एगॉन इन्श्युरन्सच्या वतीने डिजीटल ओन्ली पीओएस गॅरंटेड रिटर्न इन्श्युरन्स प्लानचा शुभारंभ
एगॉन इन्श्युरन्सच्या वतीने डिजीटल ओन्ली पीओएस गॅरंटेड रिटर्न इन्श्युरन्स प्लानचा शुभारंभ
एगॉन लाईफ इन्श्युरन्स, ही भारतातील अग्रगण्य डिजीटल इन्श्युरन्स कंपनी असून त्यांनी आज ‘पीओएस गॅरंटेड रिटर्न इन्श्युरन्स प्लान (ग्रीप)’ हे नॉन-लिंक्ड नॉन पार्टीसीपेटींग लाईफ इन्शुरन्स प्रोडक्ट सोपी वैशिष्ट्ये व खात्रीशीर लाभासह बाजारात दाखल केले. ज्या ग्राहकांना आयुष्यातील उद्दिष्ट्ये सुरक्षित करायची आहेत, सोबत खात्रीशीर परतावा पाहिजे, अशांसाठी हे उत्पादन तयार केले आहे.
एगॉन लाईफचे ध्येय कायमच आपल्या ग्राहकांना होल्ड वॅल्यू प्रोपोझीशन पर्याय पुरविण्याचे आहे. एगॉन लाईफ – पीओएस ग्रीप हा विस्तारित जीवन विमा पर्याय गुच्छातील असा एक पर्याय ठरतो. एगॉन लाईफला आपले ग्राहक सुरक्षित क्षेत्रात तणावमुक्त अवस्थेत ठेवायचे आहे. त्यांनी अलीकडेच दुसरा भाग “एगॉन, तो टेन्शन गॉन” या अभियानाचा शुभारंभ केला आहे. या अंतर्गत ग्राहकांनी पुरेसा जीवन विमा खरेदी करण्यात मागे-पुढे पाहू नये, यासंबंधी आवाहन करण्यात येते आहे.
पीओएस उत्पादने ही समजायला साधी आणि सोपी आहेत, जिथे या उत्पादनाचे फायदे ग्राहकांना अगोदरच उलगडून सांगितलेले असतात, त्यांच्या पुढे मांडलेले असतात. तसेच जोखीम स्वीकारणे/ नाकारण्यासंबंधी निर्णय ग्राहकाला दोन कार्यालयीन दिवसांच्या आत कळवल्याने, प्रक्रिया झटपट होते.
या उत्पादनाच्या शुभारंभाप्रसंगी बोलताना एगॉन लाईफ इन्शुरन्सचे एमडी आणि सीईओ श्री. विनीत अरोरा म्हणाले की, “आम्हाला ‘पीओएस ग्रीप’च्या शुभारंभाची घोषणा करताना अतिशय आनंद होत आहे. यामुळे पॉलिसी झटपट मिळते तसेच खात्रीशीर परताव्याची हमी आहे. ग्राहकांना समजेल अशी उत्पादन तत्त्वज्ञान सांगणारा हा पर्याय आहे. हा ज्यांना निश्चित परतावा साधनांत गुंतवणूक करायची आहे अशा ग्राहकांना कर प्रभावी खात्रीशीर परतावा उपलब्ध करून देतो. हा समजायला सोपा आहे आणि ग्राहकांना आपल्या सोयीने ऑनलाईन विकत घेता येतो.”
पीओएस ग्रीप संरक्षण आणि बचत असा दुप्पट लाभ देतो. पॉलिसी कालावधी संपल्यावर अखेरीस ग्राहकाला मिळणारा परतावा हा खात्रीशीर असतो व पॉलिसी विकत घेताना असा अप-फ्रंट असतो. खात्रीशीर समावेश हा मुलभूत खात्रीशीर रकमेच्या 10% समान (दरवर्षी) तसेच वन ऑफ लॉयल्टी बुस्टर 25% समान (पॉलिसी कालावधीच्या अखेरीस) राहते.
एखाद्याला जमेल त्याप्रमाणे मासिक/ अर्धवार्षिक किंवा वार्षिक याप्रमाणे प्रीमियम भरता येतात. खात्रीशीर परिपक्व पेआऊट मुलभूत हमी रकमेच्या 225% ते 325% राहील. ह्फ्त्यांचा भरणा आणि प्राप्त लाभ हे कलम 80 (सी) आणि कलम 10 (10 डी), कर लाभाअंतर्गत अशा लाभांच्या तरतुदींची पूर्तता करण्यावर अवलंबून असेल.
Comments
Post a Comment