शिवालिक वेंचरद्वारे ‘बांद्रा नॉर्थ – गुलमोहर अॅव्हेन्यू’च्या तिसऱ्या टप्प्याचा शुभारंभ

शिवालिक वेंचरद्वारे ‘बांद्रा नॉर्थ – गुलमोहर अॅव्हेन्यू’च्या तिसऱ्या टप्प्याचा शुभारंभ
प्रकल्पाद्वारे किफायतशीर, मध्यम-उत्पन्न आणि आलिशान गृहनिर्माण पर्याय
 शिवालिकहा शहरातील अग्रगण्य रियल इस्टेट खेळाडू असून त्यांचा वांद्रे पूर्व येथील ‘बांद्रा नॉर्थ – गुलमोहर अॅव्हेन्यू’च्या तिसऱ्या टप्प्याचा शुभारंभ झाला आहे. ‘बांद्रा नॉर्थ – गुलमोहर अॅव्हेन्यू’ मध्यम-उत्पन्न गटाकरिता किफायतशीर घरेसर्वोत्तम गृह पर्याय उपलब्ध करून देतो. 

गुलमोहर अॅव्हेन्यू शहराच्या मध्यवर्ती भागात रहिवाशांना आनंदी अनुभव देत आहे. मुख्य आणि प्रतिष्ठीत समजल्या जाणाऱ्या भागातमुख्य रस्तेमहामार्ग,महाविद्यालये आणि रुग्णालयांची सोय आहे. ‘बांद्रा नॉर्थ - गुलमोहर अॅव्हेन्यू’ हा पश्चिम द्रुतगती महामार्गानजीक वसलेला आहेज्यामुळे वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी)वांद्रे-वरळी सी लिंक आणि मुंबई विमानतळाला चांगली कनेक्टीव्हिटी मिळते. 

बांद्रा नॉर्थ - गुलमोहर अॅव्हेन्यू’च्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यानंतर आता शेवटच्या टप्प्याचा शुभारंभ फेब्रुवारी 2019 महिन्यात करण्यात आला. या प्रकल्पात विविध शहरी सोयी-सुविधांचा समावेश असून त्यात आकर्षक एन्ट्रन्स लॉबीजिमनॅशियमलहान मुलांकरिता प्ले एरियाइंटरकॉम सुविधा, स्वयंचलित एलिव्हेटरने सुसज्जित असणार आहे. शिवालिक वेंचर्स प्रवर्तकांनी हाय राईज लक्झ्युरी अपार्टमेंट, विलाजकिफातशीर घरेव्यापारी मालमत्ता ते गृहनिर्माण प्रकल्प अशा विविध वर्गवारीत 32 हून अधिक प्रकल्प डिझाईन करून बांधले आहेत.

शुभारंभाप्रसंगी बोलताना शिवालिक वेंचर्सचे सीईओ श्री. रमाकांत जाधव म्हणाले की, “बांद्रा नॉर्थ - गुलमोहर अॅव्हेन्यू’च्या तिसऱ्या टप्प्याचा शुभारंभ करताना आम्हाला आनंद वाटतो आहेही आमच्याकरिता सन्मानाची बाब आहे. याच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याची विक्रमी वेळेत यशस्वी विक्री झाली असून आम्हाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. तिसऱ्या टप्प्यात देखील असाच सकारात्मक प्रतिसाद मिळेल म्हणून आम्ही आशादायी आहोत. पश्चिम उपनगराचा हा प्रतिष्ठीत प्रकल्प असून त्याच्या रहिवाशांना सुलभ कनेक्टीव्हिटीसह मुलभूत सुविधा उपलब्ध करून देतो.”

या प्रकल्पात रु. 82 लाखाच्या आकर्षक किंमतीत 1 बीएचके तर रु. 1.57 कोटीच्या मूळ किंमतीत 2 बीएचके फ्लॅट्स उपलब्ध आहेत. याशिवायगुलमोहर अॅव्हेन्यूमध्ये आधुनिक अग्निशमन साहित्य म्हणून स्प्रिंकलर्समुलांसाठी प्ले एरियासोसायटी ऑफिसविविध प्रसंगी वापरण्याजोगा हॉलस्वयंचलित पॅसेंजर एलिव्हेटरआपतकालीन सेवांकरिता बॅकअप जनरेटर इलेक्ट्रीकल सप्लायचा समावेश राहील. 

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24