एम्पावरजीतर्फे वरिष्ठ नागरिकांचे डिजीटली सबलीकरण करण्यासाठी अनोख्या मोबाईल अॅपचा शुभारंभ
एम्पावरजीतर्फे वरिष्ठ नागरिकांचे डिजीटली सबलीकरण
करण्यासाठी अनोख्या मोबाईल अॅपचा शुभारंभ
एम्पावरजी हे वरिष्ठ नागरिकांसाठीचे एकमेव असे बहुभाषी अॅप आहे, जे त्यांना तंत्रज्ञानाचा
वापर कसा करायचा ते शिकवते. हे अभिनव अॅप वरिष्ठ नागरिकांचा विचार करुन बनविण्यात आले आहे. त्यात ध्वनीचित्र माध्यमाचा उपयोग करण्यात आला असून
मोबाईल अॅप, साईट आणि इतर तंत्राचा सुलभ वापर करता येईल. सध्या या अॅपमधील
व्हीडियो इंग्रजी, हिंदी, मराठी आणि गुजराती भाषेत आहेत. हे अॅप आयओएस आणि
अँड्रॉईड उपभोक्त्यांकरिता उपलब्ध असेल. या अॅपमध्ये फ्रिमीयम सोबत पेड सर्विसचा
लवकरच शुभारंभ करण्यात येणार आहे. सध्या हे अॅप सर्वांसाठी मोफत स्वरुपात आहे.
या अॅपमध्ये विविध अभिनव वैशिष्ट्ये आहेत,
जसे की;
·
गुंतागुंत-मुक्त लॉगइन– या अॅप्लिकेशनमध्ये लॉग इन
करण्यासाठी ई-मेलची आवश्यकता नाही, ग्राहकाला फक्त त्याचा मोबाईल नंबर आणि इतर
माहिती देऊन लॉग इन करता येईल.
·
भाषा प्राधान्य
– 4 मुलभूत भाषांमधून निवड करून उपभोक्ता
त्याच्या स्वत:च्या वेगाने आरामात ज्ञान मिळवू शकतो.
·
व्हॉईस गायडन्स – ध्वनी पर्यायामुळे नवीन
ग्राहकाला मेन स्क्रीनचा वापर समजून घ्यायला मदत मिळते. भाषा प्राधान्य निवडीच्या
आधारे, ध्वनी साह्य हे इंग्रजी, हिंदी, मराठी किंवा गुजराती भाषेत उपलब्ध होऊ शकेल.
·
व्हीडिओ साह्य – एम्बेडेड व्हीडिओ ट्युटोरियल, जे एम्पावरजी अॅपच्या वापराची माहिती देईल, ज्यामुळे उपभोक्त्याला नेव्हिगेशनमध्ये मदत मिळेल.
·
सिल्व्हर डायरिज – एम्पावरजीच्या वतीने स्टोरीज ऑफ सिनियर्स या व्हीडिओ सिरीजची सुरुवात केली
आहे, त्यामध्ये वरिष्ठ नागरिकांना प्रेरीत करणाऱ्या यशोगाथा देण्यात आलेल्या आहेत.
या समुहात वेगवेगळ्या स्तरातील वरिष्ठांचे
जीवन, त्यांचे कथाकथन आणि अनुभव सादर करण्यात येतील. यामागचे उद्दिष्ट्य वरिष्ठ नागरिकांचा आवाज बनण्याचे व जगभर त्यांच्या कथांचा प्रसार करण्याचे आहे.
·
व्हीडिओ लर्निंग कंटेंट – एम्पावरजीने वरिष्ठ नागरिकांना तंत्रज्ञान समजायला सोपे होईल, अशा लर्निंग
व्हीडिओची प्रोपरायटरी लायब्ररी उभारली आहे.
·
कम्युनिटी – तंत्रज्ञान शिकण्याव्यतिरिक्त,
अॅपवापरकर्त्यांना कम्युनिटी समवेत लेखकांचे काम आणि छायाचित्रांचे आदानप्रदान
करायला प्रेरीत करते.
सर्व ट्युटोरियल व्हीडिओ एम्पावरजी टीमने विशेष बनवले असून ते अॅप्लिकेशनवर
उपलब्ध आहेत.
