रूस्तमजीकडून प्रभादेवीमध्ये रूस्तमजी क्राऊन या आलीशान प्रकल्पाचे उद्घाटन
रूस्तमजीकडून प्रभादेवीमध्ये रूस्तमजी क्राऊन या आलीशान
प्रकल्पाचे उद्घाटन
· विचारपूर्वक डिझाइन केलेल्या जागांमध्ये आलीशान ३, ४ आणि ५ बेडरूम निवासस्थाने
· ५.७५ एकरांमध्ये पसरलेल्या प्रकल्पाची संकल्पना ख्यातनाम आर्किटेक्ट हाफीज काँट्रॅक्टर यांची असून त्याची रचना बँकॉकच्या आघाडीच्या इंटिरियर डिझाइन कंपनी पीआयएने केली आहे
· या प्रकल्पात २.५२ एकर ओपन टू स्काय पोडियमची हमी
· रूस्तमजी क्राऊनसाठी अपेक्षित असलेला महसूल सुमारे ५८०० कोटी रूपये
· महारेरा नोंदणी क्रमांक: फेज 1 - टॉवर ए आणि बी - P51900003268, फेज 2 - टॉवर सी - P51900006367संदर्भ लिंक: https://maharera.mahaonline. gov.in/
आघाडीचे रिअल इस्टेट डेव्हलपर असलेल्या रूस्तमजीने आज आपल्या प्रभादेवी, मुंबई येथील रूस्तमजी क्राऊन या आलीशान प्रकल्पाच्या अनावरणाची घोषणा केली. सुमारे ५.७५ एकरांमध्ये पसरलेल्या या वास्तुरचनेतील महान प्रकल्पात थॉटफुली बिल्ट ३, ४ आणि ५ बेडरूम निवासस्थाने असून त्यात १३३५ - २५२८ चौ. फुटांची घरे (चटई क्षेत्र) अरबी समुद्राच्या दिशेला आहेत. रूस्तमजी क्राऊन हे अभिजन वर्गासाठी एक सुयोग्य स्थान आहे, ज्यांना सामान्य जागांपेक्षा वेगळे काहीतरी हवे असते. या खास ठिकाणी आवश्यक ती प्रत्येक ऐषारामी गोष्ट आहे, जी एका उत्तम नियोजित आंतरराष्ट्रीय पातळीवर डिझाइन केलेल्या घरात राहू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी उपलब्ध आहे.
रूस्तमजी क्राऊनची संकल्पना ख्यातनाम आर्किटेक्ट हाफीज काँट्रॅक्टर यांनी केली असून त्याचे डिझाइन बँकॉकचे आघाडीचे इंटिरियर डिझाइन कंपनी पीआयए इंटिरियर्स यांनी केले आहे. एचडीएफसी लिमिटेड ही या प्रकल्पासाठी फंडिंग पार्टनर आहे. लार्सन अँड टुब्रो हे बांधकाम भागीदार आहेत आणि ते तंत्रज्ञान व अभियांत्रिकी ज्ञान यांच्यामधील सर्वोत्तम आपल्यासाठी आणतील. रूस्तमजी क्राऊनचे आगळेवेगळे डिझाइन आणि स्थानाचा फायदा लक्षात घेऊन तिला समारे ५,८०० कोटी रूपयांचा महसूल मिळेल असे अपेक्षित आहे. या प्रकल्पाची रचना समकालीन पद्धतीने केली असून तिला अपस्केल ट्रॉपिकल फॉरेस्ट थीम असलेल्या रिसॉर्टचे रूप आहे. रूस्तमजी ग्रुपने लँडस्केप कोलॅबोरेशन (एलसीओ) थायलंड यांच्यासोबत रूस्तमजी क्राऊनसाठी कलात्मक लँडस्केप तयार करण्यासाठी भागीदारी केली आहे. या प्रकल्पाच्या एका महत्त्वाच्या वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे भारतातील पहिल्यावहिल्या प्रकारचे हँगिंग ट्रीज आहेत.
प्रभादेवी येथे स्थित असलेल्या रूस्तमजी क्राऊनमुळे दक्षिण मुंबई आणि बीकेसी यांच्या वाणिज्यिक केंद्रांपर्यंत सीलिंकद्वारे पोहोचण्याची सोय होते. सामाजिक साधनसुविधा विकास जसे सिद्धीविनायक मंदिर, वरळी सीफेस, महालक्ष्मी रेसकोर्स, पॅलेडियम आणि हाय स्ट्रीट फिनिक्स हे प्रकल्पापासून अत्यंत जवळच्या ठिकाणी आहेत. रूस्तमजी क्राऊनमध्ये ३ टॉवर्स आहेत. त्यातून आपल्याला चांगले राहणीमान मिळते. जागतिक दर्जाच्या सुविधा देऊन ऐषारामी जगण्याची संकल्पना त्यातून आकाराला येते. ए आणि बी हे टॉवर्स ६८ मजली असून जमिनीपासून सिलिंगचे अंतर ११ फूट ९ इंच आहे, तर टॉवर सी हा ६५ मजली आहे आणि येथील जमिनीपासून सीलिंगपर्यंतचे अंतर १० फूट ६ इंच आहे. येथील घरांची रचना अशा पद्धतीने करण्यात आली आहे की, त्यामुळे क्रॉस व्हेंटिलेशन आणि नैसर्गिक प्रकाश खूप चांगल्या प्रकारे घरात येतो. हा प्रकल्प समकालीन पद्धतीने डिझाइन करण्यात आला आहे. त्यामुळे खूप सुंदर अनुभव आपल्याला मिळतो. यातील २.५२ एकर ओपन टू स्काय सुंदर ट्रॉपिकल पोडियम लँडस्केपमुळे या प्रकल्पाला एक थीम रिसॉर्टचा फील येतो. येथील लँडस्केप केलेले पोडियम आजुबाजूच्या शहराच्या गर्दीत आपल्याला सुंदर दृश्ये पाहण्याचा आनंद मिळतो. रूस्तमजी क्राऊनमध्ये बहुमजली पोडियमवर ६० पेक्षा अधिक लाइफस्टाइल सुविधा आहेत आणि त्यात पूल एम्पिथिएटर, ट्रॉपिकल पूल, क्लाऊड वॉक, व्ह्यूइंग डेक, जिम्नॅशियम, सिनेमा, व्हिजिटर सूट्स, किड्स प्ले एरिया, इंग्लिश कोर्ट,ऑल-वेदर पूल यांचा समावेश आहे.
