मायक्रोसॉफ्टच्या वतीने भारतात नेक्स्ट जनरेशन सर्फेस प्रो 6 आणि सर्फेस लॅपटॉप 2 चा शुभारंभ
मायक्रोसॉफ्टच्या वतीने भारतात नेक्स्ट जनरेशन
सर्फेस प्रो 6 आणि सर्फेस लॅपटॉप 2 चा शुभारंभ
नवीन वर्ष, नवीन सर्फेस: नेक्स्ट जनरेशनसह तयार करा काहीतरी अधिक
मायक्रोसॉफ्टने आज सर्फेस प्रो 6 आणि सर्फेस लॅपटॉप 2 च्या शुभारंभाची घोषणा केली असून भारतात ई-कॉमर्स मंच (अमेझॉन आणि फ्लीपकार्ट) वर 28 जानेवारी 2019 पासून विक्रीस उपलब्ध होणार आहे. तर क्रोमा, रिलायन्स, विजय सेल्स आणि इतर विक्रेत्यांच्या निवडक रिटेल स्टोअरमध्ये उपलब्ध राहील. अधिकृत रिसेलरच्या माध्यमातून ही उपकरणे कमर्शियल/एंटरप्राईज ग्राहकांसाठी उपलब्ध असतील.
सर्फेस डिव्हाईसेसची नेक्स्ट जनरेशन अद्वितीय अनुभव तर देतीलच शिवाय व्यक्तींसाठी प्रगत उत्पादकताही प्रदान करतील. सर्फेस, विंडोज आणि ऑफिस शक्तिसह क्लाउडसोबतची कनेक्ट असेल, ज्यामुळे वापरकर्त्याला सर्फेस उपकरणे सर्जनशीलतेसाठी पहिली पसंत ठरणार आहे.
“सर्फेस अनुभव हा वापरकर्त्याला त्यांचे द्रष्टेपण आणि स्वप्न उभारायला मदत करते. सुंदर आणि स्टाईलिश हार्डवेअर हे वापरकर्त्याला सर्वोत्तम सर्जनशील पर्याय देणारे असून त्याचे देखणेपण लक्ष वेधून घेणारे ठरते. 2019मध्ये वापरकर्त्यांकरिता नवीन प्रगत तंत्र अवलंबत सर्फेस हा अभिनव कल्पना आणि जीवनाला विचार देणारा सुयोग्य साथीदार म्हणून पुढे येईल,” असे मत मायक्रोसॉफ्ट इंडियाचे कंट्री जनरल मॅनेजर – कन्झुमर अँड डिव्हाईसेस, प्रियदर्शी मोहपात्रा यांनी व्यक्त केले.
सर्फेस प्रो 6 : तुमचे उपकरण, तुमचा मार्ग
या उत्पादनाचा विशुद्ध बाह्य भाग दिसायला ओळखीचा असला, तरीही सर्फेस प्रो 6 आश्चर्यकारक शक्तीचा आविष्कार करणाऱ्या रिडिझाईन आर्किटेक्टने समृद्ध आहे. क्वाड-कोअर, 8 जनरेशन इंटेल®कोअर™ प्रोसेसर डिव्हाईसयुक्त साधन अष्टपैलूत्व, सुवाह्यता व शक्तीचे सादरीकरण करणारे आहे. आधीच्या उत्पादनांच्या तुलनेत हा 1.5 पट वेगवान असून सारखीच ऑल-डे बॅटरी लाईफ देऊ करते[1].
सर्फेस प्रो 6मध्ये 12.3” पिक्सेलसेन्सTM डिस्प्ले असून हा फोटो एडिटिंग सॉफ्टवेअरकरिता रेंडरिंग डिझाईन आहे किंवा तुमच्या आवडत्या स्ट्रिमिंग अॅप्सवर मालिका पाहण्याचा उत्सवी अनुभव देणारा आहे.
