ग्लोबल मोबाइल इंडस्ट्री मध्ये चांगले योगदान दिल्याबद्दल जीएसएमए (GSMA) बोर्डाने सुनील भारती मित्तल यांना सन्मानित केले
ग्लोबल मोबाइल इंडस्ट्री मध्ये चांगले योगदान दिल्याबद्दल जीएसएमए (GSMA) बोर्डाने
सुनील भारती मित्तल यांना सन्मानित केले
जागतिक मोबाइल उद्योगातील योगदानासाठी जीएसएमएने (GSMA) भारती एंटरप्रायझेसचे संस्थापक आणि अध्यक्ष सुनील भारती मित्तल यांना सन्मानित केले.
श्री मित्तल हे जीएसएमए अध्यक्ष म्हणून गेली २ वर्ष (2017 -18) काम पाहत होते व त्यांच्या महत्वपूर्ण आणि यशस्वी योगदानाबद्दल जीएसएमए बोर्डाने त्यांनासन्मानित केले.
सन 2017 मध्ये प्रतिष्ठित जागतिक दूरसंचार उद्योग मंडळाचे अध्यक्ष सुनील भारती मित्तल हे पहिले भारतीय ठरले. सुनील भारती मित्तल यांनी 2005 ते2008 हया कालावधीत जीएसएमए बोर्डचे सदस्य म्हणूनही काम केले होते.
सुनील भारती मित्तल म्हणाले, "आमच्या उद्योगासाठी जीएसएमए महत्त्वपूर्ण आहे आणि सर्वात मोठ्या मोबाइल उद्योग संस्थेचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे संचालन करणे आणि जीएसएमएच्या व्यापक डिजिटल पारिस्थितिक तंत्रज्ञानावरील वाढत्या परिणामात योगदान देण्यासाठी रचनात्मक भूमिका बजावणे ही एक उत्तम संधी होती.
मी सर्व जीएसएमए सदस्यांना त्यांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद देतो आणि स्टिफन रिचर्ड आणि चुआ सॉक कोऑंग यांना उद्योगाच्या विकासाचा अजेंडा अधिक सशक्त करण्यासाठी शुभेच्छा देतो.”
सुनील भारती मित्तल अनेक आंतरराष्ट्रीय संस्था आणि विचार-तंत्रांवर कार्य करत आहेत. अध्यक्ष म्हणून काम केल्यानंतर दोन वर्षांनी ते आता आंतरराष्ट्रीय चेंबर ऑफ कॉमर्स (आयसीसी) चे मानद अध्यक्ष आहेत. ते इंटरनॅशनल बिझिनेस कौन्सिल - डब्ल्यूईएफ, टेलीकॉम बोर्ड ऑफ इंटरनॅशनल टेलीकम्युनिकेशन युनियन (आयटीयू) चे सदस्य, आणि ब्रॉडबँड कमिशनचे कमिश्नर आहेत. परराष्ट्र संबंध परिषद (सीएफआर), कार्नेगी एन्डोमेंट फॉर इंटरनॅशनल पीस आणि कतार फाऊंडेशन एन्डॉवमेंट बोर्डवर विश्वस्त मंडळाचे सल्लागार आहेत. 2007-08 मध्ये त्यांनी भारतीय उद्योग संघटनेचे (सीआयआय) अध्यक्ष म्हणून काम केलेहोते.
Comments
Post a Comment