AECOM आणि एशिया सोसायटीकडून इमॅजिन 2060 च्या तिसर्या वर्षाचा प्रारंभ डिलिवरींग टुमारोज सिटीज टुगेदर
AECOM आणि एशिया सोसायटीकडून इमॅजिन 2060 च्या
तिसर्या वर्षाचा प्रारंभ डिलिवरींग टुमारोज सिटीज टुगेदर
इमॅजिन 2060: डिलिवरींल टुमारोज सिटीज टुगेदरची सुरुवात झाल्यानंतर 1 हजारहून अधिक प्रमुख लोकांना जागतिक पातळीवरील प्रमुख शहरांमध्ये राहणार्या लोकांपुढे आपले विचार व्यक्त करण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. या शहरांत दिल्ली, हाँगकाँग, लॉस एंजल्स, मनिला, मेलबोर्न, न्यूयॉर्क, सिंगापूर आणि सिडनी यांचा समावेश आहे.
AECOM ने त्यांचा दुसरा फ्युचर ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर हा जागतिक पातळीवरील अहवालही सादर केला आहे. या अहवालातून त्यांनी मुंबईतील 1 हजारहून अधिक लोकांकडून शहरातील इन्फ्रास्ट्रक्चर तसेच भविष्यातील विकासकामांबाबत मते जाणून घेतली.
या अहवालातील प्रमुख वैशिष्ट्ये :
रियाधनंतर (66 टक्के)मुंबईतील 51 टक्के लोकांना असे वाटते की मोठे इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यासाठी सरकारकडून योग्य निर्णय घेतले जातात.
सुमारे 47 टक्के लोकांना असे वाटते की वाहतुकीच्या संबंधीत प्रचंड मोठे प्रकल्प नियोजित कालावधीत पूर्ण होतात. याचवेळी 69 टक्के लोक सांगतात की शहर प्रशासन इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅनिंगबाबत अल्पकालीन दृष्टीकोनच बाळगते.
मुंबईतील सुमारे 82 टक्के लोकांना असे वाटते की इन्फ्रास्ट्रक्चरच्या विकासात खाजगी क्षेत्राचा अधिकाधिक समावेश असला पाहिजे.
Engagemen चॅनेल्सबाबत विचारले असता अनेक मुंबईकर नागरिकांनी मान्य केले की, शहर नियोजनाच्या अधिकार्यांशी संपर्क साधण्यासाठी सोशल मिडियाचा चांगला उपयोग होतो असे 60 टक्के नागरिकांनी आणि मोबाईल चॅनेल्सचा अधिक उपयोग होतो असे 61 टक्के नागरिकांनी सांगितले. रियाधमध्ये हेच प्रमाण अनुक्रमे 57 आणि 59 टक्के इतके होते.
अर्ध्याहून अधिक म्हणजे सर्व 10 शहरांमध्ये सर्वाधिक अशा 57 टक्के मुंबईतकर नागरिकांनी सांगितले की, सार्वजनिक इन्फ्रास्ट्रक्चर समस्यांबाबत नागरिकांचा अभिप्राय नोंदवण्याबाबत शहरातील अधिकारी सबमिशन प्रक्रियेबाबत स्पष्ट माहिती देत होते.
सुमारे 70 टक्के नागरिकांनी असेही मत व्यक्त केले की, शहरातील लोकप्रतिनिधी बदलल्यावर इन्फ्रास्ट्रक्चर धोरणांमध्येही मुलभूत बदल घडून येतात. हे प्रमाण सर्व 10 शहरांपैकी सर्वाधिक आहे. सिडनेत 54 टक्के, टोरांटो 54 टक्के तर रियाधमधील 51 टक्के नागरिकांना तसे वाटते.