ज्यांनी कल्पना सत्यात उतरविण्यासाठी सर्फेसची निवड केली आहे, ते न्यू जनरेशनवर भरवसा ठेवून आपल्या कल्पनेला भरारी देत डिजिटल इंकिंग आणि सर्फेस पेन वैशिष्ट्याच्या साथीने नियमित Office 365 वर उपलब्ध आर्टीफिशीयल इंटेलिजन्स (एआय)चा वापर करू शकतात. विंडोज 10 वर उपलब्ध टाईम-सेवरसह पासवर्ड-फ्री विंडोज हॅलो साईन-इन आणि Windows Timeline (विंडोज टाईमलाईन),च्या जोडीने सर्फेस प्रो 6वर वापरकर्त्यांना बरेच काही करण्याची संधी मिळते.
काम करण्याच्या नाविन्यपूर्ण विश्वात ठिकाण कोणतेही असो, सर्फेस प्रो 6च्या साथीने युजर्सना स्वत:ची वर्कप्लेस तयार करता येईल. या उपकरणात 165 डिग्री किकस्टँड समाविष्ट आहे. सर्फेस प्रो 6चे वजन फक्त 770 ग्राम असेल. ज्यामुळे कुठेही या उपकरणाचा मनाजोगता वापर करणे शक्य होते. याशिवाय दिमाखदार सिग्नेचर टाईप कव्हर[2] आणि सर्फेस माऊस असल्याने सर्फेस प्रो 6 तत्काळ टॅबलेटवरून लॅपटॉप असे रूप पालटू शकतो.
सर्फेस लॅपटॉप 2: सर्वोत्तम संतुलन, सुयोग्य कार्य आणि जीवनाचा साथीदार
सर्वार्थाने नवा असा सर्फेस लॅपटॉप 2 आपल्या वापरकर्त्यांना अद्वितीय कामगिरी सादर करतोच, दिसायला स्टाईलिश तरीही पारंपरिक रूप आहे. अगदी पातळ आणि वजनाने हलके से हे उत्पादन आधुनिक 8 जनरेशन इंटेल®क्वाड कोअर™ प्रोसेसरसह सुधारित वेग आणि कामगिरी प्रस्तुत करतो. आधीच्या उत्पादनांच्या तुलनेत सर्फेस लॅपटॉप 2 हा 85 टक्के अधिक शक्तिशाली आहे.
14.5 तासांपर्यंतचे बॅटरी आयुष्य[3] लाभलेला सर्फेस लॅपटॉप 2 बारीक तपशिलांसह सर्वोत्तम डिझाईनने युक्त आहे, त्यात पिक्सेलसेन्स™ टच डिस्प्ले व उच्च दर्जाचा की-बोर्ड, ट्रॅकपॅड आहे. सर्फेस लॅपटॉप 2 एखाद्या वर्कहॉर्सपेक्षा आपले स्टाईल स्टेटमेंट राखून आहे.
आणि अत्यंत संवेदनशीलपणे सर्फेस लॅपटॉप 2, तुम्हाला नको असणारे आवाज बंद करून तुम्हाला हव्या असणा-या आवाजाची तीव्रता वाढवतो. जेव्हा उपयोगकर्ता झाकण बंद करतो किंवा अलकँटरा कीबोर्डवर टाईप करतो तेव्हा तो अगदीच नगण्य आवाज करतो. त्यात बसविलेले ऑम्नीसॉनिक स्पीकर्स हे दूरदर्शीपणे कीबोर्डच्या खालीच लपविण्यात आल्याने ते आवाजात जिवंतपणा आणतात.
सर्फेस : उद्योगधंद्यासाठी तयार
सर्फेस प्रो 6 आणि सर्फेस लॅपटॉप 2 चा वापर आपल्या संस्थांसाठी करू इच्छिणा-या व्यावसायिक ग्राहकांना विंडोज 10 प्रो पासून हव्या असणा-या उपक्रम-दर्जा व्यवस्थापन क्षमतेचा आणि सुरक्षा फायद्यांचा लाभ मिळू शकेल.