या शुभारंभावर बोलताना एम्पावरजीच्या संस्थापिका आणि सीईओ अपर्णा ठक्कर म्हणाल्या
की, “समाजावर मोठ्या प्रमाणावर प्रभाव टाकणारी निर्मिती करण्याचे माझे ध्येय होते.
मिनिस्ट्री फॉर स्टॅटेस्टीक्स अँड प्रोग्राम इम्प्लीमेंटेशनने प्रकाशित केलेल्या
2016 अहवालानुसार भारतात 60 वर्षांहून अधिक वय असलेले 103.9 दशलक्ष वरिष्ठ नागरिक
आहेत, त्यांची संख्या लोकसंख्येच्या 8.5% आहे. ही लोकसंख्या दरवर्षी 3.5 टक्क्यांनी
वाढत असते. जर आपण त्यात वयवर्ष 50 वरील लोकांचा समावेश केला, तर आकडा कैकपटीने
वाढेल. तंत्रज्ञान हे वेगाने बदलत असल्याने, आपण गोष्टी कशाप्रकारे आजमावतो,
त्यानुसार जीवन सुलभ बनत चालले आहे. मात्र 50 वर्ष वयापेक्षा अधिक वयाच्या
लोकांसाठी हा बदल तितका सोपा नाही. त्यांच्यासाठी हे बदल आव्हानात्मक ठरतात. मला
वय होत चाललेल्यांसाठी हे संक्रमण सुलभ करायची इच्छा होती. त्यामुळे मी असा एक मंच
तयार केला, जिथे वयस्कर माणसे अॅपच्या मदतीने कधीही, कुठेही तंत्रज्ञान आत्मसात
करायला शिकतील. एम्पावरजी अॅपच्या मदतीने वरिष्ठ नागरिक कोणाचाही आधार न घेता दैनंदिन
अॅप्लिकेशन्स/वेबसाईट्सचा वापर करायला शिकणार आहेत. हे अॅप वरिष्ठ
नागरिकांना लक्षात घेऊन तयार केलेले आहे, ज्यामध्ये 4 भाषा पर्याय देण्यात आलेले
आहेत. हे एक लर्निंग अॅप आहे. परंतु ते त्यापलीकडे बरेच काही करते. हा ब्रँड B2C मंचापलीकडे नेण्याचा आमचा अविरत प्रयत्न आहे.
जेणेकरून हा उद्योगक्षेत्रातील जनक बनून आमच्या ग्राहक समाधानाच्या प्राधान्याच्या
दिशेने कार्यरत राहील.
एम्पावरजीचे अभियान हे वयस्कर व्यक्तींना तंत्रज्ञान शिकवून त्यांचे सबलीकरण
करण्याचे आहे, म्हणूनच त्याचे नाव एम्पावरजी ठेवण्यात आले. एम्पावरजी’चे तज्ज्ञ
तंत्रज्ञान-आधारित शिबिरे घेतात, जिथे ते अॅप व साईट वापराचा डेमो देतात. त्यांनी
शुभारंभ केलेले एम्पावरजी अॅप हे अॅपल आणि अँड्रॉईड स्टोअर्सवर उपलब्ध आहे. लवकरच
या माध्यमातून वरिष्ठांसाठी सेवा सुरू करण्यात येतील. एम्पावरजीविषयी अधिक
माहितीसाठी www.empowerji.com ला भेट द्या.
एम्पावरजी विषयी:
एम्पावरजी अॅप हा आपल्या देशातील एक अभिनव
ब्रँड आहे, ज्याचे लक्ष्य वरिष्ठ नागरिकांना तंत्रज्ञानाचा वापर करायला
शिकविण्याचे आहे. त्यांनी हिंदी, मराठी, इंग्रजी आणि गुजराती भाषांमध्ये मुलभूत
शिक्षण देणारे बहुभाषी व्हीडिओ तयार केले आहेत. ज्याचा लाभ एम्पावरजी अॅपवरून घेता
येईल. 2018 मध्ये
स्थापना झालेली एम्पावरजी मुंबईत आहे. त्यांनी डिजीटल युगात वरिष्ठ नागरिकांना
तंत्रज्ञान व अॅप्लिकेशन वापराविषयी मार्गदर्शन देण्याकरिता जिमखाना, क्लब आणि
रेस्टॉरंटमध्ये सेमिनार घेण्यास सुरुवात केली आहे.
Comments
Post a Comment