रसनाकडून सायना नेहवालची ब्रँड अम्बेसिडर म्हणून निवड

रसना नेटिव्ह हाट हनी आणि हनी व्हिटासाठी रसनाकडून सायना नेहवालची ब्रँड अम्बेसिडर म्हणून निवड
नव्या उत्पादन रेंजसाठी सायना नेहवालसह रसनाची जाहीरात मोहीम

 फळांवर आधारित इन्सटंट कॉन्सण्ट्रेटच्या उत्पादनातील पहिली जागतिक कंपनी असलेल्या रसनाने नेहमीच ग्राहकांना सर्वोत्कृष्ट उत्पादन व सेवा देण्याप्रति प्रामाणिकपणा बाळगला आहे. आजचा ग्राहक आरोग्याच्या बाबतीत फारच जागरुक झाला असून नैसर्गिक मूलतत्वे मिळावीत, यासाठी तो आग्रही झाला आहे. यात मध, महत्वपूर्ण तेल, मसाला तेल, बदाम चूर्ण आदींचा समावेश आहे. ही बाब ध्यानात घेऊन, रसायने व संरक्षक घटक न मिसळता उत्पादन शुद्ध स्वरूपात देण्याच्या आपल्या वचनाला जागून रसना कंपनीने “रसना नेटिव्ह हाट’’ या नव्या ब्रँडला जन्म दिला आहे.

“पुन्हा निसर्गाकडे जा’’ या एकाच ओळीतील वचनातून रसना नेटिव्ह हाट या ब्रँडचा जन्म झाला आहे. रसना नेटिव्ह हाट आमपन्ना, शिकांजी या चूर्ण तसेच, प्येय स्वरूपात उपलब्ध असलेल्या उत्पादनातून हे तत्व सिद्ध झाले आहे. आता, उत्पादन पोर्टफोलिओमध्ये भर म्हणून रसना नेटिव्ह हाट या ब्रँड अंतर्गत हनी व्हिटा आणि बदाम व्हिटा चूर्ण व मध ही उत्पादने रसनाने सादर केली आहेत. ही उत्पादने खालील एसकेयूमध्ये उपलब्ध आहेत –
हनी व्हिटा (चॉकलेट फ्लेव्हर) – 18 ग्रॅम, 100 ग्रॅम (75 ग्रॅम + 25 ग्रॅम मोफत), 600 ग्रॅम (450 ग्रॅम + 150 ग्रॅम मोफत), 500 ग्रॅम
बदाम व्हिटा (बदाम फ्लेव्हर) – 12 ग्रॅम, 200 ग्रॅम
मध (नैसर्गिक) – 750 ग्रॅम, 500 ग्रॅम, 250 ग्रॅम, 50 ग्रॅम

बदाम व्हिटा चूर्णामध्ये 21 जीवनसत्वे, खनिजे, बदामाचे सार असून हनी व्हिटा चूर्णामध्ये मध आणि 21 जीवनसत्वे, खनिजे, माल्ट एक्स्ट्रॅक्ट्स, धान्य यांचा अंतर्भाव असल्यामुळे ही प्येय व चूर्ण शरिराला ऊर्जा देण्यासाठी उपयुक्त आहेत.

ही उत्पादने अधिक लोकप्रिय करण्याकरिता, रसना नेटिव्ह हाट या ब्रँडने नव्या ब्रँड अम्बेसिडर पदी श्रीमती सायना नेहवाल हिची निवड केली आहे. सायना हिने हनी आणि हनी व्हिटा या दोन्ही उत्पादनांच्या टीव्ही जाहीरातीचे चित्रीकरण पूर्ण केले आहे.

याविषयी बोलताना रसना प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष श्री. पिरूझ खंबाटा म्हणाले, “आमच्या नव्या मोहिमेसाठी सायना नेहवाल हिच्याशी भागीदारी करताना आम्हाला आनंद होतो आहे. रसायन व संरक्षक घटकमुक्त असलेल्या आमच्या रसना नेटिव्ह हाट या ब्रँडच्या आरोग्य उत्पादनांशी सायनाचा आजवरचा प्रवास मिळताजुळता आहे. नवीन आणि कल्पक उत्पादने ग्राहकांना देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.”
या भागीदारीबद्दल बोलताना सायना नेहवाल म्हणाली, “रसना हा भारतातला एक विश्वसनीय ब्रँड आहे. माझ्या लहानपणापासून हे माझे एक आवडते प्येय आहे. रसना नेटिव्ह हाट या ब्रँड अंतर्गत हनी आणि हनी व्हिटा या उत्पादनांशी जोडले गेल्याचा मला फार आनंद होत असून नैसर्गिक आणि आरोग्यपूर्ण उत्पादनांवर या ब्रँडचा भर आहे.’’

रसना प्रायव्हेट लिमिटेडबद्दल

रसना ही भारतातील सर्वांत प्रसिद्ध एफएमसीजी कंपनी असून 53 हून अधिक देशांमध्ये विक्री असलेला हा कुटुंबव्यवसाय आहे. ISO – 22000-2005 सह आमची आठ उत्पादन केंद्रे असून त्यांना एचएसीसीपी, एचएएलएएल, एफएसएसएआय प्रमाणीकरण मिळाले आहे. भारतात 26 डेपो, 200 हून अधिक सूपर स्टॉकिस्ट, 5000 स्टॉकिस्ट, 900 सेल्स फोर्स अंतर्गत असलेली 1.6 दशलक्ष दालने या माध्यमातून आम्ही देशात वितरण करतो.
भारतात व परदेशातही रसनाचे विपणन जाळे मजबूत आहे. रसनाला आजवर द इंटरनॅशनल टेस्ट अँड क्वालिटी इन्स्टिट्यूटचा 2008चा सुपिरिअर टेस्ट पुरस्कार, बेल्जियम कान्स लायन्स लंडन, मॉण्ड सिलेक्शन पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. नुकताच या ब्रँडला त्यांच्या रसना फ्रूट प्लस या जगातील सर्वात जलद विरघळणाऱ्या चूर्णासाठी आयटीक्यूआयचे श्री. क्रिस्टिन डे ब्यू यांच्या उपस्थितीत मास्टर ब्रँडचा द वर्ल्ड ब्रँड कॉंग्रेस पुरस्कार मिळाला आहे.
उत्पादन रेंजसाठी तसेच, विपणन व वितरणासाठी रसना ही एक कल्पक कंपनी म्हणून ओळखली जाते. कंपनीचे 100 टक्के रिकॉल आणइ 80 टक्के बाजारपेठ समभाग आहेत.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24