क्लासिक लेजंडच्या जावा मोटरसायकल्सच्या डिलीवरीला प्रारंभ
क्लासिक लेजंडच्या जावा मोटरसायकल्सच्या डिलीवरीला प्रारंभ
ग्राहकांना त्यांच्या ऑनलाइन बुकिंगच्या
क्रमवारीने मोटरसायकल्स मिळणार
मुंबई, ३० मार्च २०१९: क्लासिक लेजंड्स प्रा.लि. आपल्या ग्राहकांना आजपासून होणा-या जावा मोटरसायकलच्या डिलिवरीच्या आरंभाची घोषणा करताना अतिशय गर्वान्वित होत आहे. मोटरसायकल्स १५ नोव्हेंबर २०१८ पासून ऑनलाइन बुकिंग केलेल्या ग्राहकांना त्यांच्या बुकिंगच्या क्रमवारीनुसार दिल्या जातीलपहिली मोटरसायकल, जावा सुपूर्द करताना श्री अनुपम थरेजा, संस्थापक, क्लासिक लेजंडस प्रा.लि. आणि व्यवस्थापकीय भागीदार फी कॅपिटल म्हणाले की, हा या प्रवासातला सर्वात महत्वाचा टप्पा आहे, कारण आज पहिल्यांदीच जावा मोटरसायकल्स रस्त्यावर दिसणार आहे. ब्रॅंडच्या आणि गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आमच्या मोटरसायकल्सच्या परिचयापासून आम्हाला आमच्या ग्राहकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद तर मिळालाच, पण सोबत पहिल्या दिवसापासूनच बुकिंगच्या स्वरुपात अतिशय उच्च स्वरुपात विश्वासार्हता देखील मिळाली आहे. आज, आम्ही आमच्या प्रवासाच्या पुढच्या टप्प्यात आलो आहोत, जिथे आम्ही आमच्या ग्राहकांप्रती असलेल्या वचनबध्दता पूर्ण करण्यास सज्ज झालो आहोत. “
श्री आशिष जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी, क्लासिक लेजंडस प्रा.लि. म्हणाले,” गेले काही महिने आमच्यासाठी जावा मोटरसायकल म्हणून ऍक्शन पॅक होते असे म्हणता येईल, कारण जवळपास चोवीस तास आम्ही भारतभरामध्ये डिलरशीप नेटवर्क प्रस्थापित करण्यात आणिउ आमच्या डिलीवरीच्या वचनांची पूर्तता करण्यासाठी उत्पादनात व्यस्त होतो. आता नेटवर्क तयार असल्यामुळे आम्ही आमच्या ग्राहकांना मोटरसायकल्सची डिलीवरी करण्यास सुरुवात केली आहे, आम्ही त्यांच्या विश्वासाचे वाट पाहण्याचे अतिशय कौतुक करतो. आम्ही जस जसे पुढे मार्गक्रमण करु, तसे आम्ही ऑनलाइन जावा मोटरसायकल बुक केलेल्या ग्राहकांपर्यंत पोहचू शकू, त्यांना डिलीवरीच्या क्रमावारीनुसार डिलीवरी केली जाईल.”
या डिलीवरी घोषणेआधी, क्लासिक लेजंडस आपल्या विक्री व सर्विस नेटवर्कला प्रस्थापित करण्यासाठी आक्रमक दृष्टीकोन अवलंबला होता. कंपनी आता भारतातील ७७ शहरांमध्ये ९५ जावा मोटरसायकल डिलीवरींचे संचालन करत आहे. ब्रॅंडने देशभरात केवळ तीन महिन्यांमध्येच प्रचंड विस्तार केला असून यामुळे त्याला भारतातील सर्वात जलद गतीचा ऑटोमोबाईल उत्पादक अशी उपाधी मिळाली आहे. या देशभरातल्या डिलरशीप बेससोबत क्लासिक लेजंड्स आता देशातील प्रत्येक भागातल्या ग्राहकांना वचन दिलेल्या टाइमलाइनप्रमाणे डिलीवरी देण्यास सज्ज झाली आहे. ग्राहक आता आपल्या जवळच्या शोरुमला भेट देऊन मोटरसायकलचे बुकिंग करु शकतील.
कंपनीने महिंद्रा फर्स्ट चॉइस व्हील्स-या भारतातील १ल्या क्रमांकाच्या प्रीओन्ड वाहन ब्रॅंडच्या मार्फत उद्योगातील प्रथम मोटरसायकल एक्सचेंज प्रोग्रामची देखील घोषणा केली आहे. यामुळे रुची असलेल्या ग्राहकांना डिलरशीपमध्ये येऊन आपल्या जुन्या बाईकच्या एक्सचेंजमध्ये नवीन ब्रॅंडअ न्यू जावा घेता येईल.