या व्यतिरिक्त, विंडोज 10 ऑक्टोबर 2018 अपडेट्सचा भाग असणा-या नव्या साधनांमुळे आणि नाविन्यांमुळे उपयोगकर्त्यांना त्यांच्या कामच्या ठिकाणी, घरी, आणि इतरत्र कुठेही वेळेचा योग्य वापर करून उत्पादनक्षमता, सहकार्य आणि संपर्क यामधील तफावत दूर करता येईल.
किंमत
नव्या किंमती जानेवारी 28, 2019 पासून लागू होतील.
मॉडेल
|
मॉडेल प्रकार
|
किमत (भारतीय मूल्य)
|
उपलब्ध ठिकाण
| |||
सर्फेस प्रो 6 ची रूप-रेषा
| ||||||
LGP-00015
|
Srfc Pro6 i5/8/128
|
83,999
|
ऑनलाईन आणि ऑफलाईन
| |||
KJT-00015
|
Srfc Pro6 i5/8/256
|
110,999
|
ऑनलाईन आणि ऑफलाईन
| |||
KJV-00015
|
Srfc Pro6 i7/16/512
|
176,999
|
केवळ ऑफलाईन
| |||
KJU-00015
|
Srfc Pro6 i7/8/256
|
139,999
|
ऑनलाईन आणि ऑफलाईन
| |||
सर्फेस लॅपटॉप 2 रूपरेषा
| ||||||
LQL-00023
|
Srfc Laptop2 i5/8/128
|
91,999
|
ऑनलाईन आणि ऑफलाईन
| |||
LQN-00023
|
Srfc Laptop2 i5/8/256
|
119,000
|
ऑनलाईन आणि ऑफलाईन
| |||
LQS-00023
|
Srfc Laptop2 i7/16/512
|
203,999
|
ऑनलाईन आणि ऑफलाईन
| |||
LQQ-00023
|
Srfc Laptop2 i7/8/256
|
148,999
|
केवळ ऑफलाईन
| |||
मायक्रोसॉफ्ट इंडियाविषयी
मायक्रोसॉफ्ट(Nasdaq “MSFT” @microsoft) बुद्धिमान क्लाउड आणि बुद्धिमान एज युगासाठी डिजिटल क्रांती घडवून आणते. या ग्रहावरील प्रत्येक व्यक्तीला आणि प्रत्येक संस्थेला जास्त यश मिळविण्यासाठी सशक्त करणे हे यांचे उद्दिष्ट आहे. भारतात 1990 साली मायक्रोसॉफ्टची सुरुवात झाली. आज भारतात मायक्रोसॉफ्टचे 9,000 कर्मचारी विक्री आणि विपणन,संशोधन आणि विकास तसेच ग्राहक सेवा आणि मदत या क्षेत्रात कार्यरत असून अहमदाबाद, बंगळूरू, चेन्नई, नवी दिल्ली, गुरूग्राम,नॉयडा, हैदराबाद, कोच्ची, कोलकाता, मुंबई आणि पुणे अशा भारतातील 11 शहरांमध्ये त्यांची सेवा देऊ करत आहेत. भारतीय स्टार्ट-अप्स, व्यापार आणि सरकारी एजन्सीजसाठी डिजिटल क्रांतीला गती देण्यासाठी मायक्रोसॉफ्ट त्यांची जागतिक स्तरावरील क्लाउड सेवा ही स्थानिक डेटा केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध करून देत आहेत. 2016 साली मायक्रोसॉफ्टने सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रांच्या सुरक्षा गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या आठ केंद्रापैंकी एक सायबर सुरक्षा प्रतिबद्धता केंद्र देशात सुरू केले आहे.
Comments
Post a Comment