट्स, पारंपारिक भागतीय ब्लॉक्स, पटोला यांच्यासोबतच्या फ्लोरल व चेक्सच्या मिलाफाचा समावेश असलेला आढळतो. या रेंजमध्ये विविध प्रकारचे शरारे, लेअर्ड कुर्ता, टायर्ड जॅकेट्स, लेहेंगा सेट्स इ. निवडता येऊ शकतात. चंदेरी, वॉइले, नेट, ड्युपिअन आणि ब्रोकेड सोबत अतिशय कलात्मकतेने हे कलेक्शन साकारण्यात आले असून ते अतिशय स्टायलिश तरीदेखील अतिशय आरामदायक लुक देते.
या भुरळ पाडणाऱ्या आकर्षक बीबा गर्ल्स फेस्टिव्ह कलेक्शन सोबत ट्रेंड सेट करा आणि तुमच्या लहानगीला मॉर्डन दिव्हामध्ये परिवर्तीत करा.
Comments
Post a Comment