कंपनी आपल्या ग्राहकांसाठी सर्वोत्कृष्ठ वित्त योजनांसोबत मोठ्या संख्येत टायअप्स ऑफर करणार आहे. वित्त भागीदारांच्या सूचीमध्ये एचडीएफसी बॅंक, टाटा कॅपिटल, आयसीआयसीआय बॅंक, महिंद्रा फायनान्स, कॅपिटल फर्स्ट(आताची आयडीएफसी बॅंक) एलऍंडटी फायनान्स लिमिटेड आणि हिंदूजा लेलॅंड फायन्सान्स यांचा प्रादेशिक भागीदारांच्या व्यतीरिक्त राष्ट्रीय पातळीवर समावेश होतो.
जावा मोटरसायकल्स सर्वत: नवीन २९३सीसी, लिक्विड कुल्ड, सिंगल सिलिंडर, डबल क्रॅडल चेसीसमध्ये नेस्ट केलेले डीओएचसी इंजिन यांनी सुसज्ज आहे, जे नवीन जावाला वास्तवात मॉडर्न क्लासिक बनवते. जावा आणि जावा फोर्टी टूची किंमत अनुक्रमे १,६४,००० आणि १,५५,००० रु. असून (एक्स शोरुम दिल्ली) आणि ड्युअल चॅनल एबीएस व्हेरिएंट्सची किंमत अनुक्रमे १,७२,९४२ रु. आणि १,६३,९४२ रु. असेल. मोटरसायकल्सची निर्मिती कंपनीच्या मध्यप्रदेश येथील पिथमपूर प्लांटमध्ये केली जाते.
क्लासिक लेजंडस प्रा.लि.बद्दल
क्लासिक लेजंड्स प्रा.लि. या भारतीय कंपनीची स्थापना काही वर्षांपूर्वी प्रसिध्द मार्क्यू मोटरसायकल ब्रॅंडचा बाजारपेठेत पुन:परिचय करुन देण्याच्या दृष्टीने झाली होती. क्लासिक लेजंडसचा भारतातील सर्वप्रथम लाइफस्टाइल कंपनी बनण्याचा आणि ग्राहकांना दुर्मिळ होत चाललेल्या उत्पादनाच्या सहनिर्मितीद्वारे आणि मोटरसायक्लिंग इकोसिस्टीमसोबत सेवा देऊकरण्यामार्फत वारश्याला पुन्हा जगवण्याच्या संधी उपलब्ध करुन देण्याचा मानस आहे.
जावा मोटरसायकल ब्रॅंड क्रेंझ रिपब्लिक, एर्स्टवाइल क्रेंझोक्लोवाकिया येथील असून त्याला ९० वर्षांची परंपरा लाभली आहे, त्यांच्या हेडेज एक्सपोर्ट क्लासिक, उत्तम इंजिनियरींग आणि कणखर मोटरसायकलची १२०हून जास्त देशांमध्ये विक्री केली जाते. १९६० सुरुवातीला कंपनीने भारतीय बाजारपेठांमध्ये प्रवेश केला. जावा मोटरसायकलच्या सुंदर डिजाइन आणि दमदार प्रदर्शन या दुहेरी गुणविशेषांमुळे तिला हृदयांसोबत जागतीक शीर्षके देखील जिंकण्याची संधी मिळाली.
आपल्या मार्क्यू ब्रॅंड्स पोर्टफोलिओपासून क्लासिक लेजंड सध्या जावाला केवळ ब्रॅंड म्हणून नव्हे तर जीवनाच्या मार्गाच्या स्वरुपात जीवंत स्वरुपात आणत आहेत. क्लासिक लेजंड्सनी आपल्या भागीदारीच्या सर्वोत्तम क्षमतांना डिझाइन्स व इंजिनियरींगमध्ये आपल्या जागतीक निष्णांततेसोबत आणले आहे, ज्यामुळे मूळ जावाच्या डिएनए आणि स्वरुपाचा परिचय करुन देता येईल.
Website Link: https://www.jawamotorcycles.com/
Facebook Link: https://www.facebook.com/jawamotorcycles/
Twitter Link: https://twitter.com/jawamotorcycles
Instagram Link: https://instagram.com/jawamotorcycles
Comments
Post a Comment