विकासकांचे ३४० ते ४२० चौरस फुटांच्या घरांकडे ओढा

विकासकांचे ३४० ते ४२० चौरस फुटांच्या घरांकडे ओढा

मुंबई-- बांधकाम क्षेत्रांतील आर्थिक चणचण पाहता नामांकित विकासकांनी छोटी घरे बांधण्याकडे पाऊल टाकले आहे. यात ३४० ते ४२० चौरस फुटांची घरे २५ लाखांपासून ते ५४ लाखांपर्यंत उपलब्ध करून दिली जात आहेत. विशेष म्हणजे नव्या विकास नियंत्रण नियमावलीत व्यावसायिक संकुलासाठी अधिकचे चटई क्षेत्रफळ देण्यात आले असूनही विकासक छोट्या घरांच्या उभारणीत अग्रेसर पाहायला मिळत आहे.

सध्या मुंबईलगत असलेल्या पालघर, डहाणू, वसईविरार, नायगाव तसेच मीरा-भाईंदर, घोडबंद तर दुसरीकडे भिवंडी, कल्याण, डोंबिवली या भागांत नामांकित विकासकांचे छोट्या निवासी सदनिका बांधण्याचे काम सुरू आहेत. यात शेकडो घरांचा प्रकल्प २६ पासून ते १०० एकरवर उभारण्यात येत आहे. यात हावरे प्रॉपर्टी, निर्वाणा रिअँल्टी, संघवी पार्श्व या विकासकांचे मोठे प्रकल्प सुरू आहेत.

राज्य सरकारकडूनही विकास नियमावलीत जादा चटई क्षेत्रफळ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामुळे रोजगार वाढण्यास मदत होईल, अशी आशा व्यक्त करण्यात आली होती. मात्र सध्या व्यावासियक संकुलाऐवजी निवासी संकुलावर भर देण्यात आला आहे.

सध्या वाडा आणि डहाणूत २६ एकरहुन अधिक एकरांवर आमचे प्रकल्प सुरू आहेत. यात सर्वसामान्यांना परवडणारी घरे उभारण्यात आमचा मानस असल्याचे निर्वाणा रिअँल्टीचे सीईओ पुनीत अग्रवाल यांनी सांगितले. तर कल्याण येथे सर्वसामान्यांना परवडणारी शेकडो घरांचा प्रकल्प सुरू आहे. यात मोठ्या घरांच्या प्रकल्पाप्रमाणे अत्याधुनिक सेवा सुविधा ग्राहकांना देण्यात येणार असल्याचे हावरे प्रॉपर्टीचे सीईओ आणि जाँइट एमडी अमीत हावरे यांनी सांगितले. तसेच आटगाव आणि भिवंडी भागांत छोट्या आणि सर्वसामान्यांना परवडणाऱ्या घरांचा प्रकल्प सुरू असल्याचे संघवी पार्श ग्रुप ऑफ कंपनीजचे सीएमडी रमेश संघवी यांनी सांगितले.



बांधकाम क्षेत्रात आर्थिक चणचण सुरू असल्याने विकासही व्यावसायिक संकुलांची उभारणीकरण्या ऐवजी निवासी संकुलांची उभारणी करून बांधकाम क्षेत्राला सावरू पाहत असल्याची प्रतिक्रिया बांधकाम क्षेत्र अभ्यासक प्रीतम धामणस्कर यांनी व्यक्त केली.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

Satin Creditcare Network Limited Q1FY21: Resilient Performance Backed by Strong Collections and Lower NPAs

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth