ग्रोअर अॅण्‍ड वेल (इंडिया) लिमिटेडतर्फे वायर इंडिया २०१८ मध्‍ये प्रभावी उत्‍पादनांचे प्रदर्शन

ग्रोअर अॅण्‍ड वेल (इंडिया) लिमिटेडतर्फे वायर इंडिया २०१८ मध्‍ये
प्रभावी उत्‍पादनांचे प्रदर्शन 
ग्रोअर अॅण्‍ड वेल (इंडिया) लिमिटेडने मुंबईमध्‍ये २७ ते २९ नोव्‍हेंबरदरम्‍यान आयोजित करण्‍यात आलेल्‍या वायर व केबल इंडस्‍ट्रीसाठी आंतरराष्‍ट्रीय प्रदर्शन 'वायर इंडिया २०१८'मध्‍ये सहभाग घेतला. प्रदर्शनाचे हे सातवे पर्व होते. हे प्रदर्शन वायर्स व केबल्‍स, ऑप्टिकल फायबर केबल्‍स, स्‍क्रू, स्प्रिंग्‍ज, वायर रोप्‍स आणि इतर वायर उत्‍पादनांच्‍या निर्मितीसाठी साहित्‍य, मशिनरी आणि उपकरणाची सेवा देते.
ग्रोअर अॅण्‍ड वेल (इंडिया) लिमिटेडने ल्‍यूब व इंजीनिअरिंगशी संबंधित प्रसिद्ध उत्‍पादनांच्‍या रेंजला प्रदर्शित केले. कंपनी ग्रोडल ब्रॅण्‍ड नावांतर्गत विविध औद्योगिक उपयोजनांसाठी विशेष ल्‍युब्रिकण्‍ट्स व तेलांची विस्‍तृत रेंज सादर करते. आधुनिक व अत्‍याधुनिक तंत्रज्ञानांच्‍या वापरासह उत्‍पादने उच्‍च कामगिरी करण्‍यासाठी आणि मूल्‍यानुसार सोल्‍यूशन्‍स देण्‍यासाठी तयार करण्‍यात येतात. सर्व उत्‍पादने पर्यावरणास अनुकूल असण्‍यासोबतच आंतरराष्‍ट्रीय दर्जाची आहेत आणि अंतिम युजर्सना अधिकतम दर्जा मिळण्‍याची खात्री देतात. ग्रोअर अॅण्‍ड वेल (इंडिया) प्रत्‍येक उद्योगाच्‍या सरफेस फिनिशिंग आवश्यकतांची पूर्तता करण्‍यासाठी इंजीनिअरिंग प्‍लाण्‍ट्स आणि अतिरिक्‍त उपकरणांची व्‍यापक रेंज उत्‍पादित करण्‍यासोबतच विपणन देखील करते.
वायर इंडिया हा सर्वात महत्‍त्‍वाचा आणि सहाय्यक वायर व केबल शो आहे. या प्रदर्शनामध्‍ये उपस्थितांना इलेक्‍ट्रीकल, दूरसंचार, इमारत व बांधकाम, परिवहन आणि उत्‍पादन अशा सर्व क्षेत्रांमध्‍ये आवश्‍यक असलेल्‍या व्‍यापक व उच्‍च दर्जाच्‍या केबल्‍स उपलब्‍ध होतात. प्रदर्शनाचे भाग असलेले व्‍यवसाय चर्चा आणि व्‍यावसायिक कृती यांची वर्षानुवर्षे प्रदर्शनाला भेट दिलेल्‍या तज्‍ज्ञांनी भरभरून प्रशंसा केली आहे. भारताच्‍या आर्थिक विकासाला उच्‍च पातळीवर आणण्‍याचा प्रदर्शनाचा उद्देश आहे आणि प्रदर्शनाच्‍या हेतूनेच जगभरात प्रदर्शनाचे महत्‍त्‍व वाढवले आहे. उत्‍पादनांची प्रगत रेंज दाखवली जात असल्‍यामुळे सहभागींना अविश्‍वसनीय व्‍यवसाय संधी मिळतात. या प्रगत रेंजने विदेशी प्रतिनिधींचे लक्ष वेधून घेण्‍यासोबतच त्‍यांना गुंतवणूक करण्‍यास भाग पाडले आहे. परिषद देवाणघेवाणीसोबतच व्‍यवसाय संपर्क निर्माण करण्‍यासाठी आणि त्‍यांच्‍या विस्‍ताकरणासाठी संधी देते.
या प्रदर्शनाबाबत बोलताना ग्रोअर अॅण्‍ड वेल (इंडिया) लिमिटेडच्‍या आरअॅण्‍डडी (ल्‍यूब्‍स) विभागाचे उप- महाव्‍यवस्‍थापक यशवंत महाजन म्‍हणाले, ''वायर इंडिया हे प्रभावी व्‍यासपीठ आहे. या व्‍यासपीठावर उद्योगातील विविध भागधारक एकत्र येत माहितीची देवाणघेवाण करतात आणि नेटवर्किंग संधी निर्माण करतात. आमच्‍या स्‍टॉलला मिळालेला प्रतिसाद पाहून आम्‍हाला खूप आनंद होत आहे आणि आम्‍ही मते व माहिती शेअर करण्‍यासाठी उद्योगातील इतर अनेक तज्‍ज्ञांची देखील भेट घेऊ शकतो.''

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE