वाराची वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या सेंटर फॉर इंडस्ट्रिअल रिव्होल्यूशनच्या सदस्यत्व करारावर स्वाक्षरी
वाराची वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या सेंटर फॉर
इंडस्ट्रिअल रिव्होल्यूशनच्या सदस्यत्व करारावर स्वाक्षरी
वारा टेक्नॉलॉजी या कनोरिया फाउंडेशनचा भाग असलेल्या कंपनीने आज वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या सेंटर फॉर इंडस्ट्रिअल रिव्होल्यूशनच्या सदस्यत्व करारावर स्वाक्षरीकेल्याची घोषणा केली. यामुळे कंपनीला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने आयोजित केलेल्या ब्लॉकचेन, आयओटी, कृत्रिम बुद्धिमत्ता, यंत्र प्रशिक्षण आणि ड्रोन्स याविषयीच्याविविध गतिविधींमध्ये भाग घेता येईल.
C4IR हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम अंतर्गत सार्वजनिक वस्तू आणि सेवांच्या वितरणास तंत्रज्ञानाचे लाभ मिळावेत म्हणून तयार केलेले पॉलिसी इनिशिएटिव्ह आहे. याकेंद्रामध्ये २० हुन अधिक सरकारी भागीदार आहेत. कॅनडा, न्यूझीलँड आणि युनायटेड किंगडम हे २०१९ मध्ये झालेले नवीन सदस्य आहेत. या सदस्यत्व करारामुळे वारावर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या भारतातील तसेच यूएसए, जपान आणि चीन या देशांमध्ये होणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये भाग घेऊ शकेल. तसेच या केंद्रांनाही वाराच्या तांत्रिककौशल्याचा लाभ मिळेल, कंपनीला वास्तविक जगाच्या समस्यांना तोंड देण्याची संधीही मिळेल. यावर्षी कोलंबियामध्ये केल्या जाणाऱ्या ब्लॉकचेन चाचणीविषयीची गुप्तताआणि पारदर्शकता यांचा समतोल राखेल असे ओळख व्यवस्थापन व्यासपीठ तयार करणे हे केंद्राचे सध्याचे कार्य आहे. भारताशी संबंधित परिशुध्दता शेतीविषयीचा प्रकल्पहा जागतिक पातळीवर नेला जाईल. जागतिक अन्न कार्यक्रमाच्या माध्यमातून कार्यक्षम वितरण शृंखला निर्माण करून अन्न संकटाची समस्या सोडविणे हा ब्लॉकचेनउपक्रमाचा मुख्य हेतू आहे.
Comments
Post a Comment