स्टरलाइट पॉवरला ब्राझिलमध्ये प्रतिष्ठित ट्रान्समिशन प्रकल्प मिळाला
स्टरलाइट पॉवरला ब्राझिलमध्ये प्रतिष्ठित ट्रान्समिशन प्रकल्प मिळाला
कंपनीची ब्राझीलमधील ट्रान्समिशन क्षेत्रातील गुंतवणूक २ बिलियन युएसडीहुन अधिक गुंतवणूक
प्रकल्पामध्ये ६ सबस्टेशन्सचा समावेश : १.५४४ एमव्हीएम
ब्राझीलमधील ट्रान्समिशन प्रोजेक्टसाठी नुकत्याच झालेल्या लिलावानंतर स्टरलाइट पॉवरला १३ व्या लॉटसाठी विजेते म्हणून घोषित केले. या प्रोजेक्टसाठी देशाच्या दक्षिण भागातील रियो ग्रांड डू सुल याराज्यात ३-५ वर्षांच्या कालावधीत या प्रकल्पासाठी ०.६ बिलियन अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक अपेक्षित आहे. यामुळे स्टरलाइट पॉवरचा प्रोजेक्ट पोर्टफोलिओ १० इतका झाला आहे. ब्राझिल आणि क्षेत्रातीलकंपनीच्या गुंतवणूकीबद्दल बोलताना स्टरलाइट पॉवरचे ग्रुप सीईओ, प्रतीक अग्रवाल म्हणाले, "आम्हाला ब्राझिलियन विकासाचा एक भाग झाल्याचा अभिमान आणि सन्मान वाटत आहे. मानवतेचे सबलीकरणकरणाऱ्या खडतर अशा ट्रान्समिशन प्रकल्पांवर कार्य करण्याची प्रेरणा हि आमच्या ब्राझीलमधील प्रवासाची कोनशिला आहे. आम्ही या क्षेत्रासाठी वचनबद्ध आहोत आणि हा नवीन प्रकल्प आम्ही वेळेआधी पूर्णकरण्याचा आम्ही प्रयत्न करू."
Comments
Post a Comment