ज्युबिलंट फूडवर्क्सकडून पेप्सीकोची डॉमिनोजचे शीतपेय भागीदार म्हणून घोषणा
ज्युबिलंट फूडवर्क्सकडून पेप्सीकोची डॉमिनोजचे शीतपेय भागीदार म्हणून घोषणा
ज्युबिलंट फूडवर्क्सने आज पेप्सीकोची डॉमिनोजचे शीतपेय भागीदार म्हणून घोषणा केली. या भागीदारीचा भाग म्हणून पेप्सीकोची पेप्सी, ७ अप आणि मिरिंडा ही शीतपेये लिप्टन आईस टी सोबत डॉमिनोजच्या भारतातील सर्वरेस्टॉरंट्समध्ये विकली जातील.
या भागीदारीविषयी अधिक माहिती देताना ज्युबिलंट फूडवर्क्सचे प्रमुख कार्यकारी अधिकारी आणि पूर्ण वेळ निर्देशक श्री. प्रतीक पोटा म्हणाले कि, "पेप्सीकोची शीतपेय भागीदार म्हणून घोषित करण्यास आम्हाला खूप आनंद होत आहे. या भागीदारीमुळे आमच्या शीतपेय पोर्टफोलिओवर नव्याने लक्ष केंद्रित करता येणार आहे. आम्ही शीतपेयांचे विविध उत्कृष्ट पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध करून देणार आहोत ज्यामुळे त्यांना डोमिनोजचा पिझ्झाचा चांगला अधिकअनुभव मिळू शकेल."
पेप्सिको इंडियाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी अहमद एल शेख आणि ज्युबिलंट फूडवर्क्स लिमिटेडचे प्रमुख कार्यकारी अधिकारी आणि पूर्ण वेळ निर्देशक श्री. प्रतीक पोटा या घोषणेच्या वेळी उपस्थित होते.
Comments
Post a Comment