इंडियाबुल्स म्युच्यूअल फंडकडून इंडियाबुल्स इक्विटी हायब्रिड फंडची सुरुवात
इंडियाबुल्स म्युच्यूअल फंडकडून
इंडियाबुल्स इक्विटी हायब्रिड फंडची सुरुवात
इक्विटी आणि कर्ज साधनांच्या योग्य मिश्रणाच्या माध्यमातून दीर्घकालीन परतावा आणि भांडवल मिळवण्याचे उद्दीष्ट
प्रोडक्टची वैशिष्ट्ये
· एनएफओचा कालावधी : 22 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर, 2018
· इक्विटी पोर्शनमध्ये गुंतवणूक करत असताना सेक्टर अॅलोकेशन निश्चित करण्यासाठी करंट अकाउंट डेफिशिट म्हणजेच कॅड हा प्रमुख गुंतवणूक निकष आहे. कर्ज पोर्टफोलिओचा गुंतवणूक कालावधी निश्चित करण्यासाठीही कॅड लेवल वापरण्यात येईल.
· सद्य परिस्थितीचा विचार करता लार्ज कॅप बायससह मल्टी कॅप स्ट्रॅटेजीमध्ये गुंतवणूक
· कर्ज पोर्टफोलिओजमध्ये प्रामुख्याने एए+ आणि त्याहून चांगले असणारे क्रेडीट रेटिंग सक्रिय कालावधी व्यवस्थापनासह समाविष्ट असेल.
मुंबई: इंडियाबुल्स म्युच्युअल फंडने आज इंडियाबुल्स इक्विटी हायब्रिड फंडची घोषणा केली. ही एक ओपन एंडेड हायब्रिड स्कीम आहे. जी प्रामुख्याने इक्विटी आणि इक्विटीसंबंधी साधनांमध्ये गुंतवणूक करते. गुंतवणुकीचा प्रमुख निकष समजला जाणार्या कॅड लेवल्सवर आधारीत कर्ज पोर्टफोलिओ अंतर्गत इक्विटी पोर्टफोलिओ आणि कालावधी यांचा विचार करुन सेक्टर एक्सपोजर घेतला जातो. हा सर्वात महत्वाचा आर्थिक निर्देशांक समजला जातो. हा फंड सुमित भटनागर (इक्विटी विभाग), विकेश गांधी (को फंड मॅनेजर - इक्विटी विभाग) आणि मलाय शहा (कर्ज विभाग) यांच्याकडून व्यवस्थापीत केला जात आहे.
इंडियाबुल्स इक्विटी हायब्रिड फंडच का?
· मुल्यांकन योग्य त्या पातळीवर असतानाच गुंतवणुकीची सर्वोत्तम संधी असते. अस्थिर बाजारात उत्तम पोर्टफोलिओसाठी अनुकूल अॅसेट अॅलोकेशन धोरणासाठी गुंतवणूक करणे अपेक्षीत असते.
· सध्या इक्वीटी बाजार सुधारणेच्या टप्प्यामधून वाटचाल करत आहे. बाजार मुल्यांकन कमी होत असून प्राईस टू अर्निंग 31 ऑगस्ट, 2018 पासून 28.40 वरुन ऑक्टोबर 2018 च्या अखेरपर्यंत 25 पर्यंत खाली आले आहे. (स्त्रोत : एनएसई इंडिया)
· दि. 31 ऑक्टोबर 2018 च्या अहवालानुसार गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरच्या तुलनेत 10 वर्षी बेंचमार्क यिल्ड स्थिर गतीने 6.94 टक्क्यांवरुन 7.85 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. आताचे मुल्यांकन आणि यिल्ड लेवल यांचा विचार करता गुंतवणुकदारांना गुंतवणुकीची आकर्षक संधी उपलब्ध होत आहे. (स्त्रोत : रॉयटर्स)
फंडच्या लाँचप्रसंगी बोलताना इंडियाबुल्स म्युच्युअल फंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी राघव अय्यंगर यांनी सांगितले की, “आज भारत मजबूत जीडीपीच्या माध्यमातून आज मॅक्रो इकॉनॉमिक रिकव्हरीच्या केंद्रस्थानी असून सर्व उपभोग डेटा स्थिरता दाखवत आहे. तरीही बाजार अस्थिर बनत असून जागतिक पातळीवर व्याज दर तसेच इंधनाच्या किंमती वाढत आहेत. अशा परिस्थितीत आम्हाला असे वाटते की, हायब्रिड फंड्स गुंतवणुकदारांना या अस्थिरतेवर मात करण्याची संधी देतात. हायब्रिड फंड्सकडून दिल्या जाणार्या डेब्ट कंपोनंट्समुळे इक्विटीच्या प्रदर्शनामध्ये स्थिरता येते आणि त्याला योग्य तो एक्सपोजर मिळून आवश्यक ते लाभ मिळू शकतात.”
Comments
Post a Comment