मनपसंदची पेट प्लास्टिक बॉटल्स रिसायकल करण्यासाठी जीइएम एन्व्हायरोसोबत भागीदारी
मनपसंदची पेट प्लास्टिक बॉटल्स रिसायकल करण्यासाठी
जीइएम एन्व्हायरोसोबत भागीदारी
मनपसंद बेवरेजेस लिमिटेडने भारतातील एक सर्वाधिक मोठी पेट रिसायकलिंग कंपनी असणाऱ्या जीइएम एन्व्हायरो मॅनेजमेंटशी भागीदारी केली आहे. या भागीदारीतून सरकारच्या प्लास्टिक निर्मूलन व्यवस्थापनांतर्गत ईपीआर (एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्बिलीटी) उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवला जाणार आहे. या भागीदारींतर्गत जीइएम एन्व्हायरोकडून मनपसंद बेवरेजेसला महाराष्ट्रात पेट बॉटल्सचे रिसायकलिंग करण्याबाबत आवश्यक ते इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यास मदत केली जाईल.
याबाबत अधिक माहिती देताना मनपसंद बेवरेजेस लिमिटेडचे संचालक अभिषेक सिंह यांनी सांगितले की, आम्ही नेहमीच आमच्या ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कटिबद्ध असतो. ते प्राधान्य आमच्या मार्गदर्शक तत्वांमध्येच समाविष्ट करण्यात आले आहे. ग्राहक तसेच समाजातील मोठ्या घटकास उपयुक्त ठरतील अशा उपक्रमांमध्ये मनपसंदचा नेहमीच सक्रीय सहभाग असतो. त्यामुळेच आम्ही सरकारच्या प्लास्टिक निर्मूलन व्यवस्थापन या संकल्पनेच्या शास्वत अंमलबजावणीसाठी कटिबद्ध आहोत आणि पेट रिसायकलिंग उपक्रमाच्या माध्यमातून एक आरोग्यदायी वातावरण निर्मिती करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत.
पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात या उपक्रमास भरपूर यश मिळाल्यामुळे मनपसंत आगामी काही वर्षात हा कार्यक्रम देशभरात राबवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आपली कंपनी वैकल्पिक शाश्वत पॅकेजिंग सोल्युशन्स विभागात कशाप्रकारे काम करत आहे याबाबतही सिंग यांनी यावेळी माहिती दिली. त्यांनी पुढे सांगितले की आम्ही खूप कमी कचरा तयार करतो आणि तोही रिसायकलेबल, पुन्हा वापरण्यासारखा तसेच नूतनीकरण करण्यासारखा असतो.
मनपसंद बेवरेजेस लिमिटेड सोबत झालेल्या भागीदारीबद्दल आनंद व्यक्त करताना जीइएम एन्व्हायरो मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक सचिन शर्मा यांनी सांगितले की, जीइएम एन्व्हायरो मॅनेजमेंट कंपनी मनपसंद बेवरेजेसला महाराष्ट्र सरकारच्या सूचना आणि पीडब्ल्यूएम 2016 नुसार त्यांचे एपीआर निकष पूर्ण करण्यास मदत करेल. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आम्ही पुरेसे इन्फ्रास्ट्रक्चर उभे करणार आहोत. यामध्ये संकलन केंद्रे,आरव्हीएम यांचा समावेश आहे. हे इन्फ्रास्ट्रक्चर पुढील चार ते सहा महिन्यात राज्यभरात उभारण्यात येणार आहे. आम्हाला विश्वास वाटतो की 8-12 महिन्यात मनपसंद बेवरेजेस ही महाराष्ट्रातील पेट न्यूट्रल कंपनी म्हणून ओळखली जाईल.
Comments
Post a Comment