एनबीएचसीच्या महत्त्वाच्या कीटक व्यवस्थापन विभागाचा नावबदल, ‘पेस्टिंक्ट प्रो सोल्युशन्स नवीन नाव जाहीर
एनबीएचसीच्या महत्त्वाच्या कीटक व्यवस्थापन विभागाचा नावबदल, ‘पेस्टिंक्ट प्रो सोल्युशन्स नवीन नाव जाहीर
गेल्या दशकात झपाट्याने प्रगती केल्यानंतर एनबीएचसीच्या कीटक व्यवस्थापन विभागाला आता नवे नाव मिळाले असून विशिष्ट व्यापार विभाग आणि त्यांच्या ग्राहकांसाठी सुधारित सेवा यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले
मुंबई, नोव्हेंबर 29, 2018: नॅशनल बल्क हँडलिंग कॉर्पोरेशन (एनबीएचसी) ही भारतातील एकात्मिक वस्तू आणि कृषी अवजारांमधील दुय्यम व्यवस्थापन सेवा प्रदान करणारी कंपनी असून त्यांनी त्यांच्या महत्त्वाच्या कीटक व्यवस्थापन विभागाचे नाव बदलून ते ‘पेस्टिंक्ट प्रो सोल्युशन्स’ करत असल्याचे जाहीर केले. यापूर्वी हा विभाग कॉमगार्ड नावाने ओळखला जात असे.
कीटक व्यवस्थापन उद्योगातील एक महत्त्वाची सेवा प्रदाता कंपनी म्हणून ओळख असलेल्या या कंपनीच्या मूळ मंचाने कंपनीला कीटक नियंत्रण संचलन क्षेत्रातील भारतातील पहिल्या तीन क्रमांकामधील स्थान मिळवून दिले. नव्या ‘पेस्टिंक्ट’ या ब्रँडमधून धाडसी महत्त्वाकांक्षा, सकारात्मक बदल आणि प्रगतीची अचल निष्ठा व्यक्त होते. एनबीएचसीचे यशस्वी व्यापार संबंध निर्माण करण्याचे सातत्य आणि निरंतर बदलत राहणाऱ्या तांत्रिक वातावरणात व्यावसायिक सेवा प्रदान करण्याची त्यांची वचनबद्धता यातून प्रकट होते.
तंत्रज्ञान-आधारित असणाऱ्या ‘पेस्टिंक्ट प्रो सोल्युशन्स’ या कंपनीने डिजिटल कौशल्याचा वापर करून (कस्टमाइज्ड एन्टरप्राईज रिसोर्स प्लॅनिंग {ईआरपी} सॉफ्टवेअरचा उपयोग करून) उत्पादनक्षमता प्राप्त केली आहे आणि त्यांचा ग्राहकांना त्वरित आणि सोप्या पद्धतीने वापर करता येईल असे स्वतःचे मोबाईल अॅप देखील कंपनीने विकसित केले आहे. कीटकांपासून प्रभावीरित्या मुक्तता देऊन आपला व्यापार सुरक्षित करणे आणि कामाच्या ठिकाणचे वातावरण हे कीटकमुक्त करण्यासाठी सुरक्षित आणि प्रभावी मार्गांचा अवलंब करणे हे कंपनीचे उद्दिष्ट आहे. कीटकांचा उपद्रव टाळण्यासाठी अतिशय कठोरपणे पर्यावरणासाठी अनुकूल परिस्थितीक तंत्राचा दृष्टीकोन अवलंबिला जात असून अन्न सुरक्षा आणि कीटक व्यवस्थापन मानदंड यांचे सातत्याने पालन केले जाईल यावर कंपनीचा कटाक्ष आहे.