या अनावरणाबाबत बोलताना श्री. बोमन आर. इराणी, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, रूस्तमजी ग्रुप म्हणाले की, ''रूस्तमजीमध्ये आम्ही अशा प्रकारची घरे विकसित करण्याचा प्रयत्न करतो, जिथे कुटुंबे मोठी होतात आणि नवीन लोकांशी मैत्री होते. आम्ही गेटेड कम्युनिटीची संकल्पना अत्यंत आगळ्यावेगळ्या पातळीवर नेली आहे, जिथे सुविधा शरीर, मन आणि आत्म्यासाठी तयार केल्या जातात. रूस्तमजी क्राऊन हा एक खऱ्या अर्थाने सुंदर प्रकल्प आहे आणि तो त्याच्या नावाला जागतो. त्यात फक्त विचारपूर्वक तयार केलेल्या जागांची संकल्पना नाही तर तो रहिवाशांना शहराच्या केंद्रस्थानी राहून आपण त्यापेक्षा वेगळे आहोत अशी भावना देणारा आहे. क्राऊन हा शहरी जंगलातील अभयारण्यासारखा आहे आणि आधुनिक जीवनातील आलीशान राहणीमान व शाही जीवनमान हे यातून मिळते.''
या निमित्ताने बोलताना आर्किटेक्ट हाफीज काँट्रॅक्टर म्हणाले की, ''आम्हाला रूस्तमजीसोबत भागीदारी करताना खूप आनंद होत असून हा समूह आपल्या ऐषारामी महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी ओळखला जातो. रूस्तमजी क्राऊनच्या माध्यमातून आम्ही फंक्शनल स्पेसेसची संकल्पना पुढे आणत आहोत. आपली जुनी आवड किंवा छंद पुन्हा जोपासण्यासाठी ग्राहकांना दिलेली ही संधी आहे.''
या भागीदारीबाबत बोलताना एचडीएफसी लिमिटेडचे अध्यक्ष श्री. दीपक पारेख म्हणाले की, '' (मला दक्षिण मुंबईतील गेटेड मालमत्ता असलेल्या रूस्तमजी क्राऊनच्या अनावरणाचा भाग होताना खूप आनंद होत आहे. एचडीएफसी लिमिटेड हा रूस्तमजी क्राऊनसाठी धोरणात्मक वित्तपुरवठा भागीदार आहे आणि आम्हाला विश्वास आहे की, हा प्रकल्प शहराच्या या भागात घरे आणि लिव्हिंग स्पेसेसची संकल्पना ज्या पद्धतीने केली जाते त्याची नवीन व्याख्या बनवेल. रूस्तमजी आपले वापरकर्ते आणि त्याचे कुटुंब यांचा विचार करून घरे देण्याबाबत खूप प्रसिद्ध आहे. मला खात्री आहे की, क्राऊन हा त्यांच्या सर्वोत्तम प्रकल्पांपैकी एक ठरेल. आमचे संबंध अधिक मजबूत करत असताना मी रूस्तमजी टीमला खूप शुभेच्छा देतो.''
रूस्तमजी बाबत:
रूस्तमजीने सातत्याने विकसित होणाऱ्या रिअल इस्टेट क्षेत्रात स्वतःसाठी एक स्थान निर्माण केले असून त्यांच्याकडे १२.५ दशलक्ष चौ. फुटांचे पूर्ण केलेले प्रकल्प, १५ दशलक्ष चौ. फूट सुरू असलेले प्रकल्प आणि ३० दशलक्ष चौ. फूट नियोजित विकास प्रकल्प सुरू आहेत, जे मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर)च्या सर्वोत्तम क्षेत्रात आहेत. त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये सध्या दोन खूप मोठ्या टाऊनशिप आहेत, निवासी जागा, कार्यालयीन संकुल, रिटेल विकास, आरोग्यसेवा आणि शिक्षण इत्यादी सुविधा बीकेसी एनेक्स, ऑफ जुहू सर्कल, कांदिवली, बोरिवली, विरार आणि ठाणे येथे सुरू आहेत. रूस्तमजीने कायमच आपल्या घरग्राहकांच्या आयुष्यात आपला व्यवसाय, सीएसआर उपक्रम आणि परोपकार यांच्या माध्यमातून मूल्यवर्धन करण्यावर भर दिला आहे. त्यांनी प्रत्येक ब्लूप्रिंटमध्ये बालस्नेही बागा, मैदाने आणि लर्निंग रूम्स हे सर्व असेल याची काळजी घेतली आहे. ते कुटुंबांना एकमेकांसोबत चांगला वेळ घालवण्यासाठी प्रेरित करतात.
Comments
Post a Comment