या इव्हेंटप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना हिरानंदानी ग्रुपचे सहसंस्थापक आणि कार्यकारी संचालक निरंजन हिरानंदानी यांनी सांगितले की, “यावेळी अनेक मुद्द्यांची चर्चा होणे अपेक्षीत आहे. आज एकॉम आणि एशिया सोसायटी इंडिया सेंटरच्या माध्यमातून आम्ही फक्त या विषयांना हात लावला आहे. मुंबईतील इन्फ्रास्ट्रक्चरच्या समस्या लवकरात लवकर सुटतील अशी आम्हाला अपेक्षा वाटते. रियल इस्टेट रेग्युलेटरी बिल आणि जीएसटीच्या अंमलबजावणीमुळे खाजगी-सार्वजनिक हाउंसिग क्षेत्राच्या विकासात काही अडथळे आले आहेत. या धोरणामध्ये अनेक वेळा राजकारणाचा अडसर येत असल्यामुळे झोपडपट्टी निर्मुलन आणि पुनर्वसनाची कामेही खोळंबून राहत आहेत. आज संपूर्ण जगाचे भविष्य भारत आणि चीनमधील घडामोडींवर अवलंबून राहू लागले आहे. ले लक्षात घेउन आपल्या नेतृत्वाने धोरणांची अंमलबजावणी केली पाहिजे. परंतु याचा वेग किती असणार हा सर्वात प्रमुख प्रश्न आहे.”
एशिया सोसायटी इंडिया सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी बंटी चंद यांनी सांगितले की, “एशिया सोसायटी आणि एकॉम यांनी संयुक्त भागिदारीतून तयार केलेल्या एका जागतिक पातळीवरील फोरममधून भारतातील शहरे अधिकाधिक राहण्यायोग्य बनवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. यासाठी शाश्वत धोरण, अचूक नियोजन आणि भागिदारांशी सहयोग केला जात आहे. आम्ही उद्योग, शासन आणि कुशल तंत्ऱज्ञांना एकत्र आणून संवाद वाढवणे, नवीन कल्पना आणि पर्याय यांच्या माध्यमातून बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहोत. मुंबईला अधिक लवचिक बनवून आमचा उद्या अधिक सुखद बनवण्यासाठी झटत आहोत.”
या इव्हेंटप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना आयएएस आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कार्यकारी संचालक अश्विनी भिडे यांनी सांगितले की, “जमिनीचा उपयुक्त वापर, कनेक्टिविटी तसेच किफायतशीरपणा या प्रमुख पायावरच मुंबईतील इन्फ्रास्ट्रक्चर बेतले आहे. सार्वजनिक तसेच संबंधीत खाजगी संस्थांच्या भागिदारीच्या माध्यमातूनच आपण मुंबई शहर नागरिकांसाठी अधिक सोईस्कर आणि सुलभ बनवण्यात यशस्वी होउ शकतो. संपूर्ण जगभरात मेट्रो हेच सार्वजनिक परिवहनाचे प्रमुख साधन आहे. मुंबईत मात्र 150 वर्षे आयुष्य झालेल्या उपनगरीय ट्रेन नेटवर्कमधूनच सार्वजनिक परिवहनाचे प्रमुख काम केले जाते. बेस्ट बसेसचाही त्याला थोडा फार आधार आहे. त्यामुळे मुंबईत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे तसे दुर्लक्षच होत आहे.
मुंबईतील मेट्रो प्रोजेक्टच्या व्यवस्थापनाबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, ‘नागरिकांची संमती आणि पुनर्वसन धोरणाचे कठोर पालन यामुळे मेट्रोचे इन्फ्रास्ट्रक्चर उभारणे सर्वसमावेशक आणि पारदर्शक होउ शकले.”
इमॅजिन मुंबई : अर्बन रिसर्च, धोरणाचे नियोजन, इन्फ्रास्ट्रक्चर, रियल इस्टेट विकास आणि व्यवसाय याबाबत विचारविनीमय करण्यासाठी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील दिग्गज मुंबईतील सेंट रेजीस हॉटेलमध्ये एकत्र जमले होते. यावेळी जमिनीचा अनुकूल वापर करुन मुंबईसह देशातील वेगाने वाढणार्या शहरांमध्ये सुनियोजित नागरी विकास कशा प्रकारे साधता येईल याबाबत विचारमंथन करण्यात आले.
Comments
Post a Comment