पेस्टिंक्ट प्रो सोल्युशन्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. गिरीधर पै म्हणाले, “गेल्या दशकापासून आम्ही कीटक व्यवस्थापन उद्योगात कार्यरत आहोत आणि आम्ही लक्षणीय प्रगती केली आहे. अन्न प्रक्रिया, साठणूक आणि लॉजिस्टिक विभागात आम्ही आमचे स्थान बळकट केल्यावर आता आरोग्यसेवा क्षेत्र तसेच शैक्षणिक संस्थांना चांगली सेवा देऊन अशाच प्रकारे तिथेही आमचे स्थान निर्माण करण्याकडे आता आम्ही आमचे लक्ष केंद्रित केले आहे. व्यापारात मोठी वाढ होत असण्याच्या आणि आमच्या कार्यशैलीत अभूतपूर्व बदल होण्याच्या काळातच आम्ही हा नवा बदल केला आहे. आम्ही
नेहमीच ग्राहक-केंद्रित आणि नाविन्यपूर्ण दृष्टीकोन ठेवला आहे आणि आमच्या ब्रँडच्या प्रगतीमुळे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. आम्हाला एक नवा चेहरा हवा होता परंतु आम्हाला आमचा वारसा देखील टिकवून ठेवायचा होता. म्हणूनच, एनबीएचसीचा एक विभाग म्हणून सर्वोत्कृष्ट अनुकूल सेवा प्रदान करून आम्ही आमच्या भागधारकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकू आणि कंपनीची कीटक व्यवस्थापन सेवा नव्या दिशेने प्रगतीपथावर नेण्याच्या आमच्या उद्दिष्टाला या धोरणात्मक पुनर्पदार्पणामुळे बळकटी प्राप्त होऊ शकेल.”
प्रभावी कीटक व्यवस्थापनासाठी सर्वसमावेशक उपाययोजना प्रदान करण्याचे मुख्य उद्दिष्ट घेऊन 21 राज्यातील 47 शाखांच्या माध्यमातून पेस्टिंक्ट प्रो सोल्युशन्स आधुनिकीकरण,तंत्रज्ञान आणि सर्वोत्तम सेवा या बळावर कार्यरत आहे.
पेस्टिंक्ट प्रो सोल्युशन्स संबंधी:
पेस्टिंक्ट प्रो सोल्युशन्सचे पूर्वीचे नाव कॉमगार्ड असून नॅशनल बल्क हँडलिंग कॉर्पोरेशन (एनबीएचसी) चा एक विभाग आहे. कीटक नियंत्रण संचलन क्षेत्रातील ती भारतातील पहिल्या तीन क्रमांकातील एक महत्त्वाची कंपनी आहे आणि कीटक व्यवस्थापन उद्योगात ती गेली 10 वर्षे कार्यरत आहे.
कीटक व्यवस्थापन सेवा ते अन्नप्रक्रिया, साठवणूक आणि लॉजिस्टिक्स विभागातील ती एक अग्रगण्य कंपनी असून आरोग्यसेवा क्षेत्र आणि शैक्षणिक क्षेत्रात देखील असेच स्थान प्राप्त करण्याची कंपनीची योजना आहे. ही भारतातील सर्वात पहिली कीटक नियंत्रण संचालक (पीसीओ) असून कंपनीने 60 दशलक्ष मेट्रिक टन वस्तूंचे निर्जंतुकीकरण केले आहे. ग्राहकांना मोठी शृंखला असणारी अनुकूल सेवा देऊ करणारी बी2बी विभागातील ही विशेषीकृत कंपनी असून पेस्टिंक्ट प्रो सोल्युशन्स भारतातील 21 राज्यांतील 47 शाखांच्या माध्यमातून कार्यरत आहे.
वेबसाईट: https://www.pestinct.com/ index.php
We are the leading Best Pest Control service provider in Chennai,Madurai,Coimbatore,trichy and Bangalore..Call Now: 9941916916
ReplyDeleteTermite control
Rat control
Bed Bugs Control
Cockroach Control
All Residential & Commercial Pest Control
Nice blog..
ReplyDeleteWe are leading Supplier, dealer, pest control chemical, Fogging machine, cockroach killer paste, Fly catcher machine, chemical pesticides, Cockroach killer paste, fly killer machine, fill killer spray, mosquito control pesticides, Bayer pesticides, FMC pesticides, Sumitomo pesticides, heranba pesticides offer for besets control service provider in Ahmedabad, Gujarat, India
pest control chemical,
Pest Control Chemical Supplier
Insecticides
Bayer Pesticides
Fogging Machine
Wood Borer Control Chemical