नेस्टअवे सह ऑफरवाली दिवाली
नेस्टअवे सह ऑफरवाली दिवाली
दिवाळीतील ऑफर्ससाठी पेटीएम, झोमॅटो, चाय पॉइंट आणि रेंटोमोजोशी भागीदारी
नेस्टअवे टेक्नोलॉजीज या भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाइन होम रेंटल प्लॅटफॉर्मतर्फे 'ऑफरवाली दिवाली - घर एक, ऑफर चार' हे कॅम्पेन सुरू करण्यात आले आहे. नेस्टअवे प्लॅटफॉर्मवर३० ऑक्टोबर २०१८ ते १० नोव्हेंबर २०१८ या कालावधीत बुकिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी ही ऑफर लागू असेल. ₹५,००० हून अधिक मूल्याच्या या ऑफर्ससाठी नेस्टअवेने पेटीएम, चाय पॉइंट,झोमॅटो आणि रेंटोमोजो यांच्याशी भागीदारी केली आहे. नेस्टअवेचे ग्राहक सर्व नेस्टअवे होम्समध्ये या ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात. नेस्टअवेच्या ग्राहकांसाठी इतर आकर्षक ऑफर्सच लवकरचसुरू होणार आहेत.
● एक ऑफ वर्षभरासाठी - नेस्टअवेच्या ग्राहकांसाठी वर्षभरासाठी झोमॅटो गोल्ड मेंबरशिप मोफत (सोमवार ते गुरुवार).
● एक ऑफर आप्तेष्टांना भेटण्यासाठी - ग्राहकांनी पेटीएमने बुकिंग केल्यास विमानाच्या तिकिटांवर ५०% सवलत* आणि बस तिकिटांच्याबुकिंगवर ₹२०० सवलत.
● एक ऑफर शुभारंभासाठी - नेस्टअवेच्या ग्राहकांना ३ दिवस चाय पॉइंटमध्ये मोफत नाश्ता मिळेल.
● एक ऑफर आपल्या घरासाठी - नेस्टअवेच्या ग्राहकांना रेंटोमोजोकडून ₹२५०० चे व्हाउटर मिळेल (फर्निचरव्यतिरिक्त इतर वस्तूंसाठीलागू).
बुकिंग प्रक्रिया पूर्ण झाली की, नेस्टअवेच्या ग्राहकांना त्यांच्या मोबाइल अॅपवर सर्व ऑफर आफोआप लागू होतील.
नेस्टअवे टेक्नोलॉजीज प्रा. लि.बद्दल
भारतातील शहरांमध्ये स्थलांतरित होणाऱ्यांना आपल्या आवडीचे घर शोधताना नेहमीच भेदभाव आणि अडथळ्यांना सामोरे जावे लागते. या मुद्द्यांमुळेघरमालक आणि भाडेकरू यांच्यात एक अविश्वासाचे वातावरण तयार होते. आपल्या सर्वंकष सेवांच्या माध्यमातून या समस्यांवर तोडगा काढण्यासाठीनेस्टअवे टेक्नोलॉजीज हे भारतातील सर्वात मोठे होम रेंटल नेटवर्क अस्तित्वात आले. सध्या आपल्या नेटवर्कमधील २५००० घरांमध्ये ५५०००हून अधिकभाडेकरू आहेत. अत्यंत निष्ठावान संलग्न भागीदारांशी भागीदारी करून कंपनीने बाजारपेठेत एक निश्चित स्थान प्राप्त केले आहे. त्यांच्याकडून सातत्यानेमिळणाऱ्या सहकार्याशिवाय कंपनीला इतक्या कमी काळात हा मैलाचा दगड साध्य करणे शक्य झाले नसते, अशी नेस्टअवेची धारणा आहे. बंगळुरू, नवीदिल्ली, नोएडा, गुरुग्राम, पुणे, हैदराबाद, गाझियाबाद आणि मुंबईमध्ये नेस्टअवेचे अस्तित्व आहे. अमरेंद्र साहू, दीपक धर, जितेंद्र जगदेव आणि स्मृती परिदायांनी २०१५ साली या कंपनीची स्थापना केली.
Comments
Post a Comment