वक्रांगी लिमिटेड करणार १४ जानेवारी २०१९ रोजी संपूर्ण भारतात ३३०० हून अधिक नेक्स्टजेन वक्रांगी केंद्रांची सुरूवात
वक्रांगी लिमिटेड करणार १४ जानेवारी २०१९ रोजी
संपूर्ण भारतात ३३०० हून अधिक नेक्स्टजेन वक्रांगी केंद्रांची सुरूवात
वक्रांगी लिमिटेड तर्फे दिनांक १४ जानेवारी २०१९ रोजी त्यांच्या ३३०० हून अधिक नेक्स्टजेन वक्रांगी केंद्रांची सुरूवात संपूर्ण भारतात करण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेश(एमएमआर) आणि राष्ट्रीय राजधानी प्रदेश (एनसीआर) मध्ये यशस्वी सुरूवात केल्यानंतर कंपनी तर्फे आता ही आऊटलेट्स संपूर्ण भारतात सुरू करण्याची योजना आहे. या नेक्स्टजेन वक्रांगी केंद्रांमधून ग्राहकांना बॅंकिंग, विमा, एटीएम, असिस्टेड ई कॉमर्स, ई गव्हर्नन्स, आर्थिकसेवा आणि प्रवास यांसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.
ही नेक्स्टजेन आऊटलेट्स २० राज्यांतील ३५० हून अधिक जिल्हे आणि २ हजारांहून अधिक पोस्टल कोड्स मध्ये उपलब्ध असून त्यांतील ७० टक्के आऊटलेट्स ही टिअर ५ आणि टिअर ६ शहरांत आहेत. एकूणच या प्रायोगिक तत्वावरच्या या टप्प्यामध्ये कंपनी तर्फे ४ हजारांहून अधिक नेक्स्टजेन वक्रांगी केंद्र स्टोअर्स सुरू करण्याची योजना आखली आहे.
२०११ मध्ये सुरूवात झाल्या पासून वक्रांगी केंद्रांनी नॉन एक्सक्लूझिव्ह स्टोअर पासून ते सर्व सेवादेणाऱ्या नेक्स्टजेन वक्रांगी केंद्रांपर्यंतचा यशस्वी प्रवास केला आहे. ही नेक्स्टजेन आऊटलेट्स म्हणजे एकाच छताखाली डिजिटल कन्व्हिनियन्स स्टोअर मॉडेलच्या माध्यमातून विविध सेवा प्रदान करणारे केंद्र बनले आहे, या केंद्रांमधून बॅंकिंग,एटीएम, विमा, आर्थिक सेवा, ई कॉमर्स, ई गव्हर्नंन्स आणि प्रवास यांसारख्या सेवा दिल्या जातात. या नेक्स्टजेन केंद्रांमध्ये अधुनिक व एकसारखा फॉरमॅट असून यांत एकसारखी दृष्यमानता असल्याने ग्राहकांना एकसारखा अनुभव मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.
या विषयी माहिती देतांना एमडी आणि सीईओ श्री दिनेश नंदवाना यांनी सांगितले ‘‘ सध्याच्या वक्रांगी केंद्रांकडून नेक्स्टजेन मॉडेल मध्ये परावर्तित करण्याच्या करण्याच्या या प्रयोगाच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. आम्ही एमएमआर आणि एनसीआर विभागात यशस्वीपणे ही आऊटलेट्स सुरू केली असून संपूर्ण देशात ३३०० अशी स्टोअर्स सुरू करणार आहोत. आमच्या एकूणच प्रायोगिक टप्प्या मध्ये ४ हजारांहून अधिक नेक्स्टजेन आऊटलेट्स सुरू करण्याची आमची योजना आहे. ’’
ते पुढे म्हणाले ‘‘ आम्ही आमची अन्य स्टोअर्स अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेला आधीच सुरूवात केली असून वर्ष २०१९ मध्ये संपूर्ण स्टोअर्स ही अद्ययावत करणार आहोत. आम्ही सर्वांत विश्वसनीय असे फिजिकल आणि ऑनलाईन कन्विनियन्स स्टोअर्स भारतात वाढवत असून त्यामुळे वक्रांगी केंद्रांचे ब्रॅन्ड तत्वज्ञान ‘अब पुरी दुनिया पडोस में’ ला बळकटी मिळणार आहे.’’
नेक्स्टजेन मॉडेल मध्ये तंत्रनातील अधुनिकता निर्माण करण्यात येत असून आर्थिक व्यवहार सुलभ होण्यासाठी तसेच एटीएम्स साठी आवश्यक सुरक्षा उपकरणे,जसे सीसीटिव्ही कॅमेराजसाठी सेंट्रलाईज्ड मॉनिटरींग उपलब्ध असल्याने संपूर्ण भारतातील केंद्रांना सहाय्य करणे सोपे जाईल, तसेच डिजिटल सायनेज मुळे भागिदार ब्रॅन्ड्चा प्रसार होईलच पण त्याचबरोबर डिजिटल पिन अॅन्ड पॅड उपकरणामुळे सर्व प्रकारची पेमेंट्स करणे सोपे जाईल.
भारतातील रूटेल (रूरल- रिटेल) क्षेत्रात क्रांती करण्याच्या उद्देशाने वक्रांगी ने नेक्स्टजेन आऊटलेट्स सुरू केली असून या नेक्स्टजेन आऊटलेट्स मुळे संपूर्ण भारतात अनोख्या अशा ब्रॅन्डचा प्रसार होणार आहे .
वक्रांगी ने प्रथमच अॅसेट लाईट फ्रॅन्चाईजीवर आधारीत व्यवसायिक मॉडेल देशात सुरू केले असून या मॉडेल अंतर्गत नेक्स्टजेन वक्रांगी केंद्रांची संख्या ही २०१९ मध्ये ४५,००० वर नेण्यात येणार असून २०२० पर्यत ती संख्या वाढवून ७५,००० वर नेण्यात येणार आहे.
Comments
Post a